मूळच्या बकाल, मुंबईचे आजचे संपन्न रूप कसे मिळालेय.

 ३ .७ .२१ . शनिवार जेष्ठ कृष्ण नवमी.


 सर्व प्रथम, मी एका बाबतीत sorry म्हणते,काय झाले कि, घाई घाईत मी परवाच्या तपासण्याचा खर्च लिहिताना, आधी चुकून १ टाकला व amt एका digit ने वाढली, ५०००च्या ऐवजी १५००० पडले. अशाच अफवा पसरतात. भय व चिंता पसरते. so extremely sorry.  

  आता येऊ या मूळ विषयाकडे.  ५.६ दिवसापूर्वी, मी आपल्या मुंबईच्या इतिहास व भूगोलाविषय़ी लिहिण्याचे कबूल केले होते.  अगदी मुंबईच्या तळागाळापासून आरंभ करू या. 

      आज वैभवसंपन्न असणारी मुंबईनगरी, एके काळी बकाल व हमखास आजाराला आवतण देणारी होती, यावर विश्वास बसणार नाही. पण हे त्रिकालबाधित सत्य आहे. मुंबई सात बेटांची होती. हे तर मान्य आहे नं? 

       मुंबई शहराची मूळ परिस्थिती कशी होती व आताची स्थिती तिला कशी व कोणामुळे मिळाली आहे, याची माहिती आपल्याला , जे स्वतःला मुंबईकर म्हणवतात, rather मुंबई आमचीच मानतात, त्यांनी इत्थंभूत समजून घेणे, आवश्यक आहेच , पण इतर भारतियांनी ही जाणून घेणे, गरजेचे आहे. १६७२ मध्ये , म्हणजे, रायगडी,  आपल्या मराठी राज्याला, शिवबाच्या रूपाने राजा मिळाला. त्यांना राज्याभिषेक होऊन आपल्या मराठी राज्याला छत्रपती लाभले, तेव्हा या आजच्या मुंबईची स्थिती भयावह होती. 

       त्या काळातील बरीचशी मुंबई म्हणजे लाटांच्या मार्‍यांनी धुतली जाणारी दलदल होती. सगळीकडे अगदी , " रोगट अशी दुर्गंधी", सुटलेली असायची. सात बेटे मिळून झालेली ही मुंबई सलग जोडलेली नव्हती. तिथे सुरूवातीला आलेले रहिवासी,  माश्या मराव्यात तसे मरून गेले होते. सतराव्या शतकाच्या अखेरीस जॉन ओव्हिंग्टन बरोबर जे २४ उतारू आले हौते, त्यातील वीसजण पहिला पावसाळा संपण्याआधीच मरण पावले. हा पावसाळा त्यांचे हालत वाईट करून गेला.  विषेशतः युरोपिय़न मुलांचे मृत्युचे प्रमाण,  ह्या मुंबईत  भयंकर होते. 

       पण ह्या सतत कोसळणार्‍या संकटांना कसेबसे तोंड देत, ब्रिटीश तग धरून  होते. व,त्यांनी" काही झाले तरी मुंबई शहराची सुधारणा व  लोकवस्ती वाढवण्याची महत्वाकांक्षी योजना", आखण्यास सुरूवात केली.  सर्वकडे चिखलांची  दलदल असून, या जिद्दी  ब्रिटीशांमुळे, आपल्या या आजच्या मुंबईनगरीची मुहूर्तमेढ उभारली आहे, हे आपण विसरता कामा नये. आपल्या पुराणात. अगस्ती मुनींनी समुद्र  प्यायला. परशुरामांनी समुद्र  लोटला, या कल्पना ब्रिटीशांनी सत्यात उतरविल्या, हे सत्य आपण विसरता कामा नये. अजूनही खूप इतिहास आहे, तो जाणून घेऊ या. पारशी, सिंधी गुजराथी मारवाडी, कामाठी सर्वांचा ह्या मुंबईनगरीच्या उभारणीला हातभार लागलेला आहे. ह्याकडे आपली नेते मंडळी काणाडोळा करतात व, आजच्या मुलांकडून घोषणा करवतात कि, " मुंबई आहे आमची, नाही कोणाच्या बापाची" वगैरे. हे कितपत बरोबर आहे, ते तुम्हीच ठरवा, बरे. हे सत्य वाचा. व या पुढच्या पिढीला अपशब्द व अप प्रचारापासून वाचवा. खूप काही आहे. भेट देत रहा. वाचत रहा. हे सत्य.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू