पॅपिलॉन हे एक पुस्तकच साहस व हिंमत वाढवील. जसे राम:- रा= शक्ती.म= असणे. आत्मशक्ती. क्षमता.

 १५ .७ .२१ .गुरूवार. आषाढ शुक्ल पंचमी/ कुमार षष्ठी.

काल मी, तुम्हा वाचकांना, माझ्या दोन short film बघावयास सांगितल्या, त्या काही timepass म्हणून नव्हे, तर फार मोठा ज्वलंत विषय आहे हा. मुलांना मोकळीक देण्याची कल्पना, पालकांच्यात वाढीस लागली. व ही समस्या निर्माण झाली. हेच खरे आहे कि, ह्याची सुरूवात नक्कीच birthday party मनमुराद सहलींतून झालीय.

अन्  जल- वर्षासहली धबधबे नद्या समुद्र हेच ह्याचे आकर्षण असते. पण fact is that they doesn't know the swimming, not the natural's  rules. 

        म्हणून , मी सर्व मुलांचे व पालकांचे डोळे उघडण्यासाठी, नोव्हे १९ मध्ये "हादसे" व जाने २० त         " सातवी लाट" ह्या लघुपटांची निर्मिती केली. plan होता कि, कॉलेजमधून, मुलांची meeting घेऊन, ह्या फिल्म्स दाखवून चर्चा घडवायची. पण मार्च२० पासून कोरोना अन् त्यापायी झालेला lockdown. कॉलेजेस on line  सुरू झाली. मग plan फसला. पण हादसे होत राहिले. या दिड वर्षात शेकडोंनी प्राण गमावले. " गंगा उल्टी बह गयी और माँ बाप पिछे रहे। 

        मी या कॉलेज व सोसायटी भेटीतून समुद्राच्या बाबत सातवी लाट काय कहर करू शकते व भरती ओहोटीचे नेमके तंत्र समजाऊन सांगणार होते. पण -----

         आज मी सातवी लाट या विषयी लिहित आहे. हे सत्य लहानथोर सगळ्यांनी जाणून घेणे, अत्यंत गरजेचे आहे.

         हा नेमका शोध कोणी व कसा लावला, ही एक रंजक व रहस्यमय कथा आहे. ही कथा आहे, एका फ्रेंच मुलाची. तो फक्त १६.१७ वर्षाचा होता. त्याचे नाव- हेनरी शेरिअर. त्याला सर्व , "पॅपिलॉन" म्हणत. पॅपिलॉन म्हणजे फ्रेंचमध्ये फुलपाखरू. तो होताच स्वच्छंदी. पण एका विचित्र क्षणी, एका खूनाचा आरोप त्याच्यावर ठेवला गेला. actually एका उमरावाला वाचविण्यासाठी, त्याचा बळी घेतला गेला.

    आणि ३५ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा दिली गेली. तेव्हाच्या त्यांच्या पध्दतीप्रमाणे, त्याला, एका बेटाच्या तुरूंगात रवाना केले. तो मनाशी तडफडला. त्याने त्या जज्जवर खुन्नस ठेवला अन् कसे ही या बेटावरून निसटायचेच व सूड घ्यायचा, असे मनात ठेवून, त्या हाल अपेष्टात जिवंत राहीला. त्या बेटावर इतका छळ असे कि, बहुदा कैदी, दम तोडत असत. या अथांग सागरातून पलायन करण्यासाठी त्याने ८.१० वर्षात सहा वेळा प्रयत्न केला. ५ वेळा पकडला गेला. व जास्तीच सक्त व्यवहार, त्याच्या बरोबर झाला. हे सर्व अनुभव त्याने, सुटका करवून घेतल्यावर लिहून ठेवले. तर मुख्य सांगायचे म्हणजे या प्रयासात, त्याने शोध लावला कि, एक मोठी लाट अाली कि, त्यानंतरची प्रत्येक सातवी   लाट जोरदार येते व तेवढीच जोराने अापल्याला सागरात खेचते. अर्थात त्याने याचा उपयोग, नारळाच्या तरफाच्या आधारे पळून जाण्यासाठी केला. हा त्याचा शोध, पुढे सागरी विज्ञानात, " पॅपिलॉन लाट" म्हणूनच ओळखला जाऊ लागला. 

    मात्र याचा उलटा अर्थ व उपयोग, पोहताना स्वतःला बचावण्या साठी करायचा असतो. तसेच तिथीप्रमाणे भरती ओहोटीचे शास्त्र आहे. निसर्ग ते अगदी नियमितपणे पाळतो. ते तंत्र समजून घेऊनच पाण्यात उतरावयाचे असते.

    जेव्हा ओहोटी सुरू होते, तेव्हा समुद्र, आपल्याला अात खेचतो. आणि अज्ञानी मंडळी पाणी कमी म्हणुन तेव्हाच पाण्यात उतरतात. अगदी लहान मुलांना , लाटेवर धरतात. हे सर्व तंत्र  सविस्तर सांगावयाचा , माझा यत्न आहे. हा यत्न तो देव मानावा. व इतरांना कळवावा.  उद्या ते भरती ओहोटीचे कोष्टक देते. ते save करून ठेवा व share करा.

     हो आणि, गंमत ही कि, हा हेनरी होता नं, तो त्या जज्ज व जुरीच्या खुन्नसपायी जगला व त्याने त्या जज्जचा शोध घेतला. मध्यंतरी २०.२२ वर्षे गेली होती व त्या बुजुर्ग म्हातार्‍या समोर गेल्यावर, हेनरीला आकलन झाले कि, ह्याच माणसाच्या आठवणीने, आपल्याला जगवले.  व तो फक्त ," हॅलो" करून मागे फिरला. व ते सर्व अनुभव त्याने लिहून काढले व पुस्तक प्रकाशित केले. फ्रेंच जनतेला त्या पुस्तकाने वेड लावले. अनेक प्रतींची विक्री झाली. जगातील सर्व भाषातून भाषांतरे झाली. जवळजवळ सर्व भारतिय भाषेत याचीे भाषांतर आहे. आपल्या मराठीतील झालेला जबरदस्त खप , " मेहता प्रकाशनाला विचारा. ते इतके मनोरंजक व मनोवेधक व प्रबोधक आहे कि, मी स्वतः, tension आले तर, त्या पुस्तकाचे कोणतेही पान उघडते व स्वतःला सावरते.  अशी हिंमत व जिद्द पाहिजे, संकटावर मात करण्यासाठी. 

     अनं ही हेनरीची साता उत्तराची कहाणी, त्याला एका पुस्तकावर, करोडोची संपत्ती, मिळवून देती झाली.

     तर माझा मूळ मुद्दा काय, तर निश्चय करा.व हिंमतीने तडीस न्या.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू