तडजोड करा. पण परिवारातील सदस्यांशी करा.
८ .७ .२१ . गुरूवार. जेष्ठ कृष्ण चतुर्दशी.
स्वागत आहे, रसिक मर्मज्ञ वाचक हो, या माझ्या blog मध्ये. म्हणालं आज अचानक असा औपचारिक आरंभ का बरे? कारण तसेच आहे. आपण या मुंबईची माहिती घेत होतो. ही मुंबई, जी फक्त मूळ गिरगावापर्यंतच ओळखली जात होती. ती आज अवाढव्य पसरली आहे. मालाड बोरिवली, मुंबईपासून दूऽऽर मानले जात होते. तेथे आज त्या पल्याड विरार पर्यंत मुंबईच धरली जाते. मी स्वतः मीरारोडला राहते. पण मुंबईकरच मानते, मला. असो.
आज आपण मुंबई लक्षणीय बदलून टाकलेय. चांगल्या अर्थी तसेच, वाईट वाटतेय, पण रसातळाला पोहोचवतोय.
बघा आता ही शिक्षणक्षेत्रात अव्वल नंबर असलेली नगरी, संस्कारात मात्र घसरली आहे. हा सामाजिक प्रश्न म्हणावा, की कौटुंबिक प्रश्न म्हणावा, हेच समजत नाही.
पूर्वी बालविवाह होऊ नयेत , म्हणून समाजधुरिणांनी मोहिम उघडली, त्या विरोधात कायदा करविला. अन् आजची ही अल्पवयीन मुले व मुलीच प्रेम करून पळून जाऊन , "लग्न" करत्यात. आता बघा, या फक्त वसई विरार मध्येच जानेवारी २१ ते जून २१या अवधीत २०७ मुली या परिसरातून बेपत्ता झाल्या.पोलिसांनी त्यातील १७० मुलींचा शोध लावला. अजून ३५ मिळायच्यात. मला सांगा, या मुली अचानक उठून घराबाहेर पडल्या का? टाळी दोन हाताने वाजते नं? मुलींच्या पालकांनी पोलिसात complaint केली. पण मुले पण बेपत्ता होतीच नं? काय आहे. धड शिक्षण पूर्ण नाही. चरितार्थ म्हणजे नोकरी शोधायची व मिळत नाही म्हणून हे timepass चाळे. यात दोन point आहेत. मुळात अापली मुलगी कोठे जाते, मैत्रिणी कोण या बाबत पालक अज्ञानी असतात. आज्ञाकारी मुले आज सापडणे, विरळा. अहो, वाढ दिवसांच्या पार्ट्या हे एक फॅड झालेय. कोणाचा जन्मदिन असो वा नसो. घरी birthday सांगितला कि, झाले. वाचक मुलांनो, नाराज होऊन हा माझा blog वाचणे, बंद करू नका. तुमच्या हितासाठी मी धडपडतेय. प्रत्येकाला आज girl friend/ boy friend असणे ,MUST झालेय
मग यातून जोड्या जमतात. अन् मित्रमंडळी, मोठ्ठे कार्य केल्यागत पळून जाण्यास मदत करतात. एक मराठी सिनेमा खूप काही सांगून गेला. चालला ही जबरदस्त. पण मा. नागनाथ मंजुळेंना, सैराट" मध्ये, अभिप्रेत असलेले , " प्रबोधन" झालेच नाही.
आजच्या लोकसत्तेची वसई- विरार पुरवणी बघा. हा आजचा पेपर उद्या रद्दी होईल. पण याकारणे कोणी आपले जीवन रद्दी बनवू नये. कोणाचे होऊन देऊ नये. यासाठी, जेष्ठ मंडळीनों, सरऴ आपण, आजूबाजूला , " नाक खुपसण्यास सुरूवात करा. पालकांना मुलांशी गप्पा मारा. त्यांच्याशी मैत्र करा. नुसतीच मोकऴीक देणे, मोठेपणा नाही. किटी पार्ट्यांप्रमाणे या मुलांच्या पार्ट्या घरीच करा. त्यांच्या सर्व मित्रमंडळाशी निदान तोंड ओळख करा.
TV बघता नं? तर crime patrol satrak बघा. त्यात , जेव्हा मुले बेपत्ता होतात, म्हणून तक्रार घेऊन पालक येतात, तेव्हा पोलिसांना पूर्ण सहकार करायला हवा नं, तर त्यांना मुलांच्या " FRIEND(?) ची नावे सांगता येत नाहीत. पोलिसांनी जर girl f/ boy f बद्दल विचारणा केली, तर त्यांना राग येतो., आमची , " मुलगी वा मुलगा " त्यातली/ला नाहीच . अभ्यासू व सरळमार्गी आहे वगैरे. पुढे सगळे बाहेर येते.तेव्हा अज्ञान प्रगट होते. तेव्हा सावध राहा. पालकांनीच नव्हे, तर मुलामुलींनी ही सावधान असावे. पळून जाणे, सोपे असते, पण पुढे काय, किती दिवस खाण्या-राहण्यासाठी पैसा पुरू शकणार? आई खाऊ घालते. कधी कधी पाठी लागून, खा रे खा रे, तेव्हा किम्मत कळत नाही. नंतर सगळेच जीवन, " खारे" होते , लक्षात ठेवा. मला एक कळत नाही, या lockdown च्या काळात पोरेपोरी बाहेर पडून भेटताच कशी? घरात काहीच सुगावा लागत नाही, नवल आहे. सुस्थितीतील मुलींनी, एक बाब , ( विचित्र व खालच्या थराला जाऊन लिहितेय) लक्षात घ्यावी.पलायन केल्यावर खाणे व राहणे याची सोय होईल. पण सकाळचे काय🤔? निदान हा विचार करा. अन् घर सोडायचा विचार करू नका. जीवन वार्यावर सोडून , आजवर जीवापाड जपलेल्या, पालकांना धोका देऊ नका. हो, काही माझे वाचक म्हणतील, आमचा काय ह्याच्याशी संबंध? नसेल तर जोडा. संध्याकाळी बागेत जा. कानाकोपर्यातील, " अल्पवयीन", मुलांमुलींचे कान धरा. काहीजण हे काम करतात. पण मारहाण न करता, आपलेपणाने करा. कारण फार मोठ्ठे कार्य आहे हे!
Comments
Post a Comment