फसवणूक होणे, वाईटचपण हे का व कसे घडत, ते पाहू
२२.८.२०२३. पुनःच हरि ॐ. फसवणूक होणे, हे वाईटच , पण हे का कसे घडते, ते पाहू
सावधान व सजग होणे, आवश्यक आहे, हो वाचक हो, आज बरीच मोठी gap घेतली, त्याबद्दल क्षमस्व. काही tech व काही विशिष्ट बाबतीत माहीती मिळवण्यात गुंतले होते. असो. आता माझ्या जरा १५ दिवस अाधीच्या ब्लॉग संदर्भात लिहिणार आहे. त्याचे वाचन व मनन करणे, सर्वांच्या हिताचे आहे. फसवणूक होणे, हा प्रकार वाईटच~~ पण ह्या घटना का व कशा घडतात. ते पाहू. प्रथम, त्या विशिष्ट २.८.२३ ह्या ब्लॉगचा, एका भागाचा संदर्भ देते.
महाराष्ट्र टाईम्सच्या ३१जुलैच्या रविवारच्याच पेपरमधील, पहिल्याच पानावरची, “देशभरातूम १३.१३ लाख मुली, बायका बेपत्ता.” विचार करा, ह्या इतक्या मोठ्या संख्येने बायका व मुली का व कशा फसत असतील व त्या फसवणार्या मंडळींना कसा काय आत्म(!) विश्वास असेल की , आम्ही “या”, विशिष्ट select केलेल्या मुली/ बायकांना, जाळ्यात ओढू शकू. तोही गुन्हेगारांचा, एक प्रकारचा, मानस शास्त्राचा अभ्यास, असणार. असतोच. ज्या मुली साध्या, नाकासमोर चालणार्या असतात किंवा एकदम अभ्यासू असतात. ज्यांना पुस्तकीच ज्ञान असते. मार्कांच्या मागे धावत असतात, असा मुली त्यांचे target असतात. कारण ह्यांचे पालक, त्यांच्याशी अभ्यास/ मार्क्स याव्यतिरिक्त संभाषण करत नाहीत. त्यामुळे, काही प्रमाणात दडपणाखाली जगतात. त्यामुळे प्रेमाच्या जाऴ्यात, लाडिक स्वरात बोलण्याच्या भुकेल्या असतात. तसेच साध्या दिसणार्या, मुली एक प्रकारे, शिस्तीच्या दडपणात जगत असतात. म्हणजेच, मग आया घरकामात गुंतलेल्या व वडिलमंडळी, कामाच्या बागुलबुवात, मुलांमुलींशी गप्पा मारत नाहीत. त्यामुळे घरात संभाषण नाही. व हातात मोबाईल व महिलावर्ग, आपल्या मनोरंजनाच्या नावाखाली, मालिकेतून गुंतलेला. काय सांगायचे, कित्येकदा,, त्या मालिकेतील परिवाराच्या, कथित PROBLEM पायी, घरात काय घडतेय, ह्याची दखलच नसते. मग अशा वातावरणात वाढलेल्या, मुलींना सोनू- my love-my baby वगैरे संबोधनांचे आकर्षण वाटते. व त्या प्रत्यक्ष वा मोबाइलच्या जाळ्यात बरोबर अडकणार, हा “त्यांचा” होरा असतो.
पुन्हा मी एक सल्ला देते. टिव्ही बघताना, अधनं मधनं
crime patrol satark / dastak बघत रहा. अशा केसेस मध्ये missing complaint द्यावयास आलेले पालक, पोलिसांना, मुलीची दैनंदिन येजा -मैत्रिणी – मित्र या विषयी काही माहिती देवू शकत नाही. वर मुलींचे पालक , ठामपणे सांगतात, आँ! मित्र, शक्यच नाही. व पोलिसांना चूप करतात.नंतर हे असे उघडकीस येते. पण ते ही पोलिस तपासात. या, “तसे काही ही नाही हं, आमची मुलगी अगदी नाकासमोर चालणारी आहे. उगीच काही ही बोलू नका वगैरे.”अशा अर्धवट माहितीमुळे, या केसेस,SOLVE होत नाहीत. अन् बातमी येते. बेपत्ता मुलींची संख्या वाढत जाते. हेच सत्य आहे. पोलिस तरी काय डोके फोडणार? त्यांच्या कडून कशी अवास्तव अपेक्षा करावी. विचार करा व सदाचार करा. “श्रध्दा” निर्माण होऊ नयेत. तर आपणच सजग व सावधान होणेच आवश्यक आहे. तर आपल्या मुलांमुलींच्या, बाबत अंधश्रध्दा नसावी, हा विचार सर्वत्र पसरायला मला मदत करा. subscribe and share my blog. उगीच goodmorning चे देवांचे फोटो forward करण्या पेक्षा , ह्या share ने सत्कार्य करा.🙏. तर भेटू, परत परत.
Comments
Post a Comment