गणेशोत्सव चालू अाहे. पितृपक्ष येत आहे.त्याबद्दल थोडे पण आशयाने मोठ्ठे.

 २१.९ .२०२३. गणपती होत आहेत. पितृपक्ष येत आहेत. त्याबद्दल थोडे पण आशयाने मोठ्ठे.

        प्रिय सुजाण व सक्षम वाचक हो, आपण सर्वजण  सणवार- प्रिय आहोत. पुर्वीच्या काळापासून एकप्रकारे एकत्रित येण्यासाठी, हे सण सामजिक रित्या रूढ झाले. धर्म आपल्याला एकजीव राखतो. आम्ही एक आहोत, ही मनोधारणा निर्माण होते. हां, गणपती पूर्वी फक्त घरोघरी आणत असत. पण एका कुळाच्या सर्वजणांना, त्यातुून एकीची भावना शिकवली जात असे. लोकमान्य टिळकांनी यातूनच समाजाला एकत्रित केले. हां, तर पुढचा विचार करू या. काल रस्त्यात येताना, एका पौढ महिलेला बोलॡताना ऐकले, गणपतीची गडबड झाली कि, पौर्णिमेलाच खरेदी उरकली पाहिजे. नंतर पितृपक्षात काही करता येणार नाही. काय बोलायचे? पितृपक्ष म्हणजे नकारात्मक दिवस अशी अंधश्रध्दा का निर्माण केली गेली व केव्हापासून. खरे तर वेद- पुराणात , या पंधरवड्याला निषिध्द मानले वा सांगितले नाही. खरे तर, "हे"  दिवस आपल्या पूर्वजांचा आशिर्वाद मिळवण्याचे आहेत. आपण त्यांना तृप्त करतो. त्यांची शांती नाय करत. आपली त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपण ताट ठेवतो. कधी लक्ष देऊन पाहिलेत, या दिवसात ठेवलेले  गोडाधोडाचे पान फक्त कावळेच खातात. इतर पक्षी- प्राणी खात नाहीत. कारण तो अधिकार कावळ्यांचाच असतो. त्या एका पक्ष्यालाच एक प्रकारे दिव्य शक्ती असते. त्यांना, " वायस" असे ही संबोधतात.  त्यांना, " आत्म्याची" चाहूल कळते. तुम्ही जेव्हा आवाहन करता, तेव्हा ते पूर्वजांचे आत्मे जवळ येऊन, दूर जातात व काकस्पर्श होतो.  

        एरवी हे कावळे सहसा, माणसांच्या समीप येत नाहीत. पण फक्त या दिवसातच ते जवळ येऊन अन्नसेवन करतात. तसेच, आजकाल एक प्रथा सुरू होतेय.सुधारक,  आपल्या मृत नातलगांच्या नावाने, अनाथ वा , गरीबांना अन्नदान करतात. जर दान  करायचे, तर त्या व्यक्तीच्या जन्मदिवशी करा. त्यांची जयंती साजरी करा.  मृतांच्या नावाने, अनाथांना दीन करू नका. बर्‍याच वेळा आजकाल, या मागे त्या व्यक्तीच्या शांतिची भावना असते. 

        तसेच अाधी लिहिल्याप्रमाणे, हे दिवस , चांगल्या कार्यासाठी, निषिध्द मानतात. काहीजण अंधश्रध्दा म्हणून हे ,  " उपचार" करत नाहीत. पण आपल्या मुलांसाठी , शाळातून साजरा होत असलेला , होलोव्हिन" बेऽऽस् साजरा करतात. अगदी इंग्लिश मिडियमच्या  शाळेत सांगितलेल्या सूचनानूसार मुलांना भुताप्रमाणे skeleton (हाडाचा सापळा) बनवून तयार करून पाठवतात. अहो, हा त्यांचा, " पितृपक्षच असतो. ते मृतांना पुरतात. त्यामुळे, ते सापळ्याच्या रूपात, पुर्वजांना बघतात. आपल्यात मरणानंतर आत्मे हवेत मिसळतात. त्यांचे अस्थित्व फक्त कावळेच जाणू शकतात.  ते जेव्हा घास घेण्यास येतात. तेव्हा नीट निरिक्षण कर. डौलात येतात. व शांत पणे ग्रहण करतात. एरवीच्या दिवसात, जर उघडे अन्न खायचे असेल, तर एकप्रकारे सावध झडप घालतात व झटकन दूर होतात.   सगळ्या पूर्वापार समजुती वा प्रथा अंधश्रध्दा मानून outdated ठरवू नका. आपल्या लोकांचे, असे आहे कि, 

 अापले पुर्वज करत, ते चिल्लर ( मी चांगला शब्द वापरतेय)

  अन् पाश्चिमात्य करतात ते, वा ह वा!( खरे तर??)  तेव्हा  उद्या ही आणखी काही महत्वाचे लिहिणार आहे. ॐ बद्दल. मला माहीतेय. तुम्ही, मनात म्हणत असाल, सायबर दक्षता, या विषयात, हे काय मध्येच? मी बरोबर Track वर आहे. आपल्या मनातील श्रध्दा आपण काढून टाकल्यावर जी पोकळी निर्माण होते, ती मग syber interest ने भरून काढली जाते.   म्हणून सांगते, आपल्या," आत्मारामाला ओळखा, आपलेसे करा. मग ह्या बाह्य   टक्करापासून सुरक्षित रहाल. तर भेटू या, याच पानावर यानि ब्लॉगवर सह परिवार सह आप्तस्वकियांसह व मित्रमैत्रिणीसह मतलब subscribe and share this blog to your dear & nears 

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू