६ .६ २१ .सद्य स्थिति व शंभुराजांच्या, बुधभुषणमध्ये सांगितलेली परिजनांची कर्तव्ये.

 ६ .६ .२१ . सद्यस्थिति व शंभुराजांच्या, बुधभुषण मध्ये सांगितलेली परिजनांची कर्तव्ये.


 काल आपण बघितले,   त्या काळी, कोणी एक , "खंडुजी आपले मराठी छत्रपतीं  संभाजीमहाराज, मोगल शाहजादा आझम व आसदखानच्या जाळ्यात, स्वकियांच्याच फितुरीने, फसल्याची खबर देण्यास,  बादशहाकडे धावला, अन् बिदागी घेऊन खुश झाला. असेच दुष्कृत्य करायला,  म्हणजेच सतरंज्या उचलायला, आज अनेक (?) वीर सज्ज असतात. पण खरे तर त्या अजाण मुलांचा काही अपराध नसतो. असलीच तर, योग्य मार्ग न सापडल्याने झालेली चूक असते.  कशी ती सांगते. त्यासाठी, २०.२१ वर्षे मागे जावे लागेल. तथाकथित सरकारने, अचानक शिक्षणविषयक निर्णय घेतला, निर्णय कसला, त्या काळातील विद्यार्थांना, अभ्यास करण्यापासून, दूरच केले, म्हणा नं. असे ठरले कि, १ ते ७ वी पर्यंत, शाळातून परीक्षा घेऊ नयेत. सर्वांना पास करायचे. या  महाराष्ट्र सरकारच्या सरकाराच्या ठरावाने, काय झाले कि, मुले अभ्यास करेनाशी झाली. basic  काळात पाढे - कविता- वाचन या कडे पार दुर्लक्ष झाले व पुढे  ८ वी ९ वी त  गणिते- जोडाक्षरे वाचन व लेखन जमेनासे झाले. परिणामतः  कित्येकजण जेमतेम दहावीच्या काठावरच पोहोचू शकले अन् पुढे ठप्प!  हे मी ऐकिवातली कथा सांगत नाही. मी व माझी मैत्रीण , नलिनी आरेकर, त्या काळात मालाडला, under privileged मुलांसाठी संस्था चालवत असू. तेव्हा हा अनुभव आला. त्यावेळी कोणी ही राजकिय व्यक्ती पाठीशी उभी नव्हती. कोणी सर्वतोपरी मदत केली माहितेय, ज्यांना आपण मराठी मंडळी, " चिक्कू मारवाडी" म्हणतो,  त्यांच्या , "राम लिला प्रचार समितीने".

 -प्रशस्त जागा मुलांना आहार वह्या व जेव्हा जे आवश्यक असेल ते. हेच कार्य या बुधभुषण ग्रंथात, १५ वर्षाच्या शंभुराजांनी, राज कर्तव्य  म्हणून नमूद केले होते. असे या धर्मपरायण राजाने लिहीलेले, राजा व प्रजा ह्याचे अधिकार व  कर्तव्य काल वाचलेच असेल. आज ही जनतेची  कामे खाली देत आहे. दोन्ही   कालचा व आजचा एकत्रित लेख वाचा व विचार करा. आजूबाजूच्या नोकरीच्या शोधात असलेल्या मुलांना जरूर जरूर वाचायला द्या. या १८ते २१ गटातील, मुलांना मतदानाचा अधिकार तर मिळतो. पण चरितार्थाचे साधन सहजगत्या मिळत नाही. मग भांबावतात. त्याचा फायदा होतो, नेतेमंडळींना. हां, परवा लिहिल्याप्रमाणे, याबाबत- मतदानाच्या वेळी-वापरायचा जो , " नोटा" चा अधिकार असतो. तो माहित नसतो. तसा तर हा प्रकार कित्येक शिक्षित पौढ मंडळीना ही ज्ञात नसतो. मग या drop out मुलांची काय स्थिती?  तर शंभूराजेंच्या " बुधभुषण" मधील पुढील  भाग ३ भागात अभ्यासू या. 

  तर like - subscribe करणार ना, हा माझा BLOG  मानसिक व सामाजिक व बौध्दिक बाबतीत.  बघा फायदा तुमचाच आहे, जर सहजगत्या कायदा जाणकार झालात तर?  खाली  दिलेले, शंभू राजांचे लिखाण वाचा वाचाच.

काल आपण राजा कसा असावा,  याबद्दल शंभुराजे काय सांगतात, ते पाहिले. पण असे आहे कि, टाळी नेहमी दोन हातानेच वाजते. सहाजिक राजाला, प्रजा ही तेवढीच निष्ठावान व श्रध्दावान  मिळणे, गरजेचे आहे. राजाने जे नियम केले असतील ते प्रजेने पाळणे, महत्वाचे आहे


मेधावी, मतिमान, दीनवदनो', दक्ष, क्षमावान,  ऋजु: ।

धर्मात्मा, अपि अनुसुयको,लघुकर:,

             षाङग़ुण्यविद्, शक्तिमान् ।

उत्साही पर रंध्रविद् कृतधृति:, वृध्दिक्षयस्थान् विद् ।

शूरो, न व्यसनी, स्मरति उपकृतं, वृध्दापसेवी च य:।। २ ।। 


हा श्लोक कालच पाहिला, परत कशाला, असे वाटले ना? पण आपल्या नागरिकांना , ह्या दृष्टिकोनाची गरज आहे. एक एक राजाचा गुण पुन्हा नजरेखालून घालून, आपले कर्तव्य काय आहे, ते पाहणे गरजेचे आहे. नाहीतर राजा कितीही ज्ञानी, प्रजाहिततत्पर असून जर प्रजा-- जनता कपाळकंरटी असेल. राज्याचा विकास कसा होणार?

  तर आता बघु या. राजाच्या वरील गुणांची जर आपल्याला अपेक्षा असेल, तर आपल्यात, त्यासंबंधी मिलाफ देणारे गुण (सरळ शब्दात match होणारे), आहेत का?

       मी शेवटून वर जात आहे. गोंधळ वाटला तर कालचा लेख refer करा. राजा, आजच्या काळात सरकार-- पंत प्रधान व मुख्यमंत्री. ते जर वयोवृध्दांचा आदर करणारे' हवे तर sr. citizens नी ही त्यांनी लावलेली, आज संचार बंदी व रविवारी लॉक डाऊन, याचे पालन करून पुढच्या पिढीसाठी आदर्श होणे, आवश्यक आहे नं? 

       एक उदाहरण सांगते, दादरच्या शिवाजीपार्कमध्ये पत्रकार दाखवत होते. तेव्हा एक SR.CITIZEN त्यांना भेटले, विचारल्यावर बोलतात, " मी ६वाजताच आलो. 

  ७ वाजता  ते सुरू होणारे नं, ७ला अजून ५मि.बाकी आहेत. मी जवळच राहातो. २मि. त घरी पोहोचेन."

     काय बोलायचे, यावर जर सगळ्यांनी ६जवाजता पार्कात येणे केले असते, तर गर्दी झाली असती ना? बंदी कशासाठी अाहे? कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नं? तो व्हायरस घड्याळ लाऊन बसलाय का?  याला सरळ शब्दात म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची खिल्ली उडवणे. 

      असेच अनेक वयस्क महाशय नाशिक पुण नागपूरच्या रस्त्यावर आढळून आले. तेच जर कायदे पाळत नसतील, तर पुढच्या पिढीने तरी त्यांचा मान का ठेवावा?

         असे अनेक मुद्दे आपण माझ्या बरोबर विचारात घ्याल का? निदान आज " कोरोनाशी लढा "  देण्यासाठी तरी छ.शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराजांच्या सांगणाला मान देऊन, आदर्श मावळे, I mean, नागरिक बना.

         दुसरे उदाहरण, श्री. मोदींनी  रविवारी सध्याकाळी वाजता, आपल्या घरातून - खिडकीतून -  बाल्कन्यांतून टाळ्या' घंटानाद व थाळीनाद करण्यासाठी सांगितला, तो कशासाठी तर अशा परिस्थितीत, जीवावर उदार होऊन कर्तव्यतत्पर राहणार्‍या पोलिस, वैद्यकी अधिकारी व सफाई कामगारांना मानवंदना देण्यासाठी ना?  मग रस्त्यावर येऊन गरबा करणार्‍यांची व फटाके  फोडणार्‍यांच्या  अकलेची किव कराविशी वाटते.

         तिसरे उदाहरण, फेसबुकवर तारे तोडणार्‍या महाभागांचे म्हणे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करतोय. पंतप्रधानांनी सांगायची काय गरज? आता काय डोके फोडायचे, असल्या भंपक विचारसरणी समोर.

         एक आणखी छोटेसे उदाहरण. छोटे म्हणायचे, कारण मुले लहान आहेत. पण एक नक्की major  आहेत. आज पुर्ण फेसबुक गंभीर विचाराने भरले असताना, हा फोटो समोर आला. म्हणे ,अशी असावी , दोस्ती. अजून आपल्यात भावंडात ही  अशी जवळ येण्याची तितकीशी प्रथा नाही. आज तर " कोरोना" च्या कारणे दूर रहा.अगदी shake hand ही नको सांगत असताना, ह्या वेळी तरी ही प्रशासनाची तोहिम ठरते.७

         तरी एक नक्की  ८५ ते ९० % लोकांना या परिस्थितीची जाण अाहे व ते पालन करत आहेत👍👍👍तेव्हा आपण या कोरोना लढ्यात ✌✌✌ विजयी होणारच. मला अंधश्रध्दाळू म्हणा. हरकत नाही.  पण आपल्याला माननिय मोदींजी व माननिय शहां जी पंतप्रधान  व गृहमंत्री लाभले, हे आपल्या देशाचे व राष्ट्रनिष्ठ नागरिकांचे सौभाग्य आहे.


Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू