छत्रपती शंभूराजे व त्यांची धर्मनिष्ठा. ह्याचे ज्ञान सर्वदूर व्हावे, यासाठीच हा अट्टाहास.

 ७.६ .२१ .छत्रपती शंभूराजे व त्यांची धर्मनिष्ठा. ह्याचे ज्ञान सर्वदूर द्यावे, यासाठीच हा अट्टाहास.

 काल जे अभ्यासले, तेच वेगळ्या संदर्भाने पाहू या . पूर्वी ६ महिन्याआधी आपण  भक्तिच्या नवरस पध्दतीचा अभ्यास केला . त्या दासबोधातील" बीरभाटिव" या बाबत विस्ताराने, लिहिले होते. तोच उल्लेख परत करायचा आहे . कारण ही बाब महत्वाची अ‍ाहे. इतिहास घडविणार्‍या वीरांच्या शौर्याच्या कथा, किर्तनातून जनसामान्यांकडे पोहोचविण्याचे, किर्तनकारांचे, आद्य कर्तव्य आहे. धर्मरक्षणार्थ, ज्यांनी जीवाची पर्वा केली नाही. अशांची चरित्रे, सकलजनांपर्यंत पोहोचविण्याचे " हे" एक प्रबल साधन आहे. बीरबाटिव म्हणजे बीर= शौर्यवान. भाट= म्हणजे स्तुती करणारा. इव=  निर्मिती  देण्यासाठी, शौर्यरसाचा प्रसार व प्रचार होता.

   समर्थ रामदासस्वामींनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे निर्माण होणे, आवश्यक मानले .  मोगलांचे लागूंलचालन चालले होते, त्याला प्रतिबंध करणे, गरजेचे होते. तसेच सातारच्या छ.शाहूंच्या काळात ही हेच कार्य परमहंस ब्रह्मेंद्रस्वामी यांनी केले.अन् त्यासाठी, किर्तनकारांनी,  हातात सूत्र घेऊन, जनजागृती करण्याचे, कार्य हाती घ्यावे, ही, समर्थांनी शिकवण दिली. हेच कार्य, ब्रिटीश काळात, सेवादल व रा.स्व.संघाने केले. लोकनाट्य व पोवाडे या माध्यामातून.

     अ‍ाजही, हे कार्य अनिरवार्य ठरले आहे. आज फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी व चालत आलेल्या भ्रष्ट आचारात,  अडसर ठरलेल्या, माननिय मोदींना विरोध करण्याचे जे काम घडत अाहे. त्याला आपण विरोध करणे व त्यासाठी जनजागृती करण्यासाठी ," किर्तन" हा मार्ग आहे. अर्थात् त्यासाठी, देवळाचा आधार न घेता, हा blog/ facebook/ WhatsApp  द्वारे मेसेज पोहोचू शकतो. देवादिकांचे फोटो  forward न पाठवता, हे व असे लेख forward झाले,व ते ही स्वःतचे भाष्य (अर्थात त्यासाठी नीट  वाचन व मनन आवश्यक आहे ).करून तर आपल्या पुढच्या पिढीला, मोगलपार्क इत्यादिका(?)  वाचवाल. कदाचित तुमचे ही पुढच्या काळात, दहन न होता, दफन होईल, जागे व्हा, वेळेवर. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे   " धर्मरक्षणार्थ"  झालेले, अन्वरित हाल विसरू नका. आपण जर डोळ्यात कचरा गेला , तरी हैराण होतो. मग तापती सळी, गेल्यावर, त्यांनी दुसरा  डोळा वाचवण्यासाठी,  माघार नाही घेतली. धर्माचा टिळक नाही पुसला. त्यांचा सखा. आग्रावरून परतीच्या मार्गात, मिळालेला, कनोजी -कवी कलशाने ही, हेच भोग बरोबरीने भोगले. माघार नाही घेतली. छ.शिवाजी महाराजांच्या या सुपुत्राने(छ.शंभूराजेंनी) वडिलांच्या, किर्तिला, आच लागून दिली नाही. धन्य तो पिता! धन्य तो पुत्र! 


पदें दोहडें श्लोक प्रबंद । धाटी मुद्रा अनेक छंद ।

बीरभाटिंव  विनोद । प्रसंगें करावे ॥ १४॥


 विनोद म्हणजे jokes & pranks नव्हे तर पदे, दोहे, श्लोक व हास्य मनोरंजनात्मकरित्या interest वाटेल, अशा शैलीत कथन करावेत.

 

भक्तिज्ञान वैराग्य लक्षण । नीतिन्यायस्वधर्मरक्षण ।

साधनमार्ग अध्यात्मनिरूपण । प्रांजळ बोलावें ॥ १६॥

प्रसंगें हरिकथा करावी । सगुणीं सगुणकीर्ति धरावी ।

निर्गुणप्रसंगें वाढवावी । अध्यात्मविद्या ॥ १७॥ 


  धर्म रक्षण या गुण व अशा ,"व्यक्ती" बाबत " भक्ति" निर्माण करून, तरूणाच्या मनात, आदर्श मानावा, असे स्फुरण निर्माण करावे. असे अभ्यासक्रम  असावेत.काही पटले असेल तर त्या दोन्ही छत्रपतींना वंदन करून, पुढे त्यांची परंपरा चालवणार्‍या, सातारच्या गादींच्या संस्थापकांना छ.शाहू महाराजांना व त्यांच्या वंशजाना आदरणीय मानू या.🙏🙏🙏🙏🙏 

  खरे तर इथे थांबणार होते. पण राहवत नाही, म्हणून परखडपणे लिहित आहे. परिणामाची पर्वा न करता.

  आपले शिवाजी राजेंना आजमितीला राज्याभिषेक झाला. ते छत्रपती झाले.सर्वश्रेष्ठ ठरले. अाज कोरोना काळात, मोठ्या प्रमाणात जमावाने एकत्र येणे योग्य नाही, हे पटतेय ना?  अशा वेळी, त्यांच्याच वंशजांनी,   बीर भाटिव न होता, हात पुढे करून, आपलेच श्रेष्ठत्व कमी करून, अारक्षणासाठी मुलांची गर्दी करावी. सरकारला संकटात टाकावे. हे बरोबर आहे का? आज सर्व कोरोनाच्या विरोधात एकत्रित होणे, गरजेचे आहे.

  हो, एक महत्वाची बाब, लक्षात ठेवा. आरक्षण हे फक्त सरकारी प्रभागातच असते. मार्कात असते. ज्ञान आपल्याला मिळवायचे असते संधी मिळवायची असते. काल म्हटल्याप्रमाणे, पाढे व पाठांतर कराल तरच जीवनाचे गणित अल्लद सुटेल. यश पायाशी येईल.  आता मी रोज like - subscribe सांगणार नाही.ज्यांना आपला फायदा करायचाय, ते सहजच माझे लेख वाचतील व स्वतः अडचणीतून वाचतील. अन्  स्वहित साधतील. तर भेटत रहा. ✍ वाचत रहा 👍👍✌V FOR VICTORY.

~~~ ~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू