स्वतंत्रतेविना स्वातंत्र्य नसावे.
१८. ८.२१ . बुधवार. श्रावण शुक्ल. दशमी.
आलात,माझ्या ब्लॉग ला भेट द्यावयास. खरेच मनापासून स्वागत. आता मात्र नेहमी continue blog चालू.
लवकरच पुस्तक ही आपल्या भेटीस येईल. Just wait and watch.
नेहमी नवनवीन विषयावर बोलू आपण.
आज जरा परत स्वातंत्र्यावरच लिहिणार आहे. पण हे स्वातंत्र आपल्या देशाचे नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातील आहे. आपण मुलांना स्वातंत्र देतो, तसेच मुले ही स्वतःसाठी हक्काने स्वातंत्र मिळवतात व उपभोगतात. पण ती विचाराने व अधिकाराने , " स्वतंत्र" झाली असतात का? तीच नव्हे तर कित्येक वयाने वाढलेली पौढच नव्हे तर जेष्ठ - वयस्क ( सरळ शब्दात बोलायचे तर म्हातारी) मंडळी, अशा बाबतीत, " स्वतंत्र" झाली असतात का?
स्पष्टपणे सांगायचे झाले, तर या दोन्ही शब्दातील ( स्वतंत्र आणि स्वातंत्र्य) यातील फरक जाणतात का? स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला, हवे तसे वागण्याची मुभा. स्वतःच दिलेली परवानगी. स्वतंत्र म्हणजे आपल्यात असणारी क्षमता. आज हे मला आठवायला व मी लिहावयाला कारणीभूत झालेय, एक दुर्घटना. ही का घडली तर, तो SELFY चा हव्यास. हे खरे तर स्वतःवरच केलेले अतिरेकी प्रेम होय. अरे मोबाईलमध्ये येवढे powerful कॅमेरे आहेत तर कलेची, कमाल दाखवा नं! एकतर जर पोहता येत नसेल, तर पाण्याच्या "एवढे" जवळ जायचेच कशाला?
ही काय घटना आहे, ती सांगते. पण अशा अनेक घटना घडतात. पण कोणी अक्कल शिकत नाही. उलट वार्ताहर COMMENTS करत आहेत कि, लोक त्यांना वाचवायला न जाता म्हणे record करत राहिली मोबाईलमध्ये. पोहायला न येता, या प्रचंड प्रपाता जवळ जाण्याचा " परिणाम" समोर दिसत असताना, स्वतःला पोहण्याचा गंध नसलेली, इतर मंडळी, उड्या मारून काय करणार? उलट असे, " व्हिडिओ" तुम्ही पत्रकार , " व्हायरल" करू शकलात. त्याचा BITE न करता, ""मागच्यास ठेच पुढचा शहाणा, "" या धर्तीवर टिपण्णी करा. व असे प्रसंग रोखण्याच्या कामी ह्या recording चा उपयोग करा. मुलांनी व पालकांनी यातून शहाणपण शिका. शौर्य चांगल्या कार्यात दाखवा हो. या मुलांच्या पालकांना , आपली मुले घरातून, टॉवेल व कपडे घेऊन , धरणावर, सहलीला गेलेली कळली नसतील का?हां. लपवून गेली असतील, म्हणाल, खरे ना? पण मग मोबाईल वर असे shoot करून, upload करणारे, मोठे समाजकार्यच करत आहेत हो, दिपगृहाप्रमाणे हे दृश्य दाखवून सावध करीत आहेत. बाबानो, असे ही घडू शकते. अन् या उलट्या गंगेला तोंड द्यावे लागेल. जन्म भर झुरणे, नशिबी येईल.
स्वातंत्र्याचा दुरूपयोग करू नका. जर पाण्याच्या जवळ ट्रिपा काढायच्या असतील, swimming शिका. त्याबाबतीत स्वतंत्र ( आत्मनिर्भर) व्हा. निदान तेथील शिस्त व कायदा पाळा.
हं आता वाचा. ही घटना कशी व कोठे झाली?
भंडार्यातील गोसेखुर्द धरणात, त्याच्या उभ्या भिंतीवर उभे राहून सेल्फी काढताना, पाय घसरून, दोघे भाऊ, पाण्यात पडले अन् जोरदार प्रवाहात वाहून गेले. ह्यातून इतरांनी धडा घ्यावा. हो, आणखी एक point म्हणजे त्या dam wall वर चढायला परवानगी नसते. पण असले कायदे नियम कोण पाळणार? आमच्यासारखे आम्हीच शूर नं! आम्हाला भय नाही कोणाचे!.
तर मग सावध व्हा व इतरांना करा. भले उलट उत्तर मिळेल.पण कोठेतरी ऐकले जाईल. तर भेटू या उद्या.
Comments
Post a Comment