मधाळ भाषा व जमवा व्यवसायाचा गाशा.
१२. ७. २१. सोमवार. आषाढ शुक्ल द्वितिया.
आज पारशी अर्स्पदार्मद मासारंभ. त्यांच्या दृष्टीने महत्वाचा.
असो. काल मी दादर व पुणेच्या व्यवसायिकांचे सत्य सांगणार आहे, असे लिहिले. काल एक जोक सांगितला, पण ते निखालस सत्य होते. आज एक सत्य सांगणार आहे. पण तो जोक ठरू शकतो.
दादरला एक पूर्वीपासून साड्यांचे दुकान आहे. अर्थात् मराठी मालक. कृपया वाचल्यावर, माझ्यावर नाराज होऊ नका. फक्त विचार करा. आत शिरल्यावर विचारणा होते,
" कोणची साडी घेणार, कॉटन, वॉयल, कि सिल्क. किती पर्यंत हवी? मग प्रश्न येतो.रंग कोठचा वगैरे वगैरे .मग मोजकेच नग पुढे ठेवले जातात. बघा आटवले * का ठिकाण?😂 . मग हळूहळू सिंधी गुजराथी लोकांनी साड्यांची दुकाने टाकली.तेथला अनुभव! सगळा माल समोर उलघडला जाई, " काय पण वांधा नाय. बघा तर आवडेलच आपला माल." फरक सांगणे न लगे.
AND NO COMMENTS
आता माझा पुण्याचा अनुभव. एका प्रसिध्द मिठाईच्या दुकानात प्रवेशले. तेथील शिरस्त्याप्रमाणे लाईन लाऊन पैसे भरले. मग मिठाई घेण्याच्या लाईनीत उभी राहिले. तेथे मला नवीन पदार्थ दिसला. म्हणून पॅकेटस घेतल्यावर, त्याचा भाव विचारून, परत कॅशिअरच्या रांगेत उभी राहिले. माझ्या हातातील पॅकेटस पाहून म्हणे, एकदा काही ते घ्यावयाचे नं दोनदोनदा काय? पुन्हा काँऊटरला ही तीच मल्लिनाथी, " मघाशीच एकावेळी घ्यायचे ना?" मी म्हटले, " मी परत रांग लाऊन आलेय नं", तर तोंड ** आता बोला? माझ्याकडून NO COMMENTS. या उलट ==== असो. तर सांगायचा मुद्दा काय तर , गिर्हाईकाला खूश केले तर धंद्याला "बरकत" येते, हे गमक पाळले तर काय "हरकत" आहे अं? माल किती ही चांगला असला तरी मुखी गोडवा व SMILING FACE ठेवायला काय पैसा पडतो का? उलट आपण आनंदी व ग्राहक ही आनंदी. पटले नं. मग कोणाला तरी कमी पैशात एखादा व्यवसाय करण्यास उद्युक्त करा बरे! अन् माझ्या या लिखाणाचे चीज होऊ द्यात.
~~~~~~~~~
Comments
Post a Comment