व्यवसायाचे गुपित व अगदी रहस्यमय कथा.
११ .७ .२१ रविवार. आषाढ प्रारंभ प्रतिपदा.
आज आहे, रविवार. आरामाचा दिवस, कोणासाठी तर आठवडाभर धावपऴ व दगदग करण्यार्यांसाठी. म्हणजे बहुदा नोकरदारांसाठी. पण आज कित्येक नोकरदार घरीच आहेत,. या कोरोनाच्या lockdown मुळे. त्यामुळे, या रविवाराचे काही अप्रुप राहिले नाही.
पण व्यवसायिकांना विचारा, रविवार, डब्बल कमाई अन् त्यासाठी तिब्बल मेहनत. गिर्हाईकांची गर्दी. आजकाल अर्धा दिवसच दुकान उघडायला परवानगी. तरी त्यातून शोधला कि मार्ग सापडतोच.
असो. तुम्हा वाचकांची संख्या दिवसे नं दिवस वाढत आहे. त्या अर्थी माझे लिहिणे, आवडत आहे, असे दिसते. तरी माझे लिखाण जरा जास्तच परखडपणे असते, मान्य आहे. पण आज मी एक joke सांगणार आहे. माझ्या मावस बहिणीने (सौ. चेतना वाकडे), मला forward केला. मला तो जबरदस्त भावला.
दोन्ही जमातीच्या BUSINESS MIND ची झलक दिसतेय बघा.
एका मारवाड्याने, एका सिंधी माणसाला आपली विहिर विकली. व्यवहार झाला. रितसर कागदपत्र झाली. पण झालं काय, दुसर्या दिवशी, मारवाडी, या नव्या विहिर मालकाकडे आला अन् म्हणाला, " हे बघा, मी तुम्हाला विहिर विकली आहे. पण त्यातील पाणी नाही. ते वापरावयाचे, तर वेगळे पैसे द्यावे लागतील.", 🤔 पण विकत घेणारा पण पक्का व्यवसायिक सिंधी नं. लगेच उत्तरला, " हो, एकदम मान्य. मीच तुमच्याकडे येत होतो. तुम्ही लवकरात लवकर, तुमचे पाणी काढून घेऊन,विहिर खाली करून द्या. नाहीतर विहिर वापरण्याचे भाडे पडेल. अाहे नं, चोरावर मोर.
आपण मुळात पारशी समाजाचा उद्योगी वृत्तीमुळे मुंबईची कशी भरभराट झाली, बघत होतो. गुजराथी व मारवाड्यांच्या बाबत असे म्हटले जाते कि, एक लोटा व चटई घेऊन या नगरीत आले. पण मग त्यांनी बिनभांडवली धंदे कसे सुरू केले असतील. हा अभ्यसनीय विषय आहे. आपण तर इथलेच आहोत. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न नाही. मग हे जे मानेवर एक मस्तक व दोन हात - दोन पाय दिलेत, त्याचा वापर करून, दोन पैसे कमवायला काय हरकत आहे? आपले पालक ही म्हणतात, " काय हो, धंदा उभारायला, पैसे कोठून आणायचे, नाहीतर आमची मुले खूप कामसू आहेत हो. ",
एक मालाडचा दाखला देते. साधारण २००६ची गोष्ट. एका चाळीसाठी builder आला. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे, घरे खाली करून, काही काळाने, ब्लॉक देणार. तोपर्यंत तो भाडे देईल. किंवा ७० हजार देईल. व पूर्ण हक्क सोडायचा. सर्वांनी पहिला मार्ग धरला. पण एक पटेल म्हणून होते. त्यांची ३ मुले म्युनिसिपाल्टीच्या शाळेत जात. माझ्या संस्थेत शिकत होती. त्यांनी नगद घेऊन,मालाड सोडले व थेट डहाणू गाठले. तेथे काय करणार विचारले, तर हसला. सांगायची कथा तर पुढे आहे. जाताना त्याने, २५ हजारात पुठ्ठाचे बॉक्स तयार करण्याची मशिनरी घेतली व जाताना, मालाडच्या मिठाईच्या दुकानातून, वेगवेगळ्या आकाराच्या बॉक्सच्या ऑर्डर्स घेऊनच गेला. व तेथे असे बस्तान बसवले कि, आधी फक्टरीला जागा घेतली व नंतर स्वतःचे घर. २.३ वर्षातच त्यांच्या मुलीचा निकिताचा मला फोन आला," मॅडम, आम्ही आता , पैशाच्या शाळेत जातो , धाकटा भाऊ मध्येच बोलला, " शिवाय मॅडम, तिघांना शाळेचे कपडे व पुस्तके पप्पा पैसे देऊन आणतात. कळला मतलब. मेहनतीला पर्याय नाही. पण इतरांना १० वर्षाने घरे मिळाली. पण जीवनमान तेच राहिले.
आता मिठाईवरून आठवण झाली. आपली परीक्षा पध्दती बदलली . पूर्वी ६०% म्हणजे 1st class खूप थोड्याजणांना मिळे. पण आता प्रश्न पध्दती बदल्याने सर्रास ४०% मुले सहज ६० टक्के मिळवतात. अन् तो 1st class च. मग मालाडच्या प्रख्यात मिठाईवाल्यांनी (अर्थात् गुजराथी वा मारवाडी) दुकानावर पाटी लावली. 1st class मिळालेल्या विद्यार्थ्यांनो, मार्कलिस्ट दाखवा व पेढ्यावर २०% discount मिळवा. मग काय, जे पाव किलो पेढे घेणार होते, ते किलोभर घेऊन गेले. ह्याला म्हणतात business mind.चौपट विक्री झाली व profit 100% च्या ऐवजी ८०% मिळाला. पण व्यवसाय वाढवला नं. उद्या मी दादरच्या एका साड्यांच्या दुकांनाची गंमत सांगीन. आज त्या न. चिं. केळकर रोडवर साड्या- लग्नाच्या बस्त्याचे भले मोठे मार्केट झालेय. पण नीट शोध घ्या. ते shop owners कोण आहेत? कसा त्यांनी जम बसवला. गिर्हाईकांशी, ते कसे मधाळ बोलतात. आता बघा, कोणी म्हणाल, आपल्या "माथी माल मारतात". पण हे, तीन " मा" आपल्याला खरेदीचे समाधान देतात नं? Then why not to be follow their footprints. निदान सभा-मोर्चे - सतरंज्या उचलण्यापेक्षा निश्चित चांगले. अहो, नाराज होऊ नका, मुलांनो व पालकांनो, पण त्या दहीहंडी व गणपतीत नाचण्याची व ढोल वाजविण्याच्या सरावात किती वेळ वाया जातोय, तोच सत्कारणी लावा. प्रतिष्ठित जेष्ठ व श्रेष्ठ मंडळीनो, जरा एकत्र येऊन, आजूबाजूला शोध घ्या . या चुकल्या कोकरांना मार्गी लावा. मग बघा, "पुण्याईची गठरी भरगच्च होईल. 👍👍👍. तर उद्या दादरची व पुण्याची गंमत. 😇🤔
Comments
Post a Comment