जैसे को तैसा मिला तो ही जिंदगी में मजा रहेगा।

 २३.७ .२१ . शुक्रवार. आषाढी चतुर्दशी व पौर्णिमा ही. म्हणजेच गुरूपौर्णिमा.

    म्हणूनच, वाचक हो, काल मी लिहिले कि, उद्या- आज आपण, आपल्या खर्‍या गुरूंना भेटू या. अर्थात् त्यांनी त्यांच्या ग्रंथातून, जे काही लिखाण केलेय, ते जाणून घेऊ या. ज्या योगे आपले भलेच होईल. कारण ते आपल्याला एका जागी बसून देवदेव न करता,सामाजिक व मानसिक व पारिवारिक समाधान कसे मिळवायचे, ते सांगतात. हो, हे खरे कि, ज्ञानदेव- रामदास स्वामी प्रपंचात पडले नाहीत आणि तुकाराम महाराज  कुटुंबात, कमलपत्रागत राहिले. पण त्यामुळे या त्रिमुर्ती आपल्याच परिवारात अडकून न पडता, त्या पल्याड पाहू शकले. 

     या तिघांनी कधीच, सदैव, अगदी अपराध्यांशी ही क्षमाशील राहा,असे सांगितले नाही. उलट या प्रकाराने, सामाजिक समतोल बिघडेल,असेच ठासून सांगितले. अन् ते कोणी तरी करील. आपण बसावे चूप, हे चूक आहे, हेच कानीकपाळी ओरडून(वाचार्थाने) प्रतिपादन केले.

      बघा,  कालचा लेख आठवतोय नं? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ठगाशी असावे ठग। ते काही असे नाही म्हणत, ठगांना करून द्या काहीही.  तुम्ही, मनाची शांति ठेवा व बघत बसा.  आपला अपराध काही परके नाही करत. कधी कधी , मैत्र ही, जीवाची करते, फसवणूक.

      तर हे संत आपल्यातला सजग व सावध राहण्यास सांगतात. बघा, संत तुकोबा काय सांगतात,

      मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास।

      कठीण व्रजास भेदू  ऐसे।

      मेले जित असो निजोनिया जागे। 

      जो जो जे मागे ते ते देऊ।

      भले तरि देऊ कासेची लंगोटी।

       नाठाळाच्या माथी  हाणू काठी.

       मायबापाहूनि बहु मायावंत।

       करू घातपात शत्रुहुनि।

       अमृत ते काय गोड आम्हापुढे।

       विष ते बापुडे कडू किती।

       तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड।

       ज्याचे पुरे कोड त्याचे परि।

       आता नीट समजून घ्या, हे संत आपल्याला काय सांगतात. ते काही , आपल्याऽ ऽ ला काऽय करायचेय, असे म्हणत, भावना शून्य बनायला सांगत नाहीत. 

       संत तुकाराम, " आम्ही" लिहितात, ते काही स्वतःसाठी नाही, तर जो/ जी हे वाचेल, त्या व्यक्तिसाठीच अभिप्रेत आहे. प्रत्येक वाचक, " तुकारामांची गाथा/ अभंग वाचेल'त्यावेळी ते त्यासच लागू असेल. म्हणजे आपण कसे असायला पाहिजे तर मेणासारखे मऊ ही व वज्रासारखे कठीण ही.  जे जे मागेल म्हणजे जसे वर्तन करील त्याच  प्रमाणे, त्याला in return देऊ.जैसे को तैसा मिलेगा। भल्याला अगदी लंगोटी काढून देऊ, म्हणजे जीवापाड करू. पण जो नाठाळपणे वागेेल, त्याच्या माथी काठी हाणू. आता बघा, आपण खरेच एखादी काठी उचलून, कोणाचे डोके नाही, फोडायचेय. पण जो/ जी आपल्या सुखीसमाधानी जीवनाशी  नाहक, "खिलवाड" करील, त्या व्यक्तीला " सबक" शिकवू.    आपण सर्वांवर आईवडिलांसारखी माया करू या. पण घातपात- धोका देणार्‍याचे, शत्रूच होऊ. कळले काय संताचे बोल? कहते है नं, " जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया.😀. 

        ते, आपल्याला चांगल्याशी, अमृताहुनि गोड वागायला सांगतात. पण  वाईटांशी असे वर्तन असावे कि,  कि त्या उपायापुढे विषाचा कडवेपणा ही फिका(बापुडा) ठरावा.  हे समस्त संतमंडळी, त्या काळात,मोगलाईला ( दुष्ट प्रवृतीला) विरोध करा, असे कळवळून सांगत होती. बाया बापड्यांना पळवून नेत असताना, गप्प बसणे, हा ही अपराध ठरतो. तेव्हा अगदी कँगना /अर्णब  येवढी हिंमत नसेल, पण करिश्मा भोसले तरी बना. निदान अशा  व्यक्तिंना पाठिंबा द्या.  Again I am requesting you to be active and   atleast speak against mis leadings. 

तर उद्या या संतांची आणखी शिकवण ज्ञात करू या व जमल्यास त्यांची अपेक्षापूर्ती करू या. ओके.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू