आजचे शिक्षण आणि त्याला नेमका लागू पडणारा, समर्थ रामदास स्वांमीच्या दासबोधातील संकल्पना.
२६. ७. २१ . सोमवार. आषाढ कृ. द्वितिया
काल आपण समर्थांनी सांगितलेली, गुरूची व्याख्या विचारात घेतली. मी तुम्हाला स्वयं वाचनाचा सल्ला दिला. पण मला मान्य आहे. ती भाषा तितकीशी कळायला सुलभ नाही. मला संत वाङमयाचा परिचय असल्याने ती सोप्पी वाटली. पण कित्येक वाचकांना, ती ३०० .३५० वर्षापूर्वीची प्रचलित भाषा आकलनास अवघड वाटणार,निश्चित. मला ही जाणिव होती. मग तुम्ही म्हणाल, मग असेच का सोडले बरे, समजाऊन न सांगता? मला हेच तुम्हाला पटवायचे आहे कि, जर लेखक वा वक्ता जेव्हा काही सांगू इच्छितो. तेव्हा समोरील विद्यार्थ्यांना कळेल अशी भाषा हवी. एक मिनिट, मी स्वतः शिक्षक म्हणवून आपल्या, सर्वांना विद्यार्थी म्हटले, म्हणून रागवू वा नाराज होऊ नका. बघा, इंग्रजीत ही pupil व student दोन अलग शब्द आहेत, तसेच आपण शाळा कॉलेज मधील मुलांना , " परिक्षार्थी" म्हणू या.पण तुम्ही मात्र, " विद्या+अर्थी = ज्ञानार्थी" आहात. अन् मी फक्त delivery lady आहे. पण मी त्या संतांची प्राकृत भाषा, आजच्या , " चालू" भाषेत या blog मध्ये प्रवर्तित करून, ते ज्ञान, तुम्हा सर्वांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत आहे. तर आपले हे relation - विचार देवाण घेवाण simple& smooth होणे, गरजेचे आहे. त्यासाठी, जे नियम, पाळायला हवेत, ते समजून घेऊ या. तुम्हाला comment चा मार्ग मोकळा करीत आहे. पण यात फक्त ज्ञानार्जनाच्या दृष्टीने, शंका विचाराव्यात, ही विनंती. विषय खंडन नसावे. ओके? 😀 खंडन म्हणजे, जे काही फेसबुकमध्ये चालते, ते. कोणी काही लिहिले कि, विरोध व विरोधच😁. दासबोधाच्या
या पाचव्या दशकाच्या दुसर्या समासात , समर्थ रामदासांनी गुरू कसा असावा वा नसावा,दोन्ही बाजू प्रतिपादन केल्या आहेत. म्हणून त्यातील , नकोची दृष्टी स्पष्ट करताना, मी २२वा समास, "हवा" सांगणारा समास ही टाकला आहे.
जो कोणी ज्ञान बोधी ।
समूळ अविद्या छेदी ।
इंद्रियेंदमन प्रतिपादी ।
तो सद्गुरु जाणावा ॥ २२॥
आता रामदास स्वामींनी सांगितलेल्या गुरूंच्या नकारात्मक बाबी बघूया.
करामती दाखविती। - नाना चमत्कार कौतुके।
असंभाव्य सांगती ।। २।।
आणि सांगती औषधप्रयोग।
कां सुवर्णधातूचा मार्ग।
हे सर्व अशक्य आहे, कोणा इतर धातुचे, सोन्यात रुपांतर ही किमया अस्थित्वात असली तर, तो गुरू होऊन, इतरजनांस शिकवील का, स्वतःच अरबपती होईल अं? समजून घ्या. पण हे आपण संत वाङमयातून शिकलो नाही व भले भले, अाजच्या उच्च शिक्षणातून पुढे आलेले, डॉक्टर (८ वर्षापुर्वी दादर येथील, इंजिनिअर (पुणे) असे अनेक मोठाली शिक्षण घेतलेली मंडळी, असल्या बाबा/ माऊलींच्या कच्छपि लागलेत. आता पोलिस केस चालू आहेत. हेच समर्थांच्या मते मूर्खपणाचे लक्षण आहे.
येक द्रव्याचे विकिले (आजचे कोचिंग क्लासेस)
येक शिष्याचे आखिले
(शिष्य सांगेल तेवढाच portion शिकविणे)
अति दुराशेने केले।
दीनरूप (शिष्यापुढे) ।।२३।।
जें जें रुचे शिष्यामनीं ।
तैसीच करी मनधरणी (मस्कापॉलिसी) ।
ऐसी कामना पापिणी ।
पडली गळां । २४॥
जो गुरु भीडसारु ।
तो अद्धमाहून अद्धम थोरु ।
चोरटा मंद पामरु ।
द्रव्यभोंदु ॥ २५॥
आता हे तर आपण सध्या सर्रास पाहतो. आज या बहुतेक क्लासेसमधून , मार्कच महत्वाचे मानले जाते. विषय समजणे, गेले टिपरीत. त्यामुळे सर्व पैशाचा खेळ झालाय. अाखून दिलेले व त्याच शब्दात व वाक्यरचनेत प्रश्नांची उत्तरे लिहिणे, अपेक्षीत असते. निबंध ही तसेच readymade मग होते काय, सर्व उच्च शिक्षण ही twinkle twinkle or rain rain go away style वर होतेय. क्लासेस मधील नोटस zerox करायचे by heart करायचे. अन् परिक्षेत, लिहून सुटायच. बस. गंमत म्हणजे हा प्रकार, समर्थ रामदासांनी ह्या त्यांच्या दासबोघात लिहून ठेवल्यात( १६३५ ते १६४०च्या दरम्यात ) पण आज उलट जास्त लागू पडत आहेत. मूळ धड्यापेक्षा, " गाईड वरूनच जास्त शिक्षण चालते. आज सरकार मनपाच्या शाळांतील मुलांना, क्रमिक पुस्तके मोफत पुरवते. ( किमत साधारण रू. २० ते ३५. पण ते बाहेरून १५० ते १७५ रूपयांची गाईडे विकत घेतात. व तय्यार उत्तरे लिहितात. कित्येकदा अशा लिखाणाला, शिक्षक, जास्त गुण देतात. म्हणजे समर्थ सांगतात, त्याप्रमाणे, शिष्य आखून देतात, त्या पध्दतीनेच शिकवले जाते. सर्व पालक व बालकांच्या अपेक्षेपुढे, हे ""गुरू"" helpless दीनरूप होतात.
माझ्या गुणांची कदर करून, उत्सुकतेने वाचण्यार्या माझ्या वाचकांनो. मग सांगा बरे, हा दासबोध ग्रंथ, विद्यार्थी वा परिक्षार्थी मुलामुलींच्या, योग्यतेचा आहे कि आध्यात्मिक/ धार्मिक ठरवून, देवदेव करण्याच्या कल्पनेतून, म्हातारपणी timrmepass म्हणून वाचायच्या, उपयोगाचा आहे? मी एक बघितलेय, वयाच्या ६० - ६५ नंतर, हे so called जेष्ट ( फक्त वयाने) नागरिक, आम्ही कसे धार्मिक आहोत दाखवण्यासाठी, हे ग्रंथ वाचतात, वा असल्या वर्ग/सभेला जातात. हे गुरू व गु्रूणी याचा फायदा उठवतात अन् निष्क्रिय लोकांची फौज तयार होते. पण मला खात्री आहे.माझे वाचक वेळेवरच सजग होतील व इतरांना जागृत करतील. तर भेटत राहू या. जमल्यास तरूणांना, ह्या ज्ञानाची महती पटवू या. देणार नं मला साथ? द्याच.
Comments
Post a Comment