-आपण सावध तर अवधान जागेवर.सणवार करान सजग ही रहा.

 २३.९ .२०२३ . आपण सावध तर अवधान जागेवर.  सण करा व सजग ही रहा.


   ॐ गणेशाय नमः। सुस्वागतम् , रसिक व सुज्ञ वाचक हो, या, वाचा अन्  आणखीन् सुजाण बना. मी माझ्याकडून थोडे फार ज्ञान आपल्याला देऊ शकतेय. हे माझे भाग्य आहे. खरे तर, ही माझ्या पुर्वजांची देन आहे. especially , माझ्या आजीची ( सर्व तिला काकी म्हणत) 

     मी सदैव तिची शेपूट असे. तिचा पदर धरून देवळात जाई. त्याचा मला फायदा झाला. तेथील किर्तन व प्रवचन कानावर पडे. पण गंमत म्हणजे, ते सर्व आजही ७३व्या वर्षी ( माझ्या लक्षात राहिलेले) पण खरे तर शालेय व कॉलेज जीवनात, मी यथातथाच होते. तेव्हा ही स्मरण शक्ती??? 😉😊. असो. हीच ठेव या  electronic माध्यमातून, तुमच्याकडे pass on करतेय. 

     हं, तर आपण आपल्या सायबर दक्षतेकडे वळू या.  जरा परत मूळ विचारात लक्ष घालू. जर एखादे भांडे रिकामे असेल, तर त्यात काहीही भरून जाते. तसेच आपल्या मनाचे आहे. आपण रस्त्याने जाताना,  विचाराच्या नादात चालत असलो, तर अचानक पुढे आलेले, वाहन, धडक देते. आजकाल फुटपाथवर ही काही खरे नाही. तेथे ही दुचाकी येतात. तसेच हातातील, मोबाईल वरून, सायबरच्या रस्त्यात होते.  आपण किती ही त्यात सरावलेले असलो, तरी त्यातील कित्येक खाचखळगे आपल्याला माहीत नसतात. आजी म्हणे, रस्ता किती ही पायाखालचा असला तरी खाली व समोर लक्ष असावे. आता सध्या फक्त facebook व whats up चा विचार करू या. 

     whats up वरून बरेच वेळा unknown च नव्हे तर आपलेच परिचित काही मेसेज forward करतात.  डॉक्टरचा सल्ला-योगा- GM& GM चे मेसेज देवांचे व गुरूचे फोटो वरून पुढे पाठवा, चांगले होईल वगैरे व आपण ही विचार न करता forward  करून पुण्य कमावतो😍😊. जरा ॐ पाठवा व शुध्द मराठीत टाइप करून संदेश द्या. परवा लिहिल्याप्रमाणे, टाईप करताना ही त्या शब्दाचा आपण उच्चार करतो.   त्यायोगे सहाजिकच नाम उच्चारण होतो. हो, एक आणखीन् point असा कि, whats up मध्ये एखादी पोस्ट वा फोटो जितक्या जास्त वेळा forward होतो, तितक्या प्रमाणात पोस्टकर्त्याला पैसे मिळतात. आपल्या पुण्याच्या कल्पनेच्या जीवावर ,"तो" कमावतो. हेच आणखी एका प्रकारे घडत आहे.  एखादा मुलगा/गी हरवली आहे, तिचा फोटो पुढे पाठवा. हे ही कित्येकदा खरे नसते. एक गंमत म्हणजे, एक अशी पोस्ट नेहमीच येते. एखाद्या कारला अपघात झालात. पालक मृत झालेत. मुल नाव सांगू शकत नाही.( फोटो ५ते ९ वय)  त्याला मदत करा forward करा. अन् तुम्ही सामाजिक जाणिवेतून, " घे की forward " चालू करता. पण विचार करा, जरी हे मुल नाव सांगू शकत नसले( ही शक्यता कमीच), तरी कारमध्ये , लायसन्स  व जरूरी पेपर्स असतात ना? पोलिस त्यावरून शोधणारच ना?  आजकाल मुल सापडले, तर पोलिस, त्याचे duplicate आधार कार्ड तयार करतात. व उत्तर मिळते, त्याचे मूळ कार्ड कोठचे आहे. पण भोळे व  ज्यादा  शहाणे , समाज कार्य करू इच्छिणारे, धडाक्याने forward करतात. व समाजकंटकांना, पैसा कमावण्याची संधी देतात. तर ही फसवेगिरी तरी  थांबवणे, आपल्या हातात आहे. तर, माझ्या दक्ष वाचक मंडळींनो, ह्यात तुमचे काही नुकसान नसले तरी हा सायबर क्राईम वाढतोय व  FORWARD   करून, त्यांचे खिसे भरू नका. मग त्यांची हिंमत वाढते. अशाच कमावलेल्या पैशाच्या जोरावर, शाईन बागसारख्या घटना घडलेल्या आहेत. अहो, कित्येकदा हे फोटो पाठवणारे~~ स्पष्ट लिहित नाही. सुज्ञास सांगणे न लगे। तेव्हा be alert. व जागे रहा. या  मोबाईलच्या दुनियेत, अजाणता, अपराधाला पाठिंबा देऊ नका. हे थांबवण्याचाच माझा प्रयत्न आहे. Be with me and become alert to others काय व कसे परत परत सांगत नाही. तुम्ही जाणताच.~~~~~~~.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू