सायबर गुन्हे व आत्महत्या कारणे व इतरही

 12.9 .2023 . सायबर गुन्हे व आत्महत्या - कारणे- इतर ही, पण हे त्यातील मुख्य कारण.

         सुज्ञ व जागृत वाचक हो, प्रथम मी आपली क्षमा मागते. कारण हो, प्रत्येक घटनेमागे, कारणमिमांसा असतेच. तर काय झालेय, काल माझी लिखाणाची भट्टी जमली नाही. मलाच ते जाणवत होते. जर आपण काही तणावाखाली असलो तर regular काम ही बरोबर साधत नाही. मान्य आहे नं? असो. आज मी आपल्याशी महत्वाचे हितगुज करणार आहे. या विषयाशी आपला काय संबंध, असे मानू नका.  भाकरी का करपली, ही समस्या सर्वांना परिचित आहेच.  आज मी एका मान्यवर वर्तमानपत्रातील 

  " मुंबई चौफेर" मधील तीन बातम्यांविषयी सांगणार आहे.  खरे सांगायचे, तर या पेपरमधील बातम्या व लेख, नेहमीच अभ्यासपूर्ण  लिहिलेले असतात. विशेषतः संपादकीय व बिटविन द लाईन्स.

      १. तर यातील डॉक्टर माशेलकरांनी, जे म्हटलेय, ते फार महत्वाचे आहे. ते सांगतात," तरूण सुशिक्षित असण्यासह रोजगारक्षम असणे, महत्वाचे होय. जेव्हा मुलेमुली शिकतात, मोठ्या पदव्या पदरी बांधतात- हसू नका. तेव्हा त्यांचे commen sense कमी पडते. व ते , बेरोजगार category मध्ये सामिल होतात. कारण ते फक्त पदवीधारी असतात. पण त्यांच्यात रोजगारक्षमता नसते.  मोठ्ठ्या  पगाराच्याच अपेक्षा असतात. पण  चोखंदळपणा पायी ते, जे mandays वाया घालवतात, त्याचे काय,  मग आपल्या दुसर्‍या बातमीचे शिकार होतात. बघा.

      २. भारतात  १५ ते ३५ या गटातील आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त- डॉ.अजय चंदनवाले.  हे का घडते, याचा सांगोपांग विचार करू या. 

        जी मुले ," बुध्दीमत्ता वरिष्टम् " या category  असतात. त्यांच्या बाबतीत, एक मोठा PROBLEM CREATE केला जातो. हो, त्यांच्या समोर ही समस्या बाहेरून नव्हे, तर पालकांकडूनच निर्माण केली जाते. अतिरेकी अपेक्षा. मग एखाद्या गेलेल्या, मार्कासाठी,  दोष दिला जातो. अन् सुरू होते, घोड दौड. अगदी कधी कधी अभ्यासाव्यतिरिक्त संभाषणच नसते. खेळासाठी कमी वेळ मिळतो. एखाद्या सोसायटीतील समवयस्क मुलांच्या शाळा- ट्युशनच्या वेळा न जुळल्याने एकत्रित खेळ होत नाहीत अन् मग team work चा अनुभवच  नसल्याने पुढे ,

   " रोजगारक्षमता" ह्या बाबतीत ही पिढी मागे पडते 

   व I am the best हीच भावना उरते. किंवा उलट सतत  

अतिरेक झाल्याने दबाव पडल्याने  स्फोट होऊ शकतो. सरळ शब्दात मानसिक उद्रेक होतो. व नको ते घडू शकते. क्रं एकची शक्यता दूर केली, तरी क्रं. दोनची  शक्यता होतेच. कधी कधी शालेय जीवनातील टॉपर पुढे कॉलेजमध्ये मागे पडू शकतात. कारण tution & guides च्या आधारेच (तसेच पालकांच्या मदतीनेच) अभ्यासाची सवय असल्याने,  कॉलेजच्या शिक्षण पध्दतीशी ( self study work) शी जुळवून घेऊ शकत नाहीत.

      पूर्वी निबंध व प्रश्नाची उत्तरे स्वतः तयार करावी लागत. त्याप्रकारे मार्क मिळत. पण आजकाल तयार उत्तरे व गाईड चे निबंध लिहिले तरच मार्क दिले जात. पण आजच्या मुलांना क्लासेस मधून तयार material दिले जाते. मग धडे वाचून,  स्वतःचे डोके चालवून, परीक्षा देण्याची गरजच भासत नाही.  हां, तुम्ही म्हणाल, सायबर गुन्हाशी ह्या सर्वांचा काय संबंध? खूप जवळचा संबंध आहे. पुढे पैशाचे व्यवहार investment  & salary - perks ह्याची तुलना करण्याची क्षमता निर्माणच होत नाही. 

      ३. कोणीतरी अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून एखाद्या ठिकाणी भरमसाठ परताव्याच्या प्रबोधनाला बळी पडून गुंतवणूक केली जाते. मग आहेच पोलिसखाते दिमतीला. काही  माहीती नाव- गाव सांगू शकत नाहीत,अन् म्हणे  शोधा आरोपीला. काय म्हणावं या कर्माला?  तर सावध मनुजा सावध रे,  करील कोणी(ही) तरी पारध रे! 

      तर हे टाळण्यासाठी आपल्या माणसांना सावध करण्यासाठी काय कराल बरे? JUST SHARE THESE BLOGS TO YOUR NEARS &  DEARS PERSONS. AND ASK THEM TO VISIT THIS BLOG REGULARLY.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू