हितधोरण व धोरणधीर.

 २.७.२१. शुक्रवार  जेष्ठ कृष्ण पक्ष अष्टमी. शुक्रवार . शुभ दिवस.  

     २० शे मधील २१ वे शतक. जुलै आला. म्हणजे अर्धे वरीस सरले हो. दिड वर्षे, ह्या कोरोना/ कोविडच्या विळख्यात काढली. घर एके घर. शाळा - शिक्षण हा तर पोरखेळ झालाय. काल म्हटले, त्याप्रमाणे जणू हा एकच आजार उरलाय. सर्दी ताप खोकला कुछ नही. आता बघा. आमच्या ओळखीत, एका व्यक्तीला काविळ झाली. पण कोरोना टेस्ट वगैरेत वेळ गेल्याने, ते  वैद्याकडे उशीरा पोहोचले. अन् काविळ वाढली. हे तुम्हा सर्वांना खात्रीने माहित आहेच कि, काविळीवर अॅलोपथीमध्ये उपाय नाही. मग हा कोविड मागे लागल्याने, इतर दुखण्यावरील, उपचाराला विलंब होत आहे. मी काल लिहिल्याप्रमाणे, माझा या test वरील खर्च झाला:-approx. 15000/-

   आता दुसरा संदर्भ, कालचाच - संपादकिय बाबत.   

          " धोरणधीर" या वरून आणखी एक शब्द सुचलाय, 

          " हितधोरण". हितासाठी घेतलेले धोरण. स्वतःच्या नाही हं, तर समस्त जनतेच्या हितासंबंधी घेतलेले धोरण-- जर रास्त असेल, तर त्याबाबत कळकळीने  विचार करायचा झाला तर धरसोड वृती न बाळगता, धीराने व  विश्वासाने, संयम बाळगून, प्रतिक्षा करणे, गरजेचे आहे. 

          त्यासाठी छ.शिवरायांच्या भक्तांनी, त्यांच्या सुपुत्राने शंभुराजेंनी लिहिलेल्या, बुधभूषणमधील, मोजक्या अध्यायांचे अध्ययन करावयास हवे होते. ते घरबसल्या झाले असते. सद्य परिस्थितीचे ज्ञान सांगोपांग मिळवणे, शासनकर्त्याला किती आवश्यक आहे, हेच ते  कथन करीत आहेत.  तसेच   त्या संपादकांनी पुढे, जे  निवेदन केले आहे. तेही थोडक्यात व थोडेफार माझ्या शब्दात सांगते. कारण माझेही ठामपणे, तेच म्हणणे आहे. बघा. त्यांनी शिर्षक ही, तिकाटण्याची बागबुग, असे दिले आहे. बागबुग म्हणजे डळमळणे. आता त्यांनी दोन दाखले दिले आहे. काही दिवसापूर्वी सरकारतील, मदत व पुनर्वसनमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांनी, निर्बंध हटविण्याचे जाहीर केले. पण या मान्यवर मंत्र्यांनी  घेतलेला निर्णय , मुख्यमंत्री महोदयांनी माघारी घेतला. पण गंमत म्हणजे लगेच, दुसर्‍याच दिवशी , तोच same निर्णय सरकारी म्हणून,  जाहीर केला.😂 अगदी हेच श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या बाबत घडले. त्यांनी टाटा कँन्सर रुगणालयातील पेंशन्टच्या नातेवाईकांची गैरसोय दूर करण्यासाठी, जवळील म्हाडाची घरे देऊ केली. तीही मु.मं. नी परत घेतली. अन् स्वतः दुसरीकडील देऊ केली. काय म्हणावं, या कर्माला? ह्याला धरसोड वृत्ती ही नाही, म्हणता येत नाही. फक्त credit  माझेच असायला पाहिजे,  दुसरे काय? नाणारचे तेच.    तेच नवी मुंबई विमानतळाबाबत. पुनर्वसनाचे श्रेय दि.बा. चेच. मग त्या   पुनर्वसन झालेल्यांच्या कृतज्ञतेच्या भावनेला, मान द्यावयाचा, तर उलट.

           आता आणखी एक गंमत बघा. अाज कित्येक दशके, " शिवाजी पार्क" ओळखला जातोय नं, त्यात महाराजांची सय आहे नं आदरायुक्त. पण त्याचे नामकरण , "छत्रपती शिवाजीमहाराज पार्क" असे मोठ्ठेपणाने केले, आता तो CSM park म्हणून ओळखला जाईल. या तीन अक्षरांत महाराज लपतील. आणखी एक मुद्दा म्हणजे, लवकरच वरळीस होणारा, " मोगलपार्क" दिमाखाने, मोगलाई दर्शवेल. 🙄😖😨.

            बघा. विचार करा.  इथे आपली मंडळी, आपल्याला काय करायचेय, असे म्हणतेय , हीच दुःखाची व खेदाची बाब आहे. हे माझे विचार वाचाल तर वाचवाल, आपल्या महाराष्ट्रभूमीला. नुसतेच आपल्या महाराष्ट्राच्या सीमेवर, कर्नाटक अतिक्रमण करतेय हो, असे गळे काढून काय होणार, बरे? THINK OVER IT AND DO NEEDFUL IF YOU WISH - YOU WILL.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू