तिथी व वार यांचा आपल्या आरोग्यावर व पचनसंस्थेवर होणारा परिणाम.
१२.६.२१ शनिवार.जेष्ठ. शु. द्वितिया.
काल मी म्हटले होते. आता आपण भविष्य काळाचा विचार व काळजी करू या. सध्या काही action करायला सांगत नाही. पण वाचन करताय तेच महत्वाचे आहे. त्यावर फक्त चिंतन करा. निदान पटतेय कि नाही, हे मनाशी स्पष्ट करा. तेच खूप उपयुक्त आहे. माझे विचार, बहुजनापर्यंत पोहोचत आहेत, हेच माझ्या दृष्टीने, चांगले आहे.
पुुढच्या भविष्य काळाच्या, हितासाठी, आता वर्तमानकाळात, आपल्या समाजाच्या हातून जे बरे वाईट घडत आहे, त्याला ऐतिहासिक अनुभवांची जोड मिळणे, गरजेचे आहे. मग साहजिक. त्यासाठी, त्या घटनांची समूळ माहिती मिळवण्यास हवी, बरोबर नं?
आता दोन दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रात घडलेली घटना पाहू या. वरवर पाहता, ही सुधारणा, वा! छान! वाटेल.
पण छ. शंभुराजांनी त्यांच्या ," बुधभूषण", या ग्रंथात जे लिहून ठेवले आहे, ते पाहू या. सध्या श्लोक बाजूला ठेऊन , त्यांना जे सांगायचे आहे, तेच सविस्तर जाणून घेऊ या. ते लिहितात, जे आपले पूर्वासूरी सांगतात- जे ऋषी मुनी विद्वान तसेच कवी व साहित्यिक यांनी लिखित स्वरूपात आपल्यासाठी निर्माण केले आहे, ते अभ्यासा. ज्या परंपरा पूर्वापार चालत आल्या आहेत. त्याचा शास्त्रीय पध्दतीने शोध घ्या. अर्थ समजत नसेल, मान्य आहे. त्या काळात छापील ग्रंथसंपदा नव्हती. पण किर्तन प्रवचन पोवाडे स्वरूपात जे उपलब्ध आहे, त्याचे संशोधन करा. परंपरा का व कशासाठी ओघवती आहे, ते शोधा.
आज तर एक फॅड निघाले आहे. जे जे सनातन ते ते फालतू ठरवणे.
आजच बघा. परवा अमावस्या झाली. बरेच वर्षापासून लासलगावात, कांदे लिलाव बाजार, दर अवसेला बंद ठेवला जातो. कारण माहित नाही, म्हणून ती अंधश्रध्दा ठरवून टाकली व परवा १० जूनला अमावस्येला गावकर्यांनी धड्याक्याने, बाजार चालू ठेवला. व सर्व टिव्ही चॅनेल, मोठी सुधारणा जाहीर केली. त्यासाठी मोठा खर्च करून कॅमेरे लवाजमासह publicity केली. पण इतर पिकाबाबत ही रीत नव्हती. फक्त कांदे लिलाव बाजारालाच पूर्वापार ही पध्दत का पडली असेल बरे?
सांगते, त्या मागची, कारण मिंमासा. तुम्ही घरात रंग किंवा paste control केले असेलच. तेव्हा त्याचा लहान मुलांना/ आजारी/ वृध्दांना त्रास होऊ नये, म्हणून रंगारी लोक , रात्री घरात एक कांदा कापून ठेवण्यास सांगतात. का माहीत आहे? रंग वा केमिकलमुळे जे प्रदूषण होते, ती दुषित हवा, कांदा खेचून घेतो. व हवा शुध्द होते. अाता अमावस्येचा विचार करू. बर्याचजणांना माहित नाही कि अवसेला रात्री शितल चंद्र किरणे नसल्याने हवा प्रदुषित असते, तिच्या परिणामी जी प्रदुषित हवा, जो कांदा बाजारात बाहेर पसरला जातो, तो शोषतो. मग तुम्ही म्हणाल, वा! मग छानच! पण ते दुषित कांदे नंतर आपण खातो ना? म्हणून पुर्वासरींनी हा नियम घातला आहे. अवसेला, कांदे चाळीत बांधल्या अवस्थेतच ठेवावे. हां चाळ म्हणजे कांद्याची जाळीबंद वखार.
पण अाज श्रध्दा व परंपरा चुकीच्या ठरवणे भूषणास्पद. त्याचा खोलवर विचार संशोधन केले तर काय हरकत आहे?
आणखी एक अमावस्या व पोर्णिमेचे सत्य सांगते. ह्या दिवशी जर अपघात झाला, घरात ही कापले, मुले पडली जखम झाली तर रक्त जास्त जाते. खोटे वाटत असेल तर डॉक्टरांना किंवा पोलिसांना विचारा. तेही कित्येकदा हे अपघात समयी म्हणतात, " अरे बापरे! आज पोर्णिमा/ अमावस्या आहे, रक्त फार जातेय. चंद्राच्या कला म्हणजे तिथीचा आपल्या जीवनावरील अनोखा परिणाम.
अन् असा आहे प्रदुषणाचा व कांद्याचा संबंध. असा प्रदुषण खेचलेला कांदा बाजारात येऊन नकळत, लोकांच्या आरोग्याला , नुकसान होऊ नये, म्हणून आपल्या पूर्वजांनी घातलेला नियम. तसाच परिणाम अापले वार दिवस, आपल्या निरोगी वा आजारी अवस्थेवर करत असतात.
उद्या त्या विषयी शास्त्र सांगेन. ते सहजरित्या, तुम्ही पडताळून पाहू शकाल. तर भेटू, उद्या सोमवारी व बघू या, सोमवारी पथ्य वगैरे का असते ते. मग भेटू या उद्या सोमवारी. तुर्त वारांची मूळ नावे पहा.
१. रविवार= आदित्यवार.
२. सोमवार= चंद्रवार.
३ . मंगळवार= भौमवार.
४ . बुधवार = सौम्यवार.
५ . गुरूवार= बृहस्पतवार.
६ . शुक्रवार= भृगुवार.
७ . शनिवार=मंदवार
अर्थ उद्या. OK SEE THEN TOMORROW.
Comments
Post a Comment