जय हरि विठ्ठल, जय हरि विठ्ठल। ज्ञानबा- तुकाराम।

 २०.७ .२१ . मंगळवार. आषाढी एकादशी.

आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाचा परमानंदाचा दिन. त्याची भक्त भेटीची पर्वणी.

भक्त कसे तर राहत्या जागेपासून म्हणजे अनेक गावागावातून चालत - भक्तीरंगात नाहून नाचत येतात.अन् विठ्ठलाच्या लाडक्या भक्तांच्या नावाचा जप करीत येतात. तुकोबासाठी तर खुद्द विष्णुने गरूडाला पुष्पक विमानाने सदेह स्वर्गी नेले. ज्ञानोबा तर जन्मलेच कृष्णाष्टमीला. निवृत्ती- ज्ञानदेव- सोपान - हे तर त्रिमुर्तीच शंकर- विष्णू- ब्रम्हा आणि मुक्ताई- आदिमाता.  विठ्ठल- रखुमाई म्हणजे लक्ष्मी नारायणच. त्यांनीच कलियुगात ज्ञानदेवाचा अवतार घेतला.  अन् स्वतः अर्जुनाला सागितलेली गीता, सांप्रत प्रचलित असलेल्या प्राकृत भाषेत  लिहिली. तीच ज्ञानेश्वरी. तुकारामांची गाथा तर सामान्यांना साधा सरळ भक्ती मार्ग सांगते. तर या दोन्ही भक्तश्रेष्ठांचा जप करीत, जी, "पाऊले चालती पंढरीची वाट" ती रोखू नये. तर त्या भक्तांच्या, काल वर्णन केलेल्या शिस्तीचा मान राखा, ही मनोमन विनंती. यापुढे विठुरायाची मर्जी. बा विठ्ठला, तुला आठवत असेल, ४ वर्षामागे, याच आषाढी एकादशीला, भर पावसात भिजत, पण भक्तिरसात चिंब होत, तुझी वारी करणार्‍याला, याच वारकर्‍यांचा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला होता.  भक्तीरंगात रंगलेल्या या सर्व वारकर्‍यांना रेनकोट दिले होते. ते ही कसे पिवळे पितांबराच्या वर्णाचे. त्या वर्षी वार्‍या बघताना, असे वाटले कि, जणू  सगळीकडे, जेजुरीचा  भंडारा उधळल्यागत  हळदीच्या रंगाने धरती न्हाऊन निघालीय. पण तु पांडुरंगाला, आमच्यावर का बरे रुसलास?  आणि त्या  रेनकोटदात्याला, आम्हापासून दूर केलेस?  माफ कर, विठुराया त्यात ही तुझा काहीतरी plan असणार. त्यांच्या हातून फार मोठे वेगळे सत्कार्य घडवायचे असेल तुला! आणि ते घडतेच आहे. सर्व साधारण पदावरून पाय उतार झाल्यावर कोणी जनतेचा विचार ही करत नाही. पण हे आपले, "देवांचा राजा"  हे नाव सार्थ करीत आहेत. मी वय वर्षे ७०.पण त्यांच्या नित्यकार्याला प्रणाम करते.  नुसतेच शंकराच्या नावाने , जनतेला हे देईन- ते देईन म्हणतात, काही जण. पण पूर्णत्वाच्या नावाने इल्ले.

असो. आता हे वारकरी जेव्हा आषाढी एकादशीला, पंढरीची वारी करतात, तेव्हा चातुर्मासाचे वसा धरतात. म्हणजे  कार्तिकी एकादशीला परत पंढरपुरी येईपर्यंत, विशिष्ट व्रत असते. चार महिने-  एखादी गोष्ट सोडणे- दर रोज विशिष्ट नामाचा, ठरलेल्या संख्येत जप करणे- पोथी वाचन वगैरे. मग ते पुण्य कार्तिक एकादशीला, पांडुरंगाच्या  पायी समर्पित करायचे. जनताजनार्दनाच्या भल्यासाठी. पण आज तो विठुराया,वाट पाहतोय, आपल्या सच्चा भक्तांची. आधीच, पुंडरिकाने, त्या मुखी देवाचे नाव घेत, मातापित्यांची सेवा  करणार्‍या, भक्ताने एक वीट देऊन, त्याला युगेयुगे उभे केलेय व चार पावले मागे रखुमाई कौतुकाने बघत तिष्ठत उभी आहे. आता सांप्रत, आजचे भक्त बंदिवासात. 😂😂

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू