जुने ज्ञान सोने असू शकते. JUST GO THROGH IT. MAY BE BENEFICIAL.

 १४ .६ .२१ सोमवार. जेष्ठ ४.

    विनायकी चतुर्थी. परवा मी अमावस्येचा परिणाम, विशद(  समजावणे) करावयाचा प्रयास केला. काल ही परत त्याच मुद्दावर जोर दिला.  शिवाय आपले वार त्याची मूळ नावे सांगितली . त्याचा आपल्या  निरोगी व निरामय जीवनावर निश्चित प्रभाव पडत असतो.  

    वर्तमानकाल पाहताना, आपल्या आरोग्याचा विचार करणे, महत्वाचे आहे. त्यावर आपला व अापल्या ,  आपल्या मुलांचा भविष्यकाळ अवलंबून असतो. ध्रुमपान करणार्‍या वडिलांच्या व्यसनाची  त्यांना "ऐटी" वाटते. पण त्यांच्या निकट सहवासाने, मुलांच्या श्वसन संस्थेवर परिणाम होत असतो. तसेच सवयी ही उचलल्या जातात. असो. हे विशिष्ट लोकांच्या बाबतीतच घडते.

    पण सर्वसामान्य यच्चयावत जनताच्या बाबतीत काय घडते, ते बघू.  वार व तिथीचा पचनसंस्थेवर होणार परिणाम  सांगायचा मी प्रयत्न करणार आहे.  त्यावर प्रयोग करून खात्री करू शकता. 

     आज सोमवार व विनायकी चतुर्थी ही दोन्ही उपवासांचे दिवस. अापल्या पूर्वजांनी विशिष्ट दिवसच का बरे , " लंगन" दिवस सांगितले असतील.  आता परत वारांची मूळ नावे बघा.  काल मी पुनरावृत्ती करू या, म्हटले. एक clear करते. देव - भक्ती - उपवास व उपास हा काही फक्त बायकांचा प्रांत समजून नका. व्यायाम I mean JIM करता त्याचबरोबर fit राहण्यासाठी जे गरजेचे आहे, तेच नियम,  पूर्वजांनी ठरवून दिले आहेत. 

     प्रथम  आजचा, सोमवार, विचारात घेऊ. 

      सोम म्हणजे चंद्र वार. विशिष्ट सात दिवसांनी येणारा हा वार चंद्राच्या  अधिपत्याखाली असतो. म्हणजे त्याचा, या दिवसावर प्रभाव असतो. चतुर्थी या तिथींवर ही असतो.  त्यामुळे , " या" दिवशी जड अन्न पचत नाही म्हणून आपण सोमवारी NONVEG खाऊ नये, असे शास्त्र सांगते. नाही पटत. साधा प्रयोग करा.  

     सोमवारी/ शनिवारी पनीर पुरणपोळी  मैद्याचे पराठे / रवाबेसन लाडू  ४.५ खा. पचायला जड पडतात. तीच  quantity ( त्याच प्रमाणात)  इतर दिवशी  खा. फरक पाहा.  मग कळेल , आपल्या पूर्वजांने ज्ञान व अनुभवाचे बोल.  वर लिहिल्याप्रमाणे शनिवारही शनि ग्रहाच्या अधिपत्या खाली असतो. म्हणजेच आधिन असतो.  त्यामुळे  हे दोन्ही दिवस हवा व त्यातील humidity  ( जल अंश) च्या प्रमाणामुळे, आपल्या पचनसंस्थेवर परिणाम घडवत असतात. वरील प्रयोग करून बघा. सगळेच पाश्विमात्याचे बरोबर असेल, असे वाटत असेल तर त्या बाजूनेही नंतर विचार करू या.

     एक सांगा,  रवि - आदित्यवार ही दोन्ही सुर्याची नावे. . ENGLISH  मध्ये SUN म्हणजे सुर्य नं.  सोम म्हणजे  चंद्र तसेच ENGISH मध्ये MONDAY मन हा ग्रीक शब्द. तसेच शनि म्हणजे SATURN नं. बरे आपले वार पुराण व उपनिषदात लिहिले आहेत, ते खोटे नाही नं? मग अर्थ जाणून, त्याचा प्रभाव काय, हे ज्ञान शालेय/ कॉलेज जीवनात घेतले, तर काय हरकत  अाहे. परवाचे सुर्यग्रहण, २००० वर्षापूर्वी , आपल्या, उजैनच्या वेधशाळेत तिथीवार नोंदविले आहे. ते बघा. मुलांनो. तरूणांनो .पौढांनो तसेच जेष्ठ ( वृध्द *नाही म्हणायचे नं) नागरिकांनो, युरोप ट्रीप पेक्षा  उजैनची ( भोजराजाच्या काळातील) वेधशाळा व कृष्णाच्या गुरूंचे गुरू कुलाला भेट द्या. जीवनाचे सार्थक होईल.   *ही एक गंमत आहे. बोलू कधीतरी यावर. आजकालच्या   नातवांनी आजी आजोबा नाय बोलायचे. आईबाबा हाक द्यावयाची असते. असो. अंदाज अपना अपना.

     उजैनला एक घसरगुंडीच्या आकाराची वास्तू आहे. त्यावर  खुणांनी तिथी वार महिने व सुर्यचंद्र ग्रहण ऋतु अधोरेखित केली आहेत.५ हजार वर्षांची.  असो. अशा कित्येक माहितीचे गाठोडे माझ्याकडे अाहे. मी ते सर्वांकडे सुपुर्द करणार आहे.   या अाणि  वाचा व लुटा, हा ज्ञानाचा खजिना. लेखणी I mean finger touch बाजूला करता करता, एक गंमतीशीर सल्ला देते. कधीही युरोप सहली वरून परतलेल्या पौढ जोडप्याला व नुकतेच मुलांची लग्ने झाली अाहेत , अशा घरी  जाताना, सावधान, फोटो अल्बम दाखवून, व वर्णन सांगून सांगून पकवतात हो. एक तर आपण कोणाला ओळखत नसतो. वा स्थळे माहित नसतात. गरजही नसते. हं. चला आता मी ," बाय " करते, नाहीतर म्हणाल 🤗😂

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू