सावध मनुजा, सावध रे, करील कोणीतरी पारध रे.
९.७ .२१ . शुक्रवार. जेष्ठ दर्श अमावस्या.
चला, गप्पांना सुरूवात करू या. काल मुंबईच्या विकासावरून, जरा लक्ष हटले. कारण तसेच जबरदस्त घडले. वसई - विरारमधून, आपले हक्काचे व आइवडिलांचे घर सोडून पळून जाणार्या मुलांमुलींच्या संख्येतील लक्षणीय वाढ. हे फार गंभीर आहे. या बाबत मला वाटते, specially या मुलींशी व पालकांशी एकत्रित करून बोलणे आवश्यक आहे. असो. ही समस्या का वाढतेय, ह्याचा गंभीर विचार विमर्श करणे, जरूरी आहे. का? असे का घडत असेल. असो. सध्या आपण मुंबईच्या एकत्र निर्मिती बाबत, इतरांचा सहभाग पाहणार आहोत. त्या काळात, मुख्यत्वे करून, इंग्रजाच्या, या भगिरथ प्रयत्नात, पारसी समाज सामील होता, हे मान्य केलेच पाहिजे. त्यातील महत्वाची व्यक्ती म्हणजे, " सर जमशेटजी जिजीभाई",
परदेशाहून, हा समाज प्रथम, गुजराथेत स्थाईक झाला. ह्यांचा जन्म गुजराथ प्रांतात, नवसारीतील मलेश्वर गावात झाला. जिजीभाई चानजीभाई व जीवनजी हे माता पिता गरीब पण अब्रुदार जोडपे, दुदैवाने जमशेटजी, सोळा वर्षाचे असताना, एकाच वर्षी मरण पावले. तेव्हा जमशेटजी,मुंबईला, आपल्या सासर्याकडे, आले. पण ते काही, सासुरवाडी म्हणून, हातपाय पसरून ऐटीने व मिजाशीने राहिले नाहीत. मला काय म्हणायचेय, कळले नं? सुज्ञास अधिक सांगणे, न लगे. त्यांच्या सासर्यांचे, शेट फ्रामजी नसरवानजी बाटलीवाला यांचे, मुंबईमध्ये कोटात , बाटल्या विकावयाचे दुकान होते. दोघांनी हा धंदा वाढविला. त्या काळी आपल्याकडे काचेचा, कारखाने कमीच असत. त्यांनी चीन देशातून , काचेच्या वस्तू आणवून इथे विक्रीस सुरूवात केली. अन्, सगळ्या घरांतून चिनी मातीच्या बरण्यांना मागणी आली. मोठ्या बसक्या, या बरण्या जाड व भक्कम असत. आठवतेय, लहानपणी सर्वांनी घरोघरी पाहिल्याच असतील. आपल्याकडे वर्षांची बेगमी करून ठेवायची रीत होती. लोणचे,पापड, कुरडया, चिंचेचे गोळे, जाडे मीठ वगैरेची बेगमी करावयाची व वर्षभर वापरायचे, ते टिकाऊपणे ठेवणे, आलेच. या गिनतीने एका घरटी, साधारणतः ४.५ बरण्या सहज खपणार, हा त्या द्वयींचा हिशोब. मग एकदा बाहेर पडल्यावर, त्यांच्या नजरेत, अनेक वस्तु, भरत. अाणि व्यापार वाढतच चालला. फक्त दूरदृष्टी व मेहनत हवी. बस. ते म्हणता म्हणता लखपती बनले. असे असते BUSINESS MIND. येवढेच नव्हे तर ते नुसते पैसे जोडून, स्वतः चे खिसे भरत राहिले नाहीत. तर त्या स्वकमाईतून, इंग्रजांच्या मुंबईच्या सुधारणेत, त्यांनी तनमन मुख्यत्वे करून धन घातले. ह्या त्यांच्या मोठेपणासाठी, आपण त्यांचे ऋणी राहावयास पाहिजे नं?
आता आपण येऊ या, वर्तमान काळात. आजकाल, जो शिक्षणाचा विचका झाला आहे. हां, त्यासाठी कोरोनाला दोष देऊ नका. त्या आधीच, मुलांच्या भविष्याशी खिलवाड होत आहे. शिक्षणक्रमात, जे शिकवायचे , त्याची परिक्षा घेऊन, न कळलेला विषय, समजून घेण्यास प्रवृक्त करण्या ऐवजी , "धडाधड," त्यांना पास करून पुढे ढकलले व नववीत अचानक, विषयांचा base नसल्याने, ही मुले गोंधळात राहीली. व पुढचे शिक्षण थांबले. व राजकिय पक्षांनी, स्वतःच्या पक्षाचे, शक्तिप्रदर्शन करण्यासाठी, या पिढीचा वापर केला. या मोर्च्यातून व सभेतून मुलेमुली एकत्र येतात. मैत्री (?) सुरू होते. पूर्वी काही TV स्पर्धेच्या लोकांनी ही अशा मुलांना, मोबाईल पुरवून, स्पर्धकांना like करण्यास भरीला घातले. मग सुरू झाले, त्याबाबत चर्चेचे सत्र- मैत्री- फिरणे- व हळूहळू जोड्या. पालक अंधारात. अन् ती प्रथाच सुरू झाली boy friend- girl friend ची. दूर दूर संध्याकाळी फिरणे. अन् शपथा- ditch करणे. मग पालकांशी लपंडाव. दूरदृष्टी नाही. पलायनानंतर महिन्याभराने काय करणार, ही अक्कल नाही. मी परखड लिहिलेय. पण सत्य आहे, पटतेय नं? हा आपला समाज आहे. आपले पर्यावरण आहे.तेच प्रदूषित झाले तर, जीवन दुसह्य होईल. ह्याची जाणिव ठेवा. मला काय करायचेय, ही वृत्ती ठेऊ नका. पारशांसारखी लोकोत्तर कार्ये नको.पण आजूबाजूची सामाजिक सफाईवर भर द्या.🙏🙏🙏. तुम्ही वयाने लहानपणात असा वा म्हातारपणात. YOU CAN DO IT. AND YOU ARE GOING TO TAKE ACTION , तर देणार नं, माझ्याबरोबर साथ.
सत्य:- वसई- विरारमधील स्थिती।
परिमडळ बेपत्ता शोध
१. ४० ३५.
२. १३१ १०८.
३. ३५. २७.
एकूण. २०६. १७०.
विचार करा, मग पूर्ण मुंबईत किती?
महाराष्ट्रात किती?
तर Really be active.
Comments
Post a Comment