आजची मुंबई हे कोणाच्या धोरणधीराचे फलित आहे, कळले ना?

 ६ .७. २१ मंगळवार जेष्ठ कृष्णपक्ष द्वादशी.

    रसिक व अभ्यासू वाचकवर्ग हो, मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या नियमित वाचनाबद्दल. खास करून सध्याचा थोडा गहन विषय असून, ही तुम्ही उत्साहाने माहिती करून घेत आहात, याबाबत मी आभारी आहे. माझ्या प्रमाणेच तुम्हीही या मुंबईच्या विकासकांच्यात " रस" घेत आहात. Really admirable.  

    तसेच ह्या ब्रिटीशांचे या मुंबापुरीतील विकासाचे काम तितकेच admirable आहे नं? एरवी आपल्या थंड प्रदेशाचे हवामान सोडून, या चिखलमय भागात येऊन , संकटांना तोंड देत, इथे बदल घडवायचे, काही अडले होते का त्यांना? 

     बस जिद्द व चिकाटी- दुसरे काय?

      वरळीचा बांध तयार करून ते थांबले नाहीत, तर मूळच्या खाड्या होत्या, तेथे तेथे नळ घालून तेथील पाणी समुद्रात सोडण्याच्या त्यांच्या कृप्तीला खरोखर तोड नाही,  शिवाय बांधाच्या शेवटी, जेथे प्रत्यक्ष शहरातील सांडपाणी व समुद्राचे पाणी एकत्र होते, तेथे चुनेगच्ची ( सिमेंट)चा साकव- पूल बांधला आहे. आणखीन् गंमत म्हणजे  खालून आत पाणी यावे म्हणून कळसुत्री करून त्यात दार केले आहे, त्यातून भरतीच्यावेळी लाटांचे पाणी आत येते व ओहोटी लागली कि, शहरांतील साचलेले पाणी समुद्रात जाते. आता या यांत्रिक युगात, हे ऐकायला सोपे वाटते, पण त्या काळात ही कल्पना राबवणे, किती नवलाची व किष्ट( कठीण) असेल, just विचार करा. तसे तर पुढे  जाऊन यंत्रयुग कसे कोणामुळे आले, हे जाणतातच आहात? 

      चांगल्याचे कौतुक करायलाच हवे, हे पटतेय नं? अर्थात् त्यासाठी, तिची समग्र माहिती व  घडण समजून घेणे, जरूरी आहे. ही तर फक्त झलक आहे, ह्या मुंबईच्या निर्मितीची. एक मात्र मान्य करावयास पाहिजे, हे सर्व फलित आहे, इंग्रजांच्या चिकाटीचे व जिद्दीचे. 

       अशीच जिद्द, मी तीन वर्षामागे, एका व्यक्तीत पाहिली.  कानपूरजवळील एक युवक, मुंबईत तीन वर्षामागे, नशीब आजमावयास आला होता.( आपल्या विशिष्ट मंडळींच्य मते उपरा. आपल्या मुलांच्या पोटावर पाय वगैरे.) मला मीरारोडवरून, बोरिवलीला जायचे होते. रिक्षा घेतली. नेहमीच्या पध्दतीने चालकाशी गप्पा मारल्या. It was great shock for me, that the person driving riksha was well educated. 1st class  MCom. तो इथे कॉलेजमध्ये प्रोफेसर बनण्यासाठी आला होता.  अर्ज विंनत्या चालू होत्या. पण तोपर्यंत ८ महिने रिक्षा चालवत होता.  बोलता बोलता म्हणाला, आज यहाँ की दुनिया, मुझे, " तु" कह रही है, ठिक है, अब मै रिक्षा चला रहा हूँ, लेकिन एक दिन इस मुंबई के लिये, " आप" बन जाऊँगा, "सर" होने के बाद। त्याला मी बरोबरीने बोलले, म्हणून खूप बरे वाटले. त्याने नंबर घेतला. मीही दिला. विशेष म्हणजे एक वर्षाने, मला फोन आला. त्याने ओळख दिली व तो आता नवी मुंबईच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागला होता. Mcom माणूस चिकाटीने, मुंबईत जवळजवळ दिड वर्षे रिक्षा चालवत होता. मला महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वांसमोर मांडायचा आहे. तो म्हणजे, कोणतेही काम जिद्दीने करावे, पण मधल्या काळात , नैराश्येच्या आहारी न जाता, इतर मार्ग स्विकारायचे.  

       मला कोणाच्या जखमेची खपली नाही काढायची, पण MBA, UPS Dr Engi शिकलेली, आपली मुले, जेव्हा नोकरी मिळत नाही, म्हणून इतके घेतलेले शिक्षण, मातीमोल ठरवून, पालकांचा विचार न करता, ही दुनियाच सोडावयाचे ठरवतात,  तेव्हा वाटते, हे त्यांनी घेतलेले शिक्षण, फक्त पोपटपंचीच होती.  त्यात  जे काही व्यक्ती  - घटना- सुधार - बदल- याबाबत माहीती तर पाठ केली. पण हे घडताना, त्यांची जी काही मानसिक व सामाजिक घडण  होती, ती समजून घेतलीच नाही. असो. तुम्ही माझे वाचकवर्ग स्वतः व आजूबाजूच्या, सर्वात जिद्द व चिकाटीची घडण निर्माण कराल, तर माझ्या या blog लेखनाची इतिश्री, यशात व समृध्दीत होईल. ही माझी मनिषा  आहे व अपेक्षा आहे.   तर भेटत राहू .अन् आपण मिळून, या आपल्या छोट्या दुनियेत आमुग्राह्य बदल घडवू या. 🙌🙌🙌🙌🙌🙌. परवाचा blog आठवतोय.  हितधोरण, आपल्या  घेतलेल्या निर्णया बाबत धोरणधीर असावे, निदान शासनाने तरी ठाम असायला हवे होते.  असो

        आपण असावे, बस.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू