वारकर्‍यांची आषाढी एकादशी व विठुरायाचे वारकरी. भेटी लावी जिवा.

 १९.७.२१ . सोमवार. आषाढ शुक्ल दशमी.

   आज दशमी म्हणजे उद्या आषाढी एकादशी. पंढरपूरची यात्रा.

    विठुरायाच्या भेटीने, जमणारी भक्तांची मांदियाळी. वर्षोनुवर्षे, अमाप मंडळी, पुर्‍या महाराष्ट्रातून वारी काढून येतात. पण कशी शिस्तबध्द. जणू कवायतच. जशी सैनिकांची परेड, दोनांत अंतर ठेऊन left right करतात, अगदी तसेऽच, लेझीमच्या तालावर, " ज्ञानबा तुकाराम", करीत संथ गतीने पुढे सरकते, ही मानवी साखळी.  तर सांगायचे,  म्हणजे हा सराव आपआपल्या गावी करतात. पण एकत्र आल्यावर त्या समस्त भक्तांचा ठेका, जणू सर्वाचे हात ऐकमेकांना बांधल्यागत. "ज्ञानबा" ला  हात वर लेझीमवर तो सूर ही ज्ञानबाच शब्द बोलतो. अन् " तुकाराम" ला हात खाली, तो ठेका दिर्घ- चार अक्षरी. दोन्ही नाद जुळतात.  या वारीत , गंमत म्हणजे सदैव, आपसूकच social distance पाळले जातेय. सालोसाल. हा कोरोना आत्ता आला. अाता गंमत sorry  ही बाब तर तशी गांभिर्यानी विचारात घ्यावयास हवी.   अाज पंढरपूरात प्रवेश बंदी. पण याच कोरोना काळात तेथे  निवडणूकीची एक सभा घेतली होती, आठवतेय. ना मास्क ना सोशल डिस्टन्स.  तेथे काय कोरोनाचे जंतु प्रवेश करणार नव्हते. पण  युगेयुगे चाललेलीही भक्तांची शिस्त नजरे आड केली जातेय. पण पाठोपाठ येणारी ईद मात्र दिमाखात साजरी होईल. काय बोलायचे यावर. आपण सर्वच मनात आणतो कि, नाहीतरी आपण तर वारीला जातच नाही. मग how we are concern with this? बातमी ऐकायची अन् फुस्स्!पण जे जातात, आयुष्यभर जायचे ठरवतात. तीच एक दर्शनाची आस मनी बाळगून असतात, त्यांचे काय? कधी टीव्हीवर वारी पाहीलीच  असेल, ते जेव्हा रिंगण खेळतात, तेव्हा तो खेळ पाहण्या आधी तो जो गोल तयार करण्यासाठी रांगेतले लोक मागे सरकतात, ते खरेच पाहण्यासारखे असते. पाठीपाठी सरकतात, पण अगदी धक्काबुक्की नाही. Really fantastic actions with discipline. मागल्या वर्षी मात्र असे झाले कि, सर्वांना बंदी होती. पण विशिष्ट पदाच्या जोरावर एक कुंटुंब महापूजेला पोहोचले. पण~ पण चिरंजीवाचा जीव म्हणे, गाभार्‍यात गुदमरला, अन् ते बाहेर येऊन बसले. ज्यांनी ज्यांनी, एकदा तरी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेतलेय, त्यांनी नीट आठवून सांगा बरे, तो गाभारा किंवा शिर्डीचा गाभारा, कोणाचा जीव कोंडण्या इतपत लहान आहे का? आपण तर बेस गर्दीत दर्शन घेतो, एका वेळेस किती मंडळी असतात बरे, त्या गाभार्‍यात व  बाहेर पडतोच  नं सही सलामत?  मी लिहावे का नाही विचार करतेय.पण राहवत नाही. जर एखाद्या पर्यटन मंत्र्याला, गडावर चढायला लागले/ गुहेत शिरायला लागले तर ---- जमले पाहिजे ना? पर्यटन फक्त थंड हवेच्या ठिकाणीच असते का?  नर्मदा परिक्रमा- काय सहल आहे. 

     आता वळू या, समुद्र सहलीकडे. 

     त्या निसर्गाची अशी किमया- perfect planning  असते कि, दर पोर्णिमा/ अमावस्येला रात्री १२ वाजता व दुपारी १२वाजता भरती असते आणि बरोबर ६ तासाने पहाटे  वाजता ६ वाजता व संध्याकाळी ६ वाजता ओहोटी असते. म्हणजे या दोन दिवशी भरती ओसरते तेव्हा, पाणी अापल्याला आत खेचते. पण ओहोटी संपते, तेव्हा पाणी किनार्‍याकडे येत असते. म्हणून हा काळ, समुद्रात उतरण्यास safe असतो.  हे कोष्टक असे असते कि १२ तास म्हणजे  १२* ६०= ७२० मिनिटे १५ दिवसात वाटली जातात. ७२० * १५=४८ मिनिटे दर तिथीला तेवढी  add करायची. मग त्या तिथीची भरती व ओहोटीची वेळ मिळेल. मग simple thing  ओहोटी संपून पाणी किनार्‍याकडे येऊ लागले कि, बिनधास्त उतरावे,समुद्रात. हां. आपल्या तिथी कधी कधी दोन दिवस असतात. तर gap असते.म्हणून ५.७ मिनिटे मागे पुढे होऊ शकतात.  "पर्यटन" म्हटले कि, त्या त्या स्थळीचे नियम जाणून घेतलेच पाहिजेत. नाही तर सर्व विठुरायाच्या भक्तांना lock down स्वतःच फक्त केलेले दर्शन लाभत नाही हो. असो. आपली बहुजनांची रीत आहे नं,जाऊ देत, झाले, मला काय करायचेय!  मला तेच जमत नाही न‍ा! But I am proud of my this attitude. And I wish you also, atleast, agree with me. then फिर कल मिलेंगे। जय हरी विठ्ठल। विठ्ठला पाडुरंगा, भक्तांचा हो.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू