गुरूवर्य मानिले जयाला, तोचि संधीसाधू निघाला, तर~~.

 २७.७ .२१ मंगळवार. आषाढ कृ.अंगारकी संकष्टी चतुर्थी.

    

 चाणाक्ष. चातुर्य. तुर्यावस्था. चतुर.

  हे चार शब्द आठवलेय, चतुर्थीवरून. 

  तर आपला मुद्दा आहे, गुरूंसंबंधी. या, " गुरू" शब्दाचा नेमका अर्थ आहे महान- मोठा. उलट शब्द आहे- लघु- लहान.  तसेच आपल्या नवग्रहात, जो आकाराने, मोठा आहे, तोच  "गुरू" असा संबोधला जातो. आपल्याला शिकवणारा शिक्षक, नेहमी महानच असावा,हे पटते नं? तो कोणत्याही अर्थी नीच-  कमी बुध्दीचा वा कमी नीतिचा नसावा. मागच्या आठवड्यातच बातमी ऐकली, कोणा शिक्षकाने,   "मार्क" वाढवून देण्याच्या बोलीवर , एका मुलीकडे अश्लील मागणी केली. 'असली मंडळी ' गुरू होण्याच्या लायकीची आहेत का? तिने कणखर राहून , पालकांना सांगितले व पालकांचेही कौतुक कि, त्यांनी हिंमत राखून पोलोसांत तक्रार नोदविली. आता केस होईल. कदाचित हा bail वर बाहेर येईल. एखादा क्लास उघडील आणि इतर पालक विचार न करता, तेथे admission घेतील. आपली न्याय व्यवस्था जरा  लांबड लावणारी आहे, हे कटू सत्य आहे. अशा गुन्ह्याला, रामदासस्वामींनी काय सजा सांगितली आहे, या ग्रंथात माहितेय? सरड भरणे- विजारीत (pant) सरडा सोडून,  ती कमर व पायाकडे घट्ट बांधणे. quick& effective decision. 

     वाचक हो, मागच्या महिन्यात, दिलेला सल्ला पुन्हा देते.

 जरा युट्युबवरील  crime patrol सतर्क/ 100/दस्तक 

 बघा. पोलीसांकडे न जाता, कित्येक पालक, मुलींना चूप बसायला लावतात. मग त्या बदमाशांची हिंमत वाढते व प्रकरण गळ्याशी आल्यावर ,  पोलिसांच्याकडे धाव घ्यावीच लागते. तर समर्थ सांगतात कि, कुंपणच शेत खात असेल तर सावध रहा. हे योग्य वेळीच माहित व संमत असावे नं?

 दस्तक= दारावरील ठकठक

 सतर्क= सावध- योग्य अंदाज करणे.

 

   ही बाब, मी परत परत उठवतेय. कारण हे म्हातारपणी गात्र थकल्यावर काय उपयोगाचे, अं!

         जें जें मन अंगिकारी ।

          तें तें स्वयें मुक्त करी ।

         तो गुरु नव्हे, भिकारी- ।

          झडे आला ॥ २०॥       

 आता बघा, आपण जो गुरू म्हणून choose केला, तोच वेळकाळ न पाहता, मनमानी करत असेल. तर चेल्यांना काय आदर्श राहणार?  ह्या  lockdown मध्ये, राज्य सरकारने काय केले, सर्व प्रथम, दारूची देशी/ परदेशी दुकाने open केली. अर्थात् ते मिळण्यार्‍या कराकडे बघून. पण, मग त्यांचे, सतरंज्या उचलणारे, घरच्या मोठ्यांना , तसेच ज्यांना आदर्श मानतात, त्यांना तेथे लाईनीत बघत असणार ना? ज्यांचे footprints follow करायचे ते, या lockdown च्या काळात, कमाई थांबली, तरी, " पिणे" सोडत नाहीत, पाहून काय ढीग संस्कार होणार?  अादर्श ठेवणे, म्हणजेच एक प्रकारे , " गुरू" मानणेच होय. म्हणून दासबोधातून समर्थ शिकवण देत आहेत कि, जे स्वतः ला शिस्त लाऊन वाईट बाबींपासून दूर राखू शकत नाहीत, ते कसले गुरू, ते तर भिकारडे. झटकून टाका, असल्यांना!

         शिष्यास न लविती साधन (शिस्त)।

          न करविती इंद्रियेंदमन ।

        ऐसे गुरु आडक्याचे तीन । 

        मिळाले तरी त्यजावे ॥ २१॥

    जे शिष्यांना शिस्त- वेळेवर मन लाऊन अभ्यास करणे व परिक्षेत,  ते सादर करणे, हे स्मरणशक्तीचे साधन समजाऊन सांगू शकत नाहीत, ते खरे गुरूच नव्हे. असले शिक्षक तर पैसा टाकला तर , पैशाला पासरी मिळतात. तेव्हा असल्या गुरूंपासून दूर राहावे, यातच आपले भले आहे. हा जो दासबोधातील बोध आहे, तो सर्वांना, सर्वकाळ व संपूर्ण 

 आयुष्यभर लागू पडतो. हे चिरंतर सत्य जाणून घ्या व आत्मसात करा. हे माझे मागील blog ही परत परत वाचा व नुकसानीपासून, स्वतःला वाचवा.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू