जेव्हा एखादा अपराध घडतो, तेव्हा आपण, अजाणतेपणे, कसे त्यात सामील होतो.
२९.७ .२१ . गुरूवार. आषाढ . कृ. षष्ठी.
माझ्या नव्या नव्या विषयावरील माहिती मिळवण्यास उत्सुक वाचक हो. काल मी आपल्याला माझ्या अनोख्या गुरूंबद्दल सांगितले. खरेच प्रत्येकांच्या आयुष्यात असे अनेक गुरू. असतात. बहुतेकजण, अामचे , अमूक तमूक बाबा/ बाबी ( sorry) गुरू आहेत, म्हणतात. त्यांची पुस्तके वाचून/ सभेत जाऊन आम्हाला , " शांति" मिळते. शांति म्हणजे राग येत नाही. अाता बघा . ही गांधीगिरी, निष्क्रिय व भावना शून्य बनवते. उद्या ह्या एका गालावर कोणी मारले तर , दुसर्या गाल पुढे करा. या, ह्या, "त्या महात्म्यांच्या सल्ला मागील सत्य जाणून घेऊ या. This I am repeating again and again. कोणातरी एकाच व्यक्तीला गुरू मानणे, काही बरोबर नाही. स्वतः दत्तगुरूंचे ३६ व कृष्णाचे २४ गुरू होते. मी एक वर्षापूर्वी, त्यांची नावे सांगितली होती. तर पुन्हा वळू या. कालच्या लेखाकडे. मी प्रारंभी च दोन उल्लेख केले होते. त्यातील दुसरा , " दुधाच्या पिशव्या" बद्दल, मी आज लिहिणार आहे. गुरू तोच- तो म्हातारा डबेबाटलीवाला. झाले असे, त्यानंतर काही वर्षे गेली. आम्ही मोठे झालो. त्याला घाबरून अभ्यास करणे, ही कल्पना आम्हाला हसवत असे.
आज दुसरा मुद्दा. हळू हळू तो थकला असावा. इतर रद्दी पेपर वाले येऊ लागले.
अन् एक विचित्र घडले. आज कितीतरी खासगी branded दुधवाल्या कंपन्या निघाल्यात. पण तेव्हा सरकारी वरळी डेअरी, एकदम जोरात होती. प्रतिष्ठित होती. तेव्हा ते दूध openly मिळत नसे. milkcard मिळवावे लागे. आमच्याकडे ते होते. आम्ही ही " ते" कार्ड समोरच, एखाद्या , " medal " प्रमाणे टांगून ठेवत असू. अचानक सरकारी दुग्धालयाने बदल केला. बाटल्यांच्या ऐवजी, दूध plastic bags मध्ये मिळू लागले. पण त्याचवेळी एक विचित्र घटना घडली. त्यावेळची जनता किती मुर्ख होती, बघा. सारासार विचारच करत नसे. आपल्याला काहीतरी मिळतेय ना? मग बस! तर हे नवे नवे, रद्दी पेपर-डबा बाटलीवाल्यांनी, ह्या दुधाच्या रिकाम्या पिशव्या विकत घेण्यास सुरूवात केली. पण अट अशी कि, दूध बाहेर काढताना, पिशवी, फक्त वरच्या बाजूने एका कोपर्यात सरळ कापायची. तरच ते घेत. व पैसे देत. हे असे का? बरे हा विचार त्यावेळच्या, मोठ्या माणसांनी केलाच नाही. हा धंदा तेजीत चालू झाला. अपराधी , आपली विचारशून्य public. घडत असे होते कि, या in tact दुधाच्या पिशव्या, धारावीत जमा होत. व त्यात निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त दूध भरून, जनतेतच विक्री होऊ लागली.
अन् एक दिवस , तो आमचा , "गुरू" आला, म्हातारा गुरू आला. पण त्याने त्या पिशव्या घेण्यास नकार दिला. कान पकडी व काही समजून सांगण्याचा प्रयत्न करी. पण आमची दिडशहाणी जनता ऐकून घेणार? अं हं. रिकाम्या पिशव्याचे छान(?) पैसे मिळत होते ना? नंतर दोन वर्षाने, ही भेसळीची भानगड उघडकीस आली. आता बोला, गुरू ज्ञान देण्यास तयार होता, पण शिष्य मंडळी~~ पण लक्षात कोण घेतो!
या सरकारी दुग्धालयावरून एक गोष्ट आठवली. तशी ती सदैव मनात सलतच होती. पण अाज हिंमत करून लिहीणार आहे. जे घडवले गेले ते~ पण अाता मी इतरांना , अर्णब वा कँगना बना, सांगते, तर ते मला ही लागू आहे ना? नाहीतर , " लोका सांगे ब्रह्मज्ञान अन् स्वतः कोरडे पाषाण" त्यातली गत व्हायची. तर उद्या बघू या, वरळी/ आरे/ कुर्लाची कहाणी.
Comments
Post a Comment