फाळणी व स्वातंत्र दिन.
१७. ८. २१ . मंगळवार. श्रावण शुक्ल दशमी.
पण उद्याचा लेख, मी आज १६ ऑगस्टला, लिहून, नेहमी upload करते. म्हणून म्हटले काल १५ ऑगस्ट - या दिवशी स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण, होऊन आपण ७५व्या वर्षात दाखल झालो व आपण स्वातंत्र दिन साजरा केला. सकाळी सकाळीच आपल्या, निदान माझ्या लाडक्या व आदर्श , पंतप्रधानांचे आपल्या सर्वांना उद्देशून केलेले, भाषण ऐकले. तुम्ही म्हणाल, आम्ही ही ऐकले की. पण सर्वांना प्रश्न पडला असेल कि, मी कोठे होते, इतके दिवस. सांगते, rather I wish to commit myself. Actually I wanted to comfirm myself. मी खरोखर, माझ्या लेखनशैलीत आपल्याला बांधू शकले आहे का? ही तुमची नव्हे तर माझी, माझ्यासाठीची पारख होती. अन् मीच माझ्या परीक्षेत पास झाले. It proves that I and blogs have got space in you mind. Of course, the credit goes to you.
झाले असे कि, लोकमान्यांच्या स्वातंत्र्याच्या मागणीतून, मी स्वतः बद्दल विचारात गुंतले, व नवीन वाचनात मग्न झाले. अन् स्वतःला जरा परिपक्व😀 matured बनवले. आणि अचानक कालच्या माननिय मोदींजीच्या भाषणाने दिशा दिली. नीट ऐकल्यास, मी काय म्हणते, ते लक्षात येईल. आज प्रथम स्वातंत्र्याच्या ७४व्या वर्धापन दिनी ७५व्या वर्षात पदार्पण करताना, काल तुम्ही लेख वाचाल तेव्हा -परवा- प्रथमच, फाळणीचा उल्लेख जाहीर रित्या - त्या वेळच्या दुदैवी जीवांचा, सन्मानपूर्वक- केला. असो. पण खरे सांगू. १ ऑगस्टच्या लेखातील, " स्वातंत्र" या लेखापासून, अगदी हीच फाळणीची कथा, मनात येऊन मन उदास बनले होते. आता मी एक सत्य कथा सांगणार आहे.माझी एक सिंधी मैत्रीण , " मन की बात" सांगे. जेव्हा फाळणीच्या वेळी अनेक कुंटुंबांवर, तेथे अत्याचार झाले. मोठमोठ्या वाड्यात राहणारे सुखवस्तू परिवार , "" निर्वासित"" म्हणून भारतात दाखल झाले. पण कित्येकांचे आणखी मोठे दुःख म्हणजे, त्यांच्या मुली बाळी व सुना तेथेच बळजबरीने तेथे अडकवल्या. त्यांचे काय झाले, हे कधी समजलेच नाही. तर सांगायचे हे कि, ती मैत्रिण म्हणे, त्यांना हे कळत नाही कि, तिच्या नणंदेचे श्राध्द करावे, कि नाही .कारण ती जिवंत असू शकेल ही, तेथे पाकिस्थानात वा मारली गेली असेल? हे केवढे मोठे मनास जाळणारे दुःख, त्यांनी भोगले😭 कल्पनाच करवत नाही. अन् त्यावेळच्या राजकारणापायी , हा उल्लेख करत नसत. का तर त्यावेळची policy व मखलाशी. बस अाज येवढेच. पण हे सर्व ऐतिहासिक सत्य, पुढच्या पिढीपर्यंत, जाणे गरजेचे आहे. हा इतिहास, अभ्यासक्रमात असायला हवा, हे माझे मत पटते नं? मी comments मध्ये लिहा, असे म्हटले, पण कोणी हिंमत करील का? प्रश्न पडला. पण आपल्या पंतप्रधानांच्या भाषणाने, माझी तरी हिंमत वाढली. अन् मधल्या काळात, मी keep mum झाले, तरी रोज वाचक पूर्वीचे लेख वाचत राहीले, हे पाहून मन भरून आले. आणि जाणवले, " जितं मयां"
Comments
Post a Comment