दलदल/ चिखलराडा. ठरला, लक्ष्मीचा वाडा.

 ५ .७ .२१ . सोमवार जेष्ठ कृष्ण योगिनी एकादशी. 

 आज योगिनी एकादशी. तुम्हाला माहित आहे का, योगिनी म्हणजे काय व तिचा महिमा नेमका काय आहे? योगिनी म्हणजे आपल्या आयुष्यात,  जे काही योग येतात, मग ते चांगले वा वाईट कसे ही असले तरी, ते का येतात, त्याची समग्र माहिती व जाणिव असणे. 

        योगिनी म्हणजे योगाची साधना करणारी महिला. जबलपूर जवळ बेडाघाट च्या पुढे एका टेकडीवर ६४ योगिनींचे मंदीर आहे. तेथे गौरीशंकराचे देऊळ आहे. तिथे सभोवताली ६४ योगिनींच्या मुर्ती आहेत. त्या एक एक ज्ञानाच्या शाखेच्या अधिष्ठित देवता आहेत. पुर्वापार परंपरा व घटनांची - इतिहासाची माहिती असणे- त्याची जाणिव असणे, ह्यात अभिप्रेत आहे. अनेक परदेशी येथे भेट देतात.  योगिनींची नावे माहीत करून, त्यावर चर्चा करतात. आणि आपण retirement नंतर तो पैसा खर्च करून युरोपवारी करून धन्यता मानतो. असो.  ह्या योगिनींच्या नावात व विद्येत, आपण, आपल्या जीवनात मिळणार्‍या समृध्दीच्या स्त्रोताबाबत जागृत असावे व अाभारी असावे, हे मानले आहे. नेमक्या ह्या योगिनी एकादशीला मध्यबिंदू ठेऊन, मी अापल्या देशातील महत्वाच्या शहरांची विकशनशील परंपरा सांगण्याचा प्रयास करीत आहे, तुमचा वाढता interest मला पुण्याची  माया देत आहे. तर ही प्रस्तावना लांबली. Its ok! 

         हां तर, खाडीचे पाणी बांध घालून,नुसतेच  बंद केले नाहीतर, जेथे मूळच्या खाड्या होत्या, त्यात नळ( पाईप)  टाकून, पुढे या शहरांत जे पावसाचे व इतर सांडपाणी  येईल ते ही या नळातून खेळवून जमिनीखालून, वरळीच्या खाडीद्वारे समुद्रात जाईल, अशी योजना केली होती. त्या काळात ही योजना कार्यन्वित करणे,  किती कल्पनेच्या बाहेरील बाब होती. लक्षात येते का?

          तसेच आजचे दादर त्याकाळी खाडीचा एक भाग होता. माहीम व परळ- वरळी खाडीच्या पाण्यात भराव टाकला गेला. व एकसंघ भूमी तयार झाली. तेथे बांधण्यात आलेल्या चाळी, म्हणजे मध्यम वर्गाच्या रहिवासाचे सुलभ साधन ठरले. मी स्वतः दादरमधील खांडके चाळ नं ५ची रहिवासी आहे.  एकूण तीनमजली १२ चाळी होत्या. एका मजल्यावर ९ बिर्‍हाडांची सोय होती. बघा, कितीतरी कुंटुंबाची ( ९३=२७ १२=३२४  अशा इतक्या परिवाराची राहण्याची, अल्प किमतीत झाली. तशा अनेक चाळी या परिसरात आहेत, १०० वर्षापूर्वी पासून. व हा भराव घालण्यासाठी , एका शिक्षण नसलेल्या पण बुध्दीमान  डोकेबाज माणसाने शक्कल लढवली. लक्ष्मण हरिश्चद्रजी त्यांचे नाव. त्यांनी, शहराच्या कचरा गोळा करण्याचा मक्ता घेतला. त्यासाठी त्यांना रक्कम मिळत असे. व ते हा सर्व कचरा अशा ठिकाणी भराव घालण्यासाठी वापरत. मेहनत करून कमाई, वर मुंबईच्या विकासास ही हातभार. आता एक आठवण सांगते, अर्थात् अापण, राग मानू नये, पण ही माझ्यासकट त्यावेळच्यामंडळींच्या मुर्खपणाची सत्यकथा आहे. ७५सालची गोष्ट. आमच्या ऑफिसमधील ४.५ जणींचे विवाह जमले.  मी- मोठ्ठा ऑफिसर. दुसरी मराठी आमच्याच डिपार्टमेंटमधील सहचरी. एक मारवाडी - तिने सांगितले, तिचा पती, भंगाराचा मक्ता घेतो. व एक सिंधी- तिने सांगितले, तिचा पती, तयार कपडे विकतो. अर्थात् माझ्यासकट सर्व  सच्चा(?) मराठी मंडळींनी , सवयीने नाक मुरडली. पण पुढे जे घडले, ते आमच्या तोंडात मारणारे ठरले. मारवाडी व्यक्तीने, जुन्या बोटीच्या भंगार मालाचा ठेका घेतला लखपती झाला. व सिंधी गृहस्थाने दादरमध्ये, रेडिमेड कपड्यांचे दुकान टाकले अन् आम्ही जिथल्या तिथे. असो.  तर या मुंबईच्या विकासात, हिकमत लढवून भाग घेतलेल्यांची  आडनावे पाहिली, तर ज्यांना आपण उपरे म्हणवत आहोत, त्यांचाच सहभाग आढळत आहे.   हा काही फक्त योग नाही तर योगिनींची केलेली परिश्रमयुक्त आराधना आहे, हे विसरणे म्हणजे कृतघ्नता ठरेल. हे पटणे न पटणे, तुमच्यावर आहे.  पण त्यांचे आदर्श मानून आपल्या पुढील पिढीसाठी काहीतरी सत्कृत्य करा, मग माझ्या या BLOG✍ चे चीज होईल🙏 ही आशा. मुंबईचे विकासक मानकरी अनेक आहेत. त्यात पारशी समाज अग्रक्रमावर आहे. तर या - वाचा - निदान मनोमन सन्मान करा.बस.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू