अाजची गरज-मानसिक-सामाजिक- राजकिय.
८. ६ .२१ . आजची गरज - मानसिक - सामाजिक - राजकिय.
छ.संभाजी महाराजांनी त्या वयात- त्या काळात ही गरज समजून घेऊन, त्या वर उपाय लिहून ठेवला होता. हा त्यांचा बुधभुषण जर वाचला, त्यानुसार वर्तन केले तर आपण आदर्श नक्कीच ठरू व यशस्वी ही. तुम्ही म्हणाल कि मग ते स्वतः का फितुरीचे बळी झाले? ते fully alert होते. पण राज्याच्या लालसेचे शिकार झाले हो. शत्रुच्या कारवाईबाबत सावध होते. पण त्यांच्या पिताश्रींचा मृत्यु, त्यांजपासून लपवून, तिर्हाईताच्या हातून अंतःसंस्कार करण्याइतपत मजल जाईल, अशी ते कल्पनाही करू शकले नाहीत. मासाहेब सोयराबाईंंनी हे केले.पण मतलबी व स्वार्थी मंडळी, या स्वराज्यात होती , ती ही खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसपास कटकारस्थाने करतील, हा अंदाज ते बांधू शकले नाहीत. असो.
त्यांनी लिहिलेला श्लोक, आपण पाहू या. निदान सावध होऊ या. ते या बुधभुषणाच्या, तिसर्या अध्यायात ११ व्या श्लोकात, काय लिहितात बघा.
ज्याला वैभव व यश मिळवायचे आहे, त्या माणसाने, पुढील सहा दोष वर्ज्यच (स्वतः पुरतेच नव्हे तर) संपूर्ण राज्यातून नष्ट( तमाम प्रजेच्या बाबत) केले पाहिजेत.
षड् दोषाः पुरूषेणैव हातव्या भूतिमिच्छता ।
निद्रा, तंद्रा, भयं, क्रोध, आलस्यं,दीर्घसूत्रता ।।११।।
आता आपण विचार करू या. आजच्या आपल्या सामाजिक व राजकिय गरजांची. सांप्रत आपण लोकशाहीत जगत आहोत. लोकशाही कशी असावी तर~ आपण सर्व मिळून राज्य घटनेने दिलेल्या अधिकारांच्या आधारे, लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींनी, लोकांच्यासाठी, - त्यांच्या हितासाठी चालविलेली शासन व्यवस्था. त्यासाठी आपण दक्ष असणे आवश्यक आहे. आपण निवडलेले प्रतिनिधी लोकमान्य असायला पाहिजेत. सामाजिक व राजकियदृष्ट्या लायक असावेत. जनतेनेही थोड्या फायद्यासाठी आपले "मत" कवडीमोलांने विकू नये. बघा आता मी एक गणित घालते. बडी धेंडे निवडून येण्यासाठी, पैसे वाटतात. समजा, निवडणूकीच्या दिवशी रू १०००) साड्या वस्तू वाटप झाली, ज्या कोणी ते घेऊन, "त्या" व्यक्तीला "मत" दिले. ती व्यक्ती निवडून आली, तर तिला वर्षाला " निधी" मिळतो, लाखो करोडोने, कशाला~ तर वॉर्डात, समाजोपयोगी कार्ये करावयास. पण त्यानंतर , तुम्ही समजता, ते किती करतात! पण त्यासाठीच सरकार, त्यांना पैसा मिळतो, पण त्यांच्या घरात 🏥🚗🚗 कसे येतात, विचार करा. हां. अपवाद असतात. बरे अाता तुम्हाला( म्हणजे जे drop out आहेत, हे घेतात,त्यांना) काय मिळालेय ते बघा. १०००+ साडी/ ड्रेस ५००+ पार्टी साधारण २०००/- ते पाच वर्षासाठी. ३००० धरा . म्हणजे दिवसाला- ३६५ * ५=१८२५ दिवसासाठी. ३००० भागिले १८२५ म्हणजे दिवसाला रू १.७५ .😀😂.
तेव्हा अाता समजून घेऊ ," नोटा" अधिकार. निवडणूकीत पैसे offer का केले जातात, तो विचार करा. आपल्या आजूबाजूच्या मुलांना बायकांना हा हिशोब सांगा. ज्यांना आपल्या समाजपयोगी कार्याच्या आधारे, निवड होईल, ही खात्री असेल, ते कशाला अशी खैरात वाटलील.
दुसरा point भय. हेच शंभुराजे सांगत आहेत. भय- भीड ठेऊ नका. झोप मग ती अति प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नसावी. जागृत रहावे. सुस्ती/ तंद्री- भ्रमात राहू नये. भय/ भीड बाळगू नये. जे पटत नाही, त्याला नकार द्यायला शिका. म्हटले आहे, की भीड भिकेची बहीण.
हाच अधिकार,आपली constitution आपल्याला देत आहे. निवडणुकीत, जे उमेदवार उभे राहिले आहेत, त्यात कोणीच लायक- समाजकारण करण्यास योग्य नाही, असे वाटले, तर हा, "नोटा" नकाराधिकार वापरा. आता तो कसा उपयुक्त आहे. सांगते. मतदान पत्रिकेवर/इलेक्टॉनिक मतदान यंत्रावर, सर्व उमेदवारांच्या चिन्हाखाली , " या पैकी एकही नाही (NOTA) असे लिहिले असेल, ते बटण दाबायचे बस. जितकी % संख्खेने हे बटण दाबले जाईल, निवडणूक आयोग दखल घेईल. हा हक्क गमावू नका.
हां कोणी म्हणेल, मतदान करायचेच नाही तर मग जायचेच कशाला. नाही अाता घरात बसून आलस्य वा या system वर क्रोध (राग) नाही काढायचा. किंवा दीर्घसुत्रता नाही, दाखवायची. दीर्घसुत्र म्हणजे विलंब- आपली निर्णयशक्ती, वापरायची नाही सरळ शब्दात,
" मला काय करायचेय", ही वृत्ती सोडा आता.
त्याने मग काय फायदा होईल, प्रत्येक पक्ष, लायकी बघूनच उमेदवार निवडतील व तिकिट देतील उद्या ह्याविषयी पूर्ण कायदा जाणून घेऊ. अन् कालच्या अारक्षणाच्या मुद्दावरही सविस्तर चर्चा करू या. जे माझ्याकडे आहे, ते आपल्याला देणार आहे. त्या माहीतीचा कसा उपयोग करायचा, ते तुम्ही ठरवालच , ही खात्री आहे.👍👍
Comments
Post a Comment