छ.संभाजींचा बहुमोल व सर्वगुणी सल्ला.
१० .६ .२१ . बुधभूषणमधील छ. संभाजीमहाराजांचा बहुमोल सल्ला.
काल आपण पाहिले जर आपल्याला, जीवनात काहीतरी चांगले करायचे असेल, तर मुख्य आपल्याला स्वतःला ओळखा. आपली योग्यता व क्षमता जाणून घ्या. मी नेहमी एक श्लोक सांगते. "राम"चा अर्थ क्षमता. त्याची खरी दखल घ्या.
मी काल जे लिहिले कि, बहुदा सर्व गुणार्थी असतात. विद्यार्थी/ ज्ञानार्थी कोणी नसतात. पदवीसाठी विशिष्ट प्रकारे अभ्यास करतात. पण सखोल अध्ययन करणे, होत नाही. पण आज मी खूप खूश आहे. का ते सांगते.
झाले काय, शंभुराजेंच्या या, "बुधभूषण" ग्रंथाची अापल्या वाचकांना करून द्यावयाची ठरवली. ती सर्व लहान मोठ्यांना फायद्याची होणार आहे. संस्कृतचा तितकासा अभ्यास नसल्याने , अडले कि, मी माझ्या दोन लहान मैत्रिणींना शंका विचारते. त्या दोघींचा संस्कृतचा गाढ अभ्यास आहे .हो. सुजाता संस्कृतच्या शिकवणी घेते. कित्येक कॉलेजची मुले तिच्याकडे शिकतात. अंजली इंजिनियर आहे.
शंभुराजेंनी प्रारंभी ईश स्तवन करताना गणेश, शिव शारदा या देवतांबरोबर गुरूंचे स्तवन केले. त्यात त्यांनी गुरू कसे असावेत. हे सांगितले आहे. हे वर्णन छत्रपती संभाजीमहाराजांच्या व्यक्तीमत्वाचे नेमके दर्शन दाखवत आहे.
बघा हा श्लोक हं,
अज्ञानकृष्णसर्पेण, दंशिता भुवि मानवाः ।
तेषां जीवनहेत्वर्थे, नौमि जांगुलिकं गुरूम् ।। ४ ।।
या जांगुलिकं शब्दाला अडले, मी सौ. सुजाता राहूल जोशी सोहोनी हिला whatsup मेसेज करून विचारले. तोच मेसेज अंजलीला forward करायच्या आधीच सुजाताने माहीती पाठवली. बुध्दी स्मरण शक्ती अन् मुख्य म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे quick respose ..I am lucky that way. मुख्य म्हणजे कालच्या माझ्या लेखनावर reaction कि. तिच्याकडे काही CBSC ची मुले अभ्यासक्रमात " संस्कृत" नसूनही तिच्याकडे संस्कृत शिकायला स्वेच्छेने येतात. मला, त्या मुलांबरोबर, त्यांच्या पालकांचेही कौतुक करावयाचे आहे. त्यांनी मुलांचा कल समजून प्रोत्साहन दिले. Then, dear viewers clap for them with me..
आता ह्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊ या. संदर्भासाठी परत लिहिते.
बघा हा श्लोक हं,
अज्ञानकृष्णसर्पेण, दंशिता भुवि मानवाः ।
तेषां जीवनहेत्वर्थे, नौमि जांगुलिकं गुरूम् ।। ४ ।।
ह्या जगतातील माणसांना, जणू अज्ञानाच्या कृष्णसर्पाने डंख मारला आहे. त्यांना जिवंत (मनाने) ठेवण्यासाठी , " गुरूरूपि विषवैद्यकांची (सर्पाचे विष उतरविणार्या) हेतूपूर्ण निवड केलेली असते. त्याला शरण जाणे, हितकारक असते. मी तेच केले, जाणकार सुजाताला contact केले. क्षणार्धात ज्ञान मिळवले व आपल्या जिज्ञासू वाचकाकडे pass on केले. त्याचा व माझ्या idea चा follow up करा. जे माहीत नाही, ते, " जाऊ देत झाले,"न म्हणता. जाणून घ्या. ती साठवायला जास्त " जागा" लागत नाही हो.उलट कोणाला सांगता येईल. तेव्हा उद्या , त्या" जिज्ञासू छोट्याची ओळख करून घेण्यास आवडेक नं? Then see you all tomorrow .
Comments
Post a Comment