आयुष्य महत्वाचे आहे, ते जपा. पण त्यासाठी साधन ही महत्वाचे आहे, ते जोखा.

 १३. ७ .२१ . मंगळवार. आषाढ शुक्ल तृतिया.

   मी काल व्यवसायासाठी must -मस्त आयडिया सांगितली. हसतमुख राहणे. तसे तर आपल्या जीवनात ही , ही संकल्पना नेहमी फायदेशीरच ठरते. नोकरीत boss शी yes sir करतोच नं, मग एखादा धंदा करावयाचा ठरवले तर  हे follow करायचे नं ! 

   यशस्वी जीवनाचे खरे रहस्य म्हणजे सदैव एक हातचा ठेवावा.  आता बघा, तुम्ही नोकरी करता, पण त्यात 

   सतरादा बदल करू नका. पण  दुसरे ही काही तरी करायची, तयारी, फक्त मनाचीच नव्हे तर practically ही तयारी ठेवा. दर महिन्याला थोडा तरी fund वेगळा काढून ठेवा. त्याला  any how हात लाऊ नका. तुम्हाला माहीत आहे का, इतर धर्मात कमाईच्या, विशिष्ट % त्यांच्या  धार्मिक संस्थांना देणगी दाखल देण्याची प्रथा असते. आपण जेव्हा मंदिरात जातो, तेव्हा देवाकडे विशिष्ट मागणी  घेऊनच जातो.  नाहीतर, त्या निमित्ताने  ट्रीप काढतो. पण निरपेक्ष दान देतो का? निदान स्वतःसाठी  emergency fund साठवा.    

   जाने/ फेब्रु २० च्या माझ्या blog मध्ये मी एक उल्लेख केला होता. या धंदेवाईक जमातीत एक प्रथा आहे. त्यांच्यात सगळेच व्यवसायिक असतात. त्यामुळे up and down ची सर्वांचीच तयारी असते. सर्वस्व, भांडवलात न टाकता व मिळालेला profit पूर्ण खर्च न करता, ते समाधानी जीवन जगतात. बघा कसे ते!  त्यांच्यातील एखादा जर धंद्यात नुकसानीत गेला, तर इतर परिचित व्यवसाईक, एक विशिष्ट दिवस ठरवून, त्याच्या सांत्वनाला भेटायला जातात. आणि अंदाज  काय बांधलात, ते काय करत असतील, आपल्यात असे झाले तर, काय बोलणे होईल, "  कशाला हा उद्योग केलास, तो कसा अाणि कोठे चुकला वगैरे. पण त्या सिंधी, मारवाडी व गुजराथी समाजात, अशा प्रसंगी जमलेले, हा , " प्रसंग" शब्द अक्षरशः जगतात. संग= साथ. प्र म्हणजे दिर्घ असलेली साथ.  ते निघताना, "त्या"  दिवाळं निघालेल्या व्यक्ती ज्या गादीवर बसलेली असते, त्याखाली यथाशक्ति, धन- पॅकेट ठेवतात.  तो एक तनधन व मनाचा सहानुभाव असतो. सहानुभूती( pity)नसते.  

   माझ्या अॉफिसमध्ये एक मारवाडी व्यक्ती होती. साधारण आमच्या सर्वांच्या मानाने, त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे होते. विचारणा केल्यावर,  उत्तर मिळाले, धुळे येथे त्यांचा  कपड्याचा फार मोठा कारोबार आहे. पण  ह्याची नोकरी ही त्या चार भावांच्या परिवाराची emergency security होती.जर धंद्यात खोट आलीच तर, ह्याने संपूर्ण कुंटुंबाची जबाबदारी  पत्करायची. बघा विचार करा. व ठरवा, अापल्या  व्यवसायिकतेचे धोरण. हां एकदा ठरवा production किंवा trading किंवा sale  काय करू शकू ते.अन् उतरा, एखाद्या व्यवसायात, मराठी मुलांनो.अरे बाबांनो, इथे भय भीड बाळगता. मग जेव्हा मित्रमंडळी बरोबर पिकनिकला जाता, तेव्हा मात्र नदीच्या खोलीची समुद्राच्या भरती अोहीटीची भीति न बाळगता, पाण्यात शिरता नं. म्हणजे जिथे जीवाची काळजी करायची तेथे बिनधास्त व जिथे हिंमत करून, बाजीगर व्हायचे तेथे पिच्छेहाट. हे सर्व वयाच्या व अार्थिक स्तराच्या लोकांना, माझे सांगणे आहे. त्यासाठी मुलांना सुट्ट्यातून कमवायला लावा.म्हणजे कमाईची किंमत समजेल. शिवाय vacation मधील timepass व  पोरेपोरींच्या मैत्रीत न गुरफटता, आपापसात, स्वकमाईबाबत चर्चा घडेल. अन् संकल्पनांची देवाण घेवाण होईल. त्यातून उज्वल भविष्य घडेल 👍👍👍👍👍.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू