आपली खरी Selfy काढा हो. अन् जाणून घ्या , स्वतःला व स्वःभावाला - स्वःभावनेला - स्वः अनुभूतीला.

 १९. ८ .२१ गुरूवार. श्रावण शुक्ल एकादशी. 

   शुभ दिवस. आज गुरूवार व एकादशी ही. पूर्वी एकादशी निर्जळी करावयाचा प्रघात होता. आजची मंडळी, ही अंधश्रध्दा मानतात. पण त्यामागे शास्त्रीय कारण आहे. पण आज फार मोठ्या राजकारणी कुंटुंबातील व्यक्ती, हे सर्व फालतु आहे. आम्ही तर संकष्टीला चिकन खातो, असे जाहीर करण्यात भूषण मानतात. पण हेच दिवसभर रोजा- म्हणजे पूर्ण निर्जली पाळणार्‍यांकडे संध्याकाळी टोपी घालून, मेजवानी घेतात. असो. आपण आपले पाहू या. हा तर आपल्या पूर्वजांनी नेमून दिलेला SELFY काढण्याचा दिवस. हसलात नं खूप! झाले हसून? आता नीट लक्ष देऊन वाचा पुढील लेख.

    selfy म्हणजे नेमके काय हो? स्वतःची प्रतिमा, मोबाईलच्या कॅमेरात उतरविणे. मग ती प्रदशित करणे . का तर सर्वांनी LIKE , सरळ भाषेत , "वा, छान", म्हणून खोटेच ( कटू पण सत्य) कौतुक करावे. कि मग give & take रितीने, तुम्ही ही त्यांना LIKE करावे. 

    आता आपल्या एकादशीकडे वळू या. self ची ओळख करून घेणे, आपल्या आत्म्याला समजून घेणे, हीच खरी selfy होय. तर पूर्वी गॅस वगैरे नसल्याने भर पावसात चूल पेटवायल कोरडी लाकडे मिळत नसत. त्यामुळे बायकांचा जीव, ती ओली लाकडे पेटवताना, मेटाकुटीस येई. म्हणून पुरूषप्रधान संस्कृती असुून, हा धार्मिक नियम लावला. फक्त पावसाळ्यातच नव्हे तर बारमासी, त्या महिलांना दोनदा आराम मिळू शके. तसेच स्वतःचा विचार करायला, स्व चा भाव ओळखायला वाव मिळत असे. हीच खरी सेल्फी होय. नुसती मोबाईलमध्ये कॅमेरा आहे. म्हणून जेथे तेथे जाऊन असे फोटो काढण्यात काय शहाणपणा वा मोठेपणा ठेवलाय. त्या जागेचा नीट अभ्यास करा. तेथील माहिती गोळा करा, घरी येऊन तिच्याबाबत notes काढा. चर्चा करा. असे आहे कि, ही selfy आपल्याला नेमकी उलटी टिपते. जमल्यास वांगडू बना. त्याने खरी SELFY काढली. तो हो, थ्री इडियटवाला. ते इडियट नव्हते तर आपण अाहोत. मोबाईलची सेल्फी म्हणजे उजवी बाजू डावीकडे अन् डावी बाजू उजवीकडे. आपला मुखडा तिला means selfy ला दाखवता येतो. पण मुखवट्याच्या आतील आपल्याला, इतरजणच काय, पण आपण स्वतः बघू शकत नाही. ते बघा. आपण कोण आपले आईवडिल, तसेच वाडवडील कसे होते व आपण त्यांची किती प्रमाणात व कशी प्रतिमा ठरतोय, ते पहा.

      एक गंमत सांगते, सर्वधर्मसमानाच्या अतिरेकापायी, आपल्यातील काही उत्साही मंडळी, गुड फ्रायडे ला व मोहरमला त्यांना good wishes देतात. किती क्रूरपणा आहे हा, हे माहित आहे का? आधी स्वतःचा स्वधर्माचा स्वदेशाचा आरसा किंवा कॅमेरा घेऊन SELFY काढा. तिचे परिक्षण करा. व समाजाच्या , " फेसबुक"वर upload करा. व जर काही चांगले कार्य हातून घडले/ घडत असेल तर LIKE मिळवा. मला नक्की वाटते, मी हा अशा प्रकारे BLOG लिहून सत्कार्य करत आहे. ज्यांना हे पटेल, ते LIKE AND follow करतील व या कार्यात तसेच ब्लागला SUBSCRIBE करतील.फक्त👍 दाबूनच नव्हे तर स्वतःची खरी selfy काढून तिच्यात, रंग ( विचाराचे व आचाराचे) भरून like मिळवतील. 

      तर उद्या आपली selfy कशी काढाल, याबाबत TIPS देईन. Then see you tomorrow.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू