निरावलंबी वास करणे अन् असंगाशी संग.
२०.८ .२१ . शुक्रवार. श्रावण . शुक्ल द्वादशी.
शुभ सकाळ व पूर्ण दिवस ही.
काल मी जो सेल्फीचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयास केला, त्यावर विचार व चिंतन केले असेल, तर निश्चित पटले असेल नं? हां जरा आचरणात आणण्यास, तुम्हाला वेळ लागेल, पण तुम्ही ही प्रयास कराल, ह्याची खात्री आहे.
आता ही अशी selfy कशी काढायची, ह्याची simple idea सांगते. त्यासाठी ध्यान वा जप वा देवासमोर बसून सांग्रसंगीत पूजा करण्याची. गरज नाही. मुलांतरूणांनी, मनाशी विचार करावयाचा व ठरवायचे कि, मी आयुष्यात नेमके काय करू इच्छीत आहे. त्या दृष्टीने कोणते शिक्षण, मी घेऊ शकेन, बुध्दीने, स्मरणशक्तीने, आर्थिक परिस्थिति नुसार तो शोध घ्यावयाचा. जमल्यास loan किंवा शिक्षणाला द्यावयाच्या वेळेनुसार, एखादी part time नोकरी . हा सर्व विचार करणे, म्हणजेच selfy होय. मग ती छोटीसी नोकरी वा व्यवसाय, उगीच ऐटी वा लोक काय म्हणतील, हा विचार न करता, बिनधास्त करावी.
मोठ्यांना सेल्फी घेण्यासाठी tips देते. उगीचच दासबोधाचे बैठका वा सत्संगाच्या जागी न जाता स्वतः वाचन करा. फक्त त्याच दिवशी , "तासभर" कोणीतरी सांगतेय व तेथे माना डोलावयाच्या, हे खरे नव्हे. जर एखादा दुसरा वेळ मनापासून ऐकाल, तर निश्चित स्वतः तो ग्रंथ वाचावा, ही प्रेरणा, मनात येणारच. हां. विशिष्ट गट तयार करून, पण मोजकीच जनता असावी. असे ठरवा कि, दासबोधातील विशिष्ट समास- दशक घरी वाचावा व भेट ठरवून, त्यावर चर्चा करावी. नाहीतरी मोबाईलवरून, त्या फालतू मालिकांवर वार्ता करताच ना? मग बघा जरा असे करून. पुरूषांना ही वेब सिरियलमध्ये गुंतताना पाहिलेय.
अाता आपली संत मंडळी, याबाबतीत, काय सांगून गेलेत, ते बघू.
असंगाचा संग धरणे।
निरावलंबी वास करणे ।
निःशब्दासि अनुवादणे।
कोणे परी । ।
हा आहे, दासबोधातला दशक ७ वा समास ७.
नाव दिलेय , "साधनप्रतिष्ठा निरूपण.
साधन म्हणजे आपल्या जीवनाचे व जिविकेचे साधन- उद्दिष्ट. तेच जर ठरवले नसेल, तर आला दिवस , गेला दिवस. असलेच निष्क्रिय जगणे.
आता विचार व चिंतन करा, नेमके तुम्ही कशासाठी जगताय? आता काय वय झाले, शिवाय कोरोनामुळे अडकून पडलोय, काम असतात हो वेळ कसा काढणार, कंटाळा येतो, घरात बसून वगैरे परस्पर विरोधी बयाती- excuses ऐकली कि गंमत वाटते, आज एवढेच. दोनदा वाचा. हां एक आयडियेची कल्पना सांगते. वेळ सत्कारणी लावण्याची. पण उद्या. तर ती संकल्पना सविस्तर उद्या व परवा मिळून.
तोपर्यंत वरील चार ओळी वाचा व समजण्याचा प्रयत्न करा. मग करीनच चर्चा.
चलो बाय आज पुरता. एरवी मी भेटतच रहाणार.
Comments
Post a Comment