आपले पितर- कुळातीलच नव्हे, तर शास्त्रज्ञ- साहित्यिक- इतिहास घडवणारे- एकूणच.
२२.९ .२०२३ आपले पितर - कुळातीलच नव्हे, तर शास्त्रज्ञ - साहित्यिक - इतिहास घडवणारे - एकूणच.
प्रिय वाचक हो, सुस्वागतम्. आज मला कळत नाही कि, मी माझ्या लेखनशैलीचा अभिमान करू कि, आपल्या उत्साही वाचनाचे कौतुक करू. आज गणेशोत्सव असून ही आपण माझ्या ब्लॉगला मोठ्या संख्येने भेट दिलीत. किती आनंद झालाय, कसे सांगू? खरे तर मी जे लिहीत आहे, ते जरा गंभीर असून ही , तुम्ही आस्थेने, यात भाग घेतात, हा तुमचा चोखंदळपणा आहे.
हां, ते मी काल म्हटल्या प्रमाणे, " ॐ" बद्दल सांगणार आहे. ही आपल्या हजारो वर्षापूर्वीच्या, पूर्वजांनी, ऋषी. मुनींनी दिलेली, ठेव आहे. ती आपणाला जशी पिढ्यान् पिढ्यापासून मिळाली आहे, ती आपल्याला पुढच्या पिढीकडे सुपुर्द करावयाची आहे. आधीच्या पिढ्यांना हे सोपे गेलेय. कारण तेव्हा इतर आकर्षणे व प्रलोभने नव्हती. मी ७३ वर्षाची आहे. तेव्हा सर्व आज्ञाधारक असत.
" का" व " कशाला" हे सवाल मुलांच्या मनात ही नसायचे. खरे ना? पण आज चौकसपणा वाढलाय. खरे तर तोच स्थायीभाव झालाय. "आमच्या पिढीत," हा शब्दप्रयोग सदैव चालत आलाय. पण ह्याला या दोन पिढ्याच जबाबदार आहेत. असो. अाता काय करू शकतो, तो विचार व आचार करू या. कोठचीही गोष्ट नेहमी स्वतः पासून सुरू करावी. म्हणून आपण ( माझे सर्व वयोगटातील वाचक मंडळी, थोडा जप- एखादे स्तोत्र वाचण्यास प्रारंभ करा. अर्थात् त्याच्या आहारी जाऊ नका. एक वही पेन जवळ ठेवा. दररोज एक पेपर वाचा. त्यातली मनाला भावलेली एखादी बातमी लिहून काढा. या साठी एक उत्कृष्ट वाचनिय पेपर suggest करते- " मुंबई चौफेर .
त्यात त्या नंतर नियमित फक्त ५ वेळा
ॐ ॐ ॐ ॐ ॐ लिहा. जेव्हा आपण एखादे लिखाण करतो. तेव्हा , त्याचे ४ वेळा वाचन होते. तसेच मुलांचा अभ्यास घेताना करा.
मनाच्या श्लोकात प्रारंभीच, "चत्वार वाचा " असा उल्लेख आहे. १.परा. २.पश्यंती. ३. मध्यमा. ४. वैखरी. ह्या प्रकारे वाचन केल्यास, जो आनंद व माहिती मिळते, ती स्मरणात कायम रहाते. व वाचनाची गोडी- मग तो अभ्यास असो वा गोष्टींचे पुस्तक असो वा वर्तनानपत्र असो. मग फालतू मालिकातील interest नक्कीच कमी होईल. अहो, तीच ती रटाळ कथानके- कौटुंबिक भांडणे, पहाण्यापेक्षा पेपरमध्ये निश्चितच नवनवी माहीती व घटना समजतात. हां, असे म्हणू नका कि, काय असते, त्यात खून मारामार्या व राजकारण! तेच तर आपले समाजकारण आहे. आपला परिसर न पाहीलेली मंडळी retirement नंतर लाखो रूपये खर्च करून युरोप अमेरिका प्रवास करतात अन् मग अासपासच्या लोकांना तेच गोडवे व तेच फोटो दाखवून bore करतात. डॉ. आंबेडकरांनी एक छान उपयुक्त संदेश दिलाय, " वाचाल तर वाचाल", ते आरक्षण मिळवण्यापेक्षा , दररोजचा पेपर, पाठ, पुस्तक व पोथी ही ,"प" ची बाराखडी आपलीशी करा. अन् हो, माझा हा ब्लॉग ही वाचत रहा. जमल्यास तुम्ही लिहा. आधी २.३ ओळी नंतर पान नी पान come on start and read my blog regularly. and of course share. Then discuss these points with them whom you shared.( चत्वार वाचा बद्दल उद्या सांगते. समर्थरामदासांनी, " ही फार मोठ्ठि देणगी दिलेय.)
Comments
Post a Comment