धर्म व संस्कार व बोध व सावध व आदर्श.
१०. ७ .२१ . शनिवार. जेष्ठ अमावस्या.
हो. मी चुकले नाहीये. आज ही अमावस्या आहे. सुर्यादयाला ही तीच तिथी असली, तर दोन दिवस एकच तिथी धरतात.आपल्या प्रथेत व विश्वासात जरा अभ्यास करावा लागतो. म्हणून कानाडोळा करून चालत नाही. दुदैवाने आपल्यातील बरीचशी मंडळी, या सर्व प्रघात व पध्दतीवर लक्ष पुरवत नाहीत. जे उच्च समाजातील wel cultured आहेत. ते मुलांना फक्त अभ्यास व मार्क याची पाठराखण करीत वाढवतात. इतर धार्मिक सामाजिक बाबतीत तेही चार हात दूर असतात. आजचे पालक ही ह्याच लाईनवर वाढवले गेले आहेत. पुन्हा मी आपल्या शिक्षणपध्दतीवर घसरणार आहे. आपण हिंदू, या देशात बहुसंख्य असून ही आपल्या कायद्यानुसार, स्वातंत्र्यापासून, शाळेतून, धर्म शिक्षण देऊ शकत नाही. उलट मदरसा व कॉन्व्हेंट मधून सर्रास, त्यांच्या धर्माचे संस्कार करू शकतात. अाता बघा, आपल्या लहानपणापासून ७० वर्षे धार्मिक म्हणून फक्त, " मनाचे श्लोक", पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात. अर्थ समजून घेण्याबाबत, समस्त शिक्षण खाते व शिक्षक व पालक व मोठे झालेले विद्यार्थी वर्ग, अजिबात सावध नाहीत. त्यासाठी या लेखासोबत, माझी एक short film देत आहे, ती जरूर बघा, तरच मी काय सांगू इच्छिते, ते समजेल. अहो, परत परत मी हेच सांगू पाहतेय की, हे मनाचे श्लोक, मुलांसाठी अजिबात नाहीत. ते आपल्या पौढासाठी आहेत. अन् , "दासबोध" हा ग्रंथ समर्थांनी, विद्यार्थ्यांसाठी लिहीला आहे. जीवनात सावध राहून सुख व समाधान कसे मिळवावे, हा विषय, सामाजिक आहे नं? धर्म म्हणजे कर्तव्य. पण या इतर धर्मांत पंथाविषयी, कट्टर कसे असावे, ते लहानपणापासून मनावर बिंबविले जाते.
अगदी आजची कथा मी सांगत नाही. फार पूर्वी १८५१ साली, या मुंबईत, मुसलमानांचा मोठा दंगा झाला. हो . या मुंबईच्या निर्मितीसाठी जीवापाड झटणार्या, पारशांविरोधात. झाले असे कि एक पारशी गृहस्थ, एक नवीन उपक्रम म्हणून , " चित्रज्ञानदर्पण", नावाचे वर्तमानपत्र चालवत असत. त्यात ते, दरखेपेस लोकांतील नामांकित पुरूषांची चित्रे काढून त्यासोबत, त्यांची माहिती प्रसिध्द करीत. एका खेपेस, त्यांनी,पैगंबर महंमद यांचें चित्र काढून, त्या काळांप्रमाणे शिला छापावर, त्यांचा वृतांत लिहिला. पण झाले असे कि, चित्रात चेहर्यावर शाई पसरली गेली. बस या कारणाने , या समाजाने, दंगा केला. व दिसेल त्या पारश्याला मारहाण केली. त्यात इतर निर्दोषांनी ही मार खाल्ला. हा दंगा. त्यावेळच्या इंग्रज सरकारला आवरेना. खूप संपत्ती व जीवांचे नुकसान झाले. वर्षभर चालला.
माझ्या सुसंस्कृत विचारी वाचक हो, तर मला काय म्हणायचेय कि, सावध असणे, नेहमीच चांगले, पटलेय नं नाहीतर खरेच आपली नाहीतर आपल्या आजूबाजूस राहणार्यांची पारध होऊ शकते. मग असल्या घटनांचे पडसाद, निश्चितच आपल्या जीवनावर पडतात. लिहून ठेवा. हेच आज अल्पवयीन मुलींच्या बाबत घडत आहे. माझी मुलगी नाही नं, म्हणून बेसावध राहू नका. आपल्या मुलांमुलींना खरे धार्मिक शिक्षण द्या . जे आत्मबळ वाढवेल. योग्य अयोग्य समजावयास कामी येईल. कोणी स्पष्ट बोलत नाही. पण या कालच्या २०६ बेपत्ता केसेसचा, खोलवर जाऊन अभ्यास करणे, अत्यावश्यक आहे. वसईतील किल्ला, ह्या मंडळीच्या छुप्या भेटीचा बालेकिल्लाच झालाय. तर माझ्या वाचक हो, पारशी समाजाने व इतरजनांनी ही मुंबईनगरी उभारली, तिचे आदर्श नागरिक बनू या. निदान समस्त पालकवर्गाने- सख्खे शेजारी, सावध राहावे, हेच सच्चे नागरिकत्व.
मी जास्तच लिहितेय, पण रास्तच लिहिलेय, मान्य आहे नं? तर भेटत राहू या. शिक्षक बनू या. सगळ्यांची, ट्रेन पटरीवर असावी. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.👭👭👭👭👭.
Comments
Post a Comment