सांप्रत समृध्द मुंबईचे निर्माते व आपण तिचे रहिवासी.

 ४.७ .२१ .जेष्ठ कृष्ण दशमी. रविवार.

   रसिक व जिज्ञासू वाचक हो, आपण मुंबईची ओळख  करून घेत होतो.  कोणे एके काळी आजारांचे माहेरघर असलेली, ही  खाडीच्या दुर्गंधयुक्त हवेमुळे, रहिवासास, बेकार असणारी, ही सात बेटे आज दिमाखाने, दुनियेतील अव्वल नंबरातील नगरी ठरली आहे.   

   जे, तिचे निर्माते मानकरी  आहेत, त्यांचे आपण ऋणी राहणे, हीच त्यांना श्रध्दांजलि ठरेल. फक्त मुंबईकरच नव्हे तर सर्व भारतियांनी त्यांना मानवंदना द्यावयास हवी. 

   त्यापैकी काहीं ज्ञात नावे पाहू या. 

   मुंबईची जी वाट लागत होती, ती मुख्यत्वे करून, भरतीचे खारे पाणी, खाडीतून बेटातून पसरत होते, त्यामुळे जो चिखलराडा होत असे. व रोगट  हवा तयार होत असे. तेव्हा ते जे येणे बंद केले, तर या कल्पनेतूुन  १७७६ ते १७८० या काळात, जे गव्हर्नर हार्नबी होते, त्यांनी वरळीला बांध घालण्याची कल्पना अमलात  आणली. पण ती सर्वांच्या मते मुर्खाची होती.  आणि पुढे, हीच मुंबईच्या नवनिर्माणाची नांदी ठरली. गंमत म्हणजे, या निरूपयोगी बेटांची सुधारणा करण्याच्या वेडगळ व निरर्थक कल्पनेपायी, हॉनर्बी साहेबांने, कंपनी सरकारचे पुष्कळ द्रव्य खर्च केले, म्हणून त्याजवर इतराजी झाली. पण त्यांनी हा वरळीचा बांध घालण्याचे काम पुरे केलेच. अर्थात् ह्या बांधामुळेच समुद्राचे पाणी, बेटातून येणे, बंद झाले व त्यायोगे, रोगट ठरलेली मुंबई संथ गतीने का होईना, निरोगी होऊ घातली. हा बांध दगडांनी बांधलेला असून, तो हार्नबी व्हेलार्ड यांच्या नावाने ओळखला जातो.

    त्या काळातील, एका स्थानिक सुताराने, एक श्लोक रचिला आहे. नाव अज्ञात आहे. पण त्या काळात सुतार सुशिक्षित होते, हे सिध्द होते.  श्लोक:- 

    बांधीला दरयांत सेतु जइसा श्रीरामें लंकेवरी ।

    मोठा हुन्नर जांगळा खरचिलें द्रव्यासि कोटीवरी ।

    केली वाट सपाट खाडि अवघी बुंजूनि ती टाकिली ।

    जेठायी मग ती महाभगवती लक्षूमिवतें स्थापिली ।

     आता बघा,  या श्लोकात, त्या अनाम कवीने इंग्रज लोकांची स्तुति केली आहे,  चुकीची आहे का? 

     हा वरळीचा बांध हा, मुंबापुरीच्या बदलाचा पायाच नव्हे का? ज्या खाडीमुळे अर्धी मुंबई पाण्यात होती, तिचा कायापालट केला नं, ह्या हॉनर्बी साहेबांने? अन् ही मायापुरी ठरली.  तेही सर्व स्थानिक व खुद्द कंपनी सरकार विरोधात असताना? मग ह्या सद् गृहस्थाला thanks giving देणे योग्यच आहे न?  तर माझे तरी येथे कर जुळती। तुम्हाला पण असे वाटते का?  

     मला नेहमी एक वाटते, जर आपल्याला विरोध करणार्‍याला,  नामोहरण करायचे असेल, तर आपण शांतपणे आपला इरादा( अर्थात् योग्य व सर्वांच्या हिताचा असलेला) योग्य दिशेने पुरा करावा.  आपले नियोजित कार्य भीड व भय न बाळगता  नेटाने चालू ठेवावे. मग ते छोटे मोठे जसे असेल तसे. ओके? सध्या मी तरी हे लिखाण त्या हेतूने चालू ठेवणारच. यश तुम्ही वाचक देत आहातच. असेच वाचत रहा. अन् दुःखापासून निराशेपासून वाचत रहा.  कारण सर्वांत महत्वाचे सत्कार्य म्हणजे, आपल्याला ज्या ज्या सुविधा, या जीवनात मिळत आहेत, त्यासाठी त्या त्या संबंधी जनांचे ऋण मानावे  व आभारी रहावे, बरोबर नं?

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू