निरावलंबी वास करणे अन् असंगाशी संग.
२०.८ .२१ . शुक्रवार. श्रावण . शुक्ल द्वादशी. शुभ सकाळ व पूर्ण दिवस ही. काल मी जो सेल्फीचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयास केला, त्यावर विचार व चिंतन केले असेल, तर निश्चित पटले असेल नं? हां जरा आचरणात आणण्यास, तुम्हाला वेळ लागेल, पण तुम्ही ही प्रयास कराल, ह्याची खात्री आहे. आता ही अशी selfy कशी काढायची, ह्याची simple idea सांगते. त्यासाठी ध्यान वा जप वा देवासमोर बसून सांग्रसंगीत पूजा करण्याची. गरज नाही. मुलांतरूणांनी, मनाशी विचार करावयाचा व ठरवायचे कि, मी आयुष्यात नेमके काय करू इच्छीत आहे. त्या दृष्टीने कोणते शिक्षण, मी घेऊ शकेन, बुध्दीने, स्मरणशक्तीने, आर्थिक परिस्थिति नुसार तो शोध घ्यावयाचा. जमल्यास loan किंवा शिक्षणाला द्यावयाच्या वेळेनुसार, एखादी part time नोकरी . हा सर्व विचार करणे, म्हणजेच selfy होय. मग ती छोटीसी नोकरी वा व्यवसाय, उगीच ऐटी वा लोक काय म्हणतील, हा विचार न करता, बिनधास्त करावी. मोठ्यांना सेल्फी घेण्यासाठी tips देते. उगीचच दासबोधाचे बैठका वा सत्संगाच्या जागी न ...