पडावे पण योग्य ठिकाणी व योग्य कारणी.

 १४ .७ . २१ .बुधवार . आषाढ शुक्ल.चतुर्थी. 

  आजही आरंभीच एक मनोरंजक कल्पना. बघा, आजची तारीख नीट.  जुलै म्हणजे ७ ओके. दिनांक १४ ही संख्या  सात दुणे १४ अन् वर्ष २१ म्हणजे ७ त्रिक २१. आम्ही लहानपणी अशाच छोट्या छोट्या गोष्टीत गंमत शोधून आनंद मिळवायचो. आजकाल तर मोबाईल- टिव्ही - टॅब - कॉम्पूटर- लॅपटॉप- लॅपटॅब काय काय आहे, तरी मुलांमुलींना BORE होते. पालकांच्या नकळत पिकनिका काढतात. अन् त्याही धबधबे नदी समुद्र वगैरे. TRILL म्हणे. आधी पोहणे येत नसते कोणालाच. काल मी blog चा शेवट याच मुद्दावर केला होता. अरे जिगर दाखवायची तर धंद्यात , "पडून" दाखवा. अनोळखी स्थळी पाण्यात, 

  " पडून" कशाला?  नाहीतर,  प्रेमात " पडून"  कसले शौर्य दाखवता, अं?  असे काही  करून धनवान व्हा,की सगळ्याच्या नजरेत भराल. व मनात ठसाल. 

   हो, मला माहित आहे, माझे वाचक तरूण मंडळी आहेत, तसेच पौढ ही आहेत. ते म्हणतील, आता आमचा काय संबंध याच्याशी? अगदी direct नसला , आसमंतातील, सामाजिक पर्यावरण राखू शकता, सजग व  स्पष्ट बोलून. जर आजुबाजूस जर, असे , " हादसे"  टाळता आले तर प्रयत्न करा. अन् ," सातवी लाट" कोणाला खेचून नेणार नाही. यासाठी दक्ष रहा.नवीन वाचक हो,या माझ्या दोन्ही Short films  बघा. आणि ज्यांनी त्या आधी पाहिल्यात, त्यांनी पुन्हा पहा. व त्यावर विचार करा.






Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू