गुरूंचे संस्कार - वागणूक विषयक व आपले सणवार- त्यांचे योग्य रितीने उत्सव. वाचा व ऐका.

 ३०. ७.२१ . शुक्रवार. आषाढ कृ. सप्तमी.

     गुगलवर एक बातमी वाचली. एका राजकिय नेत्यावर,दुःखाचा डोंगर कोसळला. वाचून मनात काय अाले बरे? मला तर खरेच धक्का बसला, वाटले कोणीतरी घरचे, तसे त्या परिवारातील, सर्वच वयाने लहानच. पण पूर्ण बातमी वाचली तर, त्यांचा पाळीव कुत्रा गेला. ही त्यांच्यासाठी, दुःखाची बाबच .पण जनतेला, असा" धक्का" देणे, कितपत योग्य आहे? असो. आमचा पण , "केव्हिन"ने ही ( कुत्रा)  माझ्या वडिलांच्या मृत्यु नंतर लगेच प्राण सोडले. पण ते दुःख फक्त आमचेच होय. 

    आपण जीवनात कशाला व केव्हा व किती महत्व देतो, हे विचार करण्यासारखे आहे. 

    कालपर्यंत आपण गुरू( शिक्षक) व  शिष्य( विद्यार्थी) संबंध कसे असावेत. हे बघितले. ते आपल्यावर संस्कार करतात. आपला धर्म= वागणूक कशी असावी, ते शिकवतात. इथे शिक्षक म्हणजे शालेय व कॉलेज जीवनातीलच गुरू, मला अभिप्रेत नाहीत. तर All persons, who are effictive for our good life. 

     मी परवा एका व्यक्तीचे, धर्म पालन करण्याबाबत कौतुक केले. जरा आता आपण आत्मकेंद्रीत होऊन, आपल्या बाबत आत्मपरिक्षण करू या. आषाढ सरला, आता श्रावण येईल, नंतर भाद्रपद येईल. दोन्ही महिने आपल्यासाठी सणमास आहेत. सर्वात महत्वाचे सण म्हणजे कृष्णाष्टमी व गणेशोत्सव आणि एक महत्वाचा - पितृपक्ष. अं, काय म्हणता, हा काय सण आहे? हेच आपण जाणून घेत नाही नं! आपले जितके पितर आहेत, समस्त कुळातील/कुळातीत, त्यांना , आपण जे अर्पण वा तर्पण करतो, त्यात THANKS GIVING ची भावना असायला पाहिजे. पण आपण तसे करतो का? नाही. पण तो होलोविनचा FESTIVAL( हा ही याच अर्थी केला जातो.) पण आपण मुर्खासारखा, तो घरी दारी शाळातून celebrate 😁😂🙃😂 करतो. आता मी माझ्या मालिकेमधून कृष्णाष्टमी - दही हंडी आणि गणेशोत्सवाचे सत्य स्वरूप सांगितले आहे. ते प्रत्यक्ष ऐकाच. विचार करा. आपल्या या दोन्ही दैवाचा सन्मान करा, ही हात🙏🙏🙏 जोडून विनंती.







Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू