आ बैल मुझे मार. मी घाबरत नाहीये.
१६.७.२१ . शुक्रवार. आषाढ शुक्ल. विवस्वत सप्तमी.
अाजचा दिवस खरे तर शुभ दिवस. पण हा मी निवडलेला विषय जऽरा शुभ म्हणता येईल का? तसे तर नाही. पण आपणच आपले दिवस शुभ व मंगलमय ठरवू शकतो.
हिंदीत एक म्हण आहे, " जान है, तो जहाँ है। मला मान्य आहे आज कोरोनाच्या काळात lockdown मुळे, सर्वसामान्य जनतेला," trains allowed नाहीत. त्यामुळे कमाईची साधने, प्राप्त करावयाची तर प्रवास MUST आहे. अन् मुंबईत ट्रेनला पर्याय नाही. स्टेशनमध्ये शिरकाव होण्यासाठी. तिकिट मिळत नाही. मग दुसरा मार्ग- आडमार्ग पत्करण्यास लोक मजबूर होतात. without ticket travelling. मग TC पासून बचावण्यासाठी, ट्रेनमधून उतरल्या नंतर, लाईनीतून चालत जाऊन, फट असेल, तेथून बाहेर पडणे. हा अपराध अाहे, माहित असून ही हाच मार्ग पत्करला जातोय. पण जरा सावध राहा नं! ज्या रूळावरून चालता , तेथे गाडी नाही, ह्याची खात्री करा. आता कालच्या "लोकसत्ता" तील बातमी बघा.
डोळे भरून आले.
" रूळ ओलांडताना तीन दिवसात १८ जणांचा मृत्यु."
१०जुलै- सातजण. ११जुलै- आठजण. १२ जुलै-तीनजण.
मुळात , आपल्या मुंबईकरांना रूळ ओलांडणे, भूषणच वाटते. २वर्षापूर्वी युट्यबवर, एक episode ( एकूण १६ त्यातील दुसरा) upload केला होता. कित्येकजण पुलावरून जाण्यार्या आम्हाला डरपोक म्हणतात. पण पुलावरून , गर्दीतून जाण्यास ३मि.लागतात. तर लाईन क्रॉस करून गेले, तर १ मिनिटात जातात. मिनिटे वाचवून, असा कोठचा तीर मारायचा असतो. अन् ते ही कसे तर ज्या गाडीतून उतरले, त्याच गाडीच्या पुढून धावपळ करायची.नंतर मात्र आरामात चालायचे. मग ऐकाच तो माझा एपिसोड. कालप्रमाणे परत परत सांगते , हे विषय कधीही शिळे होत नाहीत. फक्त या मानवी जीवाचे रूपांतर, आत्म्यात होण्याची शक्यता, आपणच ओढवून घेतो. म्हणतात नं, " आ बैल मुझे मार" तशातली गत हो. निदान हा प्रकार करताना मोबाईलचा ear phone तरी उतरवून ठेवण्यास काही हरकत आहे.सध्या नेहमीसारख्या दर ३मि.नी गाड्या नाहीत. जरा सबुरीने व सावधतेने, लाईनीतून चालावे नं! ऐका तर मग. आणि हो .तुम्ही स्वतःला हुश्शार व जिगरबाज मानता व लाईनीत उतरता, पण त्या मोटरमनवर काय, अत्याचार करता, काही कल्पना आहे? अघटित घडत नाही, तुम्ही उडी मारून, फुशारत पुढे जाता, पण त्या मोटरमनच्या ह्रदयाचा ठोका, चुकवण्यास किती वेळा व कितीजण, कारणीभूत होत असता. विचार करा. निदान ट्रेन जवळ अाल्यावर तरी असला मुर्खासारखी साहसे करू नका. हे कित्येक पौढ महिला ही करतात. असो पंचागातील, " शुभ दिवस" आपल्यासाठी शुभच "राखा." अन् असले हादसे "रोखा" हेच तत्व, रस्ता क्रॉस करताना ही पाळा. ओके. Then be with me and follow my little- little tips . Be always happy and safe. कल फिर मिलेंगे।
Comments
Post a Comment