माझे लेखन✍ तुमचे वाचन📃 हेच आपले मिशन.

 २२. ६ .२१ जेष्ठ शुक्ल द्वादशी. मंगळवार.

        काल सात  वारांची माहिती व आठवड्याची संकल्पना स्पष्ट झाली. पण आजच्या मंगळवारी,  नेमके भौमप्रदोष आलेय. नियमित वाचकांना भौमवार म्हणजेच मंगळवार, हे आठवत असेल. कोणी आजच नवीन असेल तर मागच्या रविवारपासूनचे blog वाचा. Then you will get the reference. 

        दोष चा अर्थ सांगायला नको. प्र म्हणजे दिर्घकालीन. आज सकाळी द्बादशी होती, तरी माध्यांनीच त्रयोदशी सुरू झाली. व शुक्ल व कृष्ण मंगळवारी - त्रयोदशी असली तर भौमप्रदोष योग म्हणतात. 

        ( Don"t worry येवढे झाले कि,  दुसरा मनोरंजक topic  घेणार आहे)

          तर या बद्दल जाणकार होऊ या.

          इथे प्रश्न अंधविश्वासाचा नाहीये. आत्मविश्वास वाढविण्याचा आहे.  पण प्रत्यक्ष घडते उलट. अशी व्रते करून आजची पिढी आत्मनिर्भर न बनता, उलट, या clutches च्या सहार्‍यावर विसंबून राहण्यास लागते. आपण व्रत करतोय नं, मग धडपड करायची काय गरज?  काही मंडळी तासन् तास पूजा करतात. especially  जेष्ठ मंडळी. असो. मूळ मुद्दा प्रदोष म्हणजे काय व त्याचे व्रत का व कसे करावे . हां , मी धार्मिक ग्रंथ अमाप वाचत असले, तरी काही  धर्म(कर्म)कांडात गुंतलेली नाही. पण वाचन करताना जे ज्ञात झाले, ते सांगत आहे. माझे जे ५जानेवारी २० पासून  दिड वर्षे वाचक आहेत, त्यांना आठवत असेल, मी केलेले विधान. जर आपल्याला डोंगरमाथ्य़ावर जायचे असेल तर विविध मार्ग  available असतात. पायी, बस, कार वगैरे कदाचित काहींना हा व्रतवैकल्याचा मार्ग भावेल. हां ज्याने त्याने अशा मार्गाच्या किती आहारी जावयाचे, ते ठरवायला हवे. तर असो.

           प्रदोष म्हणजे शब्दशः अर्थ वर सांगितला. प्रदोषकाळ एकुण तीन तासाचा असतो सुर्यास्तापूर्वी दिड तास व सुर्यास्तानंतर दिड तास. या अवधीत शिवशंकराचे व बरोबरीने हनुमानाचे पुजन करावे. विधि सांगितला अाहे. पण जमेल तशी पूजा वा जप करावा. बस!  दोन्ही देवता  भक्तांना पावतातच. हा, फल काय ते विचारू नका. कारण मी फलाच्या आशेनेच भक्ती करण्याच्या विरोधात आहे. अाता बघा, हा blog मी सुरू केला, तेव्हा काही, यशस्वी होण्यासाठी, काही , "कर्मकांड- नवस- गार्‍हाणे केले नाही. पण  वाचकवृंद हो, तुमच्या रूपाने  देव माझ्यावर प्रसन्न झालाच नं? 🙏🙏🙏. तर उद्यापासून सामाजिक विषय हाताळू या. ओके नं? तर भेटू या नियमित. माझे लेखन व तुमचे वाचन. हेच आपले मिशन. ✍ 📄👍

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू