गुरू हे समक्ष च असतात. फक्त त्यांची ओळख पटणे, महत्वाचे होय.

 २४.७ .२१ . आषाढ कृष्ण प्रतिपदा. 

गुरूपौर्णिमा झाली. संपले आपले कर्तव्य. असे नसते, हो, वाचकांनो. उलट आजपासून, आपल्याला संत वाङमय आपल्यासाठी, सर्व लहानथोरांसाठी आहे, ह्याची जाणिव झाली आहे. तेव्हा ह्या साहित्याचा मागोवा घेणे,हाच खरा आनंद मार्ग अाहे. हे सत्य समजले आहे. संताचे ग्रंथ वाचणे, हे म्हातारपणीचे काम - आपण नंतर बघून घेऊ. असे म्हणू नका. आपण बर्‍याचवेळी  पूजा अर्चा याचे एक तर स्तोम माजवतो. नाहीतर आपले धर्मकर्म पाळण्याचा संकोच करतो.  याबाबत मी एक दाखला देणार आहे. खरेच हे कौतुकास्पद आहे. मी या फेब्रुवारीत, माझ्या भाच्याच्या, दिपेशच्या लग्नाला गेले होते. तेथे त्याच्या मित्राची आई, गुलशन खोजा आली होती. बाहेरगावी असल्याने, दोन दिवस एकत्र होतो. मैत्री झाली. लग्नाचे रिशेप्शन सुरू झाले. आम्ही एकत्र बसलो होतो. त्यांची नमाजची वेळ झाली. अन् तिने शांतपणे बसल्या जागीच अगदी हळू नमाज सुरू केला.  तिचे पुर्ण झाल्यावर, ती माझ्याहून लहान असून, मी तिला हात जोडले. याला म्हणतात, - नेम. 

 आपल्यातील ९०% लोकांनी, काय केले असते, JUST IMAGINE. Don't be angry with me. 

  असो. माझा , " धर्म- कर्तव्य" मला सांगतो कि, चांगल्याचे तोंड भरून कौतुक करावे. पण वाईटाला नावे ठेवण्याची ही हिंमत बाळगावी. 

  ओके. अाता आपण संत तुकारामांचा हा अभंग पाहू.

     अहर्निशी सदा परमार्थ करावा।

      पाय न ठेवावा आडमार्गी  ।।१।।

      आडमार्गी कोणी जन जाती ।

      त्यातुनि काढील तो ज्ञानी ।। २ ।। 

      तोचि ज्ञानी खरा दुजीयांसी ।

      वेळोवेळी त्यास शरण जावे ।।३ ।।

      आपण तरेल नव्हे ते नवल ।

      कुळे उध्दरील सर्वांची तो ।।४।। 

      शरण गेलियाने काय  होते फळ।

      तुका म्हणे कुळ उध्दरिल ।। ५ ।। 

       अहर्निश-  रात्रंदिन सदैव परमार्थ करावा. म्हणजे देवापुढेच १.२ तास बसावयाला, तुकोबा सांगत नाहीत, तर नीत दिन परम=इतरांचे अर्थी जगावे. इतर जनांसाठी कार्य करावे.अन् विशिष्ट वेळी देवाचे नाव घ्यावे. कोणी आड( चुकीच्या) मार्गाने जाऊ नये. अन् जे जात असतील,  त्यांना योग्य मार्ग दाखवावा. जो/ जी  अशाप्रकारे चुकल्या कोकरांना, योग्य मार्गी आणतात, तेच खरे ज्ञानवंत. नुसतेच पुस्तकी ज्ञान काय कामाचे. उदाहरणच द्यायचे झाले, तर या सतरंज्या उचल्यांना, योग्य पटरीवर आणण्याचे काम, मनी मानसी बाळगतील, त्यांनाच खरे जीवन कळलेय हो.  तेच इतर जनांसाठी योग्य गुरू असतात. त्यांना शरण जावे, मग आपण तरलो नाही, तरच नवल. अशांना शरण गेल्यास चांगले फळ मिळते. सर्व कुळ ( आसपासची जनतेचा) उध्दार होईल.  म्हणून समोर जे जे काही चांगले व भले दिसेल, ते follow करा. असेच माझे लिखाण वाचत राहा. व folllow करा.  गुरू हा  जीवन मार्गात, डोळे व कान उघडे ठेवल्यास, अनेक बाबतीत, अनेक व्यक्तीत दिसतील. तर शोधा म्हणजे सापडेल. तर भेटत राहू. तुमच्या नियमित वाचनात ही मला गुरू भेटतोय.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू