तडजोड नको. पण चांगली जीवनशेलौ हवीच.

 ७. ७ .२१ बुधवार. जेष्ठ कृष्ण त्रयोदशी.

   आज मी तुम्हाला, एका जाहिरातीतील तत्वज्ञान दाखवणार आहे. generally या जाहिराती, त्यांचा माल खपवण्यासाठीच असतात. rather आपल्या गळी उतरवण्याच्या प्रयत्नात असतात. पण त्यातही बुध्दिमंताची झलक दिसते. एका builder ची जाहिरात आहे, घरे खपवण्यासाठी. अर्थात् ज्यांना घर घेण्याची निकड व क्षमता आहे, साहजिक तेच अशा जाहिराती वाचतील नं. पण या जाहिरातीने माझे मन वेधून घेतले. 

     त्यात म्हटलेय,  "तडजोड नाकारा. उत्कृष्ट दर्जाची जीवनशैली स्विकारा."  अगदी पटले हे! आपल्या ध्येयापासून दूर न होणे, म्हणजेच चांगली जीवनशैली.  कालच्या रिक्षावाल्या, I mean, लेक्चररने ते दाखवून दिले. पण destination मिळेपर्यंत,  तो हातावर हात ठेवून बसला नाही, विशिष्ट गोष्ट मिळेपर्यंत, आईवडिलांच्या जीवावर रिकामा/ बेकार बसला नाही. 

     या वरून पुन्हा मी माझ्या आवडत्या शंभूराजेच्या आदर्शवत् ग्रंथाकडे वळते. मूळ विषय,  " मुंबईची पुनर्घडण, ह्या विषयाशीच संबंधित आहे, हे त्यांचे सुभाषित.  त्या मुंबईच्या बाबतीतील त्यांची धडपड, खरेच विचार करण्याजोगी आहे. ते हा नाद सोडून, भारतातील इतर प्रदेशात सहजी पाय रोवू शकले असते. पण त्यांनी या सात बेटांना एकसंघ करण्याचे ठाम ठरवले होते. त्याबाबत, छ.शंभूराजांनी, शासन व प्रजेसाठी, जी सुभाषीते लिहीली आहेत, त्यातील हे बघा.

     नाप्राप्यमभिवाच्छंन्ति नष्टं नेच्छन्ति याचितुम् ।

     आपत्सु न विमुह्यन्ति   नराः पण्डितबुद्धयः ।

       नाप्राप्यमं= न अप्राप्यम्= प्राप्त होण्यास अशक्य.

       विमुह्यन्ति= विन्मुख होत नाहीत, माघार घेत नाहीत।

       शंभूराजे असे विशद करत आहेत कि खरा पंडित म्हणजे अशी व्यक्ति- जी  सांप्रत लगेचच मिळण्यास अशक्य  असलेली, गोष्ट जाणून, प्रयत्न सोडत नाही, पण निराश होत नाही.  धीर सोडत नाही.  मुख्य म्हणजे सद्य परिस्थितीत,  नाहीेसे झालेल्याची, आताच हवे , म्हणून इच्छा धरत नाही. सबूरीने घेते. मुख्य म्हणजे संकटांना तोंड देण्यास कचरत नाही. एखादी गोष्ट समोरच्याला पटवायची असेल तरच दोनदोनदा hammer करायला हवी. हो नं? तर इंग्रजांची जिद्द पाहून पारशी लोकांनी ही या प्रयत्नात सहभाग घेतला. त्या समाजाचा मुंबईच्या विकासात फार मोठा हातभार लागलेला आहे. कसा ते उद्या बघू या. वाचा हा ब्लॉग व माहित करून घ्या, सर्वांनी,  या मायानगरी मागील मेहनत.  पटो वा न पटो, समजून घ्या, ही मुंबई फक्त आपलीव जाहगीर नाही.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू