ठगाशी असावे महाठग. नको तो, जाने दो यारों attitude.

 २२.७ .२१ . गुरूवार. आषाढ शुक्ल त्रयोदशी. 

 काल आषाढी एकादशी झाली. विठुराया, तु मात्र कोरडाच राहिलास नं. ठिक आहे. पंढरपुरी तुला, मऽ ऽ ऽ हा पुजा मिळाली ना, मग झाले तर. निदान कार्तिकीला तरी. असो. सध्या मी माझे कर्तव्य करणार आहे. माझ्या लाडक्या रसिक व मनस्वी वाचकांना , ज्ञानेश्वरांच्या अभंग वाणीत, भक्तिरस पाजणार आहे.

  तर आधी कालच्याच दोन अभंगांचे सविस्तर रसग्रहण करू या. 

       पांडुरंग कांति दिव्य तेज झळकती ।

       रत्नकिळा फाकती प्रभा।

       अगणित लावण्यतेज पुंजाळले। 

       न वर्णवे तेथीची शोभा ।।१।।

       कानडा तो विठ्ठलु करनाटकु।

       येणे मज लावियेला वेधु।

       खोळ बंधी घेउनि खुणाची पालवी।

       आळविता नेदी सादु ।। २।।

       किळा म्हणजे अगणित. रत्नांची जणू खाणच त्या विठ्ठलाच्या आसमंतात फाकली आहे. म्हणजे पसरली आहे. तसेच लावण्य- सौंदर्याची पुंजी- सामावली आहे. जशी आपण, धनाची पुंजी जमा करतो, तशीच त्या परिसरात देखणेपणाची जणू पुंजीच जमा झालीय. अशी कि, ती अवर्णनिय आहे. शब्दात सांगता येणे, शक्य नाही. प्रत्येकाने स्वतःच स्वतःच्या नजरेनेच हा सुधारस आपलासा करावा. 

       आता कालची ओळ, कोणी म्हणेल, काल सांगितला नं, झाले तर! अंहं! फार मोठ्ठा गर्भतार्थ आहे, त्यात. हे विठ्ठल रखुमाई- हे आहेत नारायण लक्ष्मीचा जोडा. जणू कृष्ण रूक्मिणी. कानडा- खरेच त्यांचे गमक कळायला फार मोठी साधना पाहीजे. कोणा आजच्या गुरू/ गुरूमाऊलीची पुस्तके वाचून, ते सांगतात, त्याप्रमाणे थंड- निष्क्रिय होणे म्हणजे भक्ति नव्हे. आपले खरे गुरू एकनाथ- ज्ञानेश्वर- तुकाराम- रामदास प्रभुती आपल्याला कर्तव्य तत्पर होण्यास सांगतात. जे जीवन जगताय त्यात भावनेला जागा द्या. राग लोभ मद मत्सर जर मर्यादेत असले तर ते गुणच ठरतात. हां, त्यांच्या आहारी जाऊ नये. कृष्णाने, अर्जुनाला स्वकिय पण जुलमी कौरवांशी युध्दाला प्रवृत्त केले. असे नाही सांगितले, जाऊ देत रे, विसरून जा. तु मन शांत ठेव. आजकालची , " ही मंडळी" अशीच शिकवण देत आहेत. आपण सर्व विसरून जावे. शेजारी मेला. जाऊ देत.वाटेने जाताना अपघात दिसला तर , थंड राहा..त्यामुळे मला काय करायचेय, ही वृती वाढीस लागतेय. त्या गांधीच्या सल्लागत. कोणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा. वाचक म्हणतील, या अभंगाशी, या माझ्या लेक्चरशी काय संबंध आहे? जरूर आहे. Same thing I want you to explain. Then be attentive. and read carefully further sayings. फार जवळचा संबंध आहे. ह्या विठ्ठलाला, एक वीट देऊन, थांब म्हणणार्‍या , या पुंडरिकाचे कौतुक का बरे वाटतेय, कारण हा त्याचा भक्त हातचे, सेवेचे काम टाकून धावला नाही, तर माता पिताचे पाय चेपत राहिला. हे रूपक आहे. कर्तव्य तत्परतेचे. आता बघा. या दोन्ही आषाढी व कार्तिकी वार्‍या केव्हा असतात. नेमक्या पेरण्या झाल्यावर व कापणी झाल्यावर. म्हणजे त्या काळातली मुख्य शेतीची कामे आटोपल्यावर. .५.६ दिवस एक प्रकारचे धार्मिक get together च. परदेशीचा डान्सची गंमत व नवरात्रीचा धुडगुस मस्त. व वारी मात्र out dated म्हणून बंधनात. काय बोलायचे. तर विठ्ठल सांगतोय. duty first but feelings are also main aspect in life. 

       म्हणून दोघांनी, " आम्ही प्रतिक्षेत आहोत, हे दाखविण्यासाठी कर- हात कमरे वर ठेवले आहेत, विठोबा रखमाईने. कर- नाटकु- हात ठेवण्याची रीत- अभिनय. म्हणून करनाटकु. हेच समजून घेणे, जरा कठीण म्हणून कानडा. का नडा- का पुंडरिकाच्या मातृपितृ सेवेत बाधा आणायची. फुकट देवदेव करून भावनाशून्य व निष्क्रिय राहाण्यात भुषण बाळगू नका. समर्थ सांगतात कि, ठगाशी असावे, महाठग. अन् यातच दुनियेचे निसर्गाचे सौंदर्य टिकून राहणार आहे. हीच पांडुरंगाची प्रभा , आपलिशी करा. अहो, या काळ्या सावऴ्या विठुरायाला, पांडुरंग= धवल रंगी का म्हणतात , ते जाणून घ्या. आपले अंतरंग धवल असू द्यात. Be active not idle. तर भेटु या उद्या,अन् हे संत आपल्याला काय सांगत आहेत, ते जाणण्याचा प्रयास करू या.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू