आज परत पितृपक्ष म्हणजे महालयवर आचार्य शंकराचार्यांचे भाष्य.

 २६.९ .२०२३ . आज परत पितृपक्ष म्हणजे महालय विषयी भाष्य.

        माझ्या प्रिय बुध्दिमत्ता वरिष्टम् अशा सुजाण वाचक हो,   मी परत हाच विषय घेतलाय , कारण आज मी माझे मत सांगणार नाही. तर श्रेष्ट हिंदु आचार्य शंकराचार्यांचा, शिष्य- साधक महापेरियर- यांच्याशी झालेला संवाद सांगणार आहे. मूळ संस्कृत मध्ये आहे.  

        साधक महापेरियर, आचार्यांना  ( अगदी आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न) विचारतात ," आचार्य गुरूवर्य, महालयात,पितृपक्षात, आपण कावऴ्याला जेवण ठेवतो ते का?आपले पूर्वज काय , या नीच घाणेरड्या व काळ्या कुळकुळीत पक्ष्याच्या रूपात येतात? ते मग एखाद्या उच्च समजल्या जाणार्‍या छान पक्ष्याच्याच स्वरूपात का येत नाहीत? 

         तेव्हा आचार्य शंकराचार्य मंदस्मित करीत म्हणतात, " आपण कावऴ्याला, तामिळमध्ये कऽ कऽ म्हणतो. संस्कृतातही काक म्हणतो. ते त्याच्या  ओरडण्याच्या सूरावरून. इतर कोणाही प्राणी पक्ष्याला असे त्याच्या बोलावरून नाव नाही. संस्कृत भाषा एकाक्षरी मूळ शब्दात आहे. "का" पथ चा अर्थ "माझे रक्षण कर." म्हणून, जेव्हा आपण अन्न ठेवतो, तेव्हा, का का  असे आवाहन करतो. ते आपल्या पूर्वजांना उद्देशून असते. सर्वसाधारणतः या कावळ्याला रंगा वरून नीच जातीचा समजतात. कारण तो वाट्टेल ते- घाणेरडे ही खातो. त्या योगे तो आसमंतातच स्वच्छता राखतो.  अन् हे पुढील सत्य, आजकालच्या, " सुर्यवंशी ( उशीरा उठण्यार्‍या) समाजाला कसे कळणार? हा पक्षी, आपल्याला, ब्राह्ममुहूर्ताला (पहाटे४.३०) उठवतो. ज्या वेळेस जप करणे, उत्तम असते.  हां, कोंबडा सुर्योदयाला आरवतो.  तेव्हा कावळा हा आपल्याला जपयागास पथकर - मार्गदर्शक आहे. त्याचा उत्तम गुण म्हणजे, त्याला, थोडे जरी अन्न मिळाले, तरी तो काव काव ओरडून आपल्या बांधवांना बोलावितो. म्हणजेच , एक तीळ सातजणांनी वाटून खावा, या उक्तीचे  उदाहरण -  फक्त हाच आहे. इतर प्राणी पक्षी खाण्यासाठी खेचाखची करतात. संध्याकाळी सुध्दा ते घरट्यात परत आल्यावर कावकाव करतात. जणू आपापसात संवाद करतात. त्यांची एक खासियत म्हणजे कावळे कधीही सुर्यास्तानंतर अन्न ग्रहण करत नाहीत. आपल्या शास्त्रात ही सुर्यास्तानंतर अन्नग्रहण त्याज्य आहे. आता सध्याच्या जीवनपध्दतीत, ते शक्य नाही. असो.

          हा पक्षी आपल्याला पितरांप्रमाणे, का का  म्हणजे सर्वाचे रक्षण करा, सांगतो. शिवाय मी परवा सांगितल्याप्रमाणे, या महालयाच्याच काळात हक्काने ते घास खातात. एरवी सावधतेने असतात. ते सदाआनंदी असतात. जे मिळेल त्यात समाधानीअसतात.

           आता हे शिष्यवर्या, नीट लक्षपूर्वक ऐक व एका प्रश्नाचे विचार करून उत्तर दे .वड व पिंपळ हे वृक्ष आपल्या जिवित प्राण्यांना उपयुक्त आहेत, जीवनदायी आहेत, हे मान्य आहे ना? शिष्य:- हो , गुरूवर्य," आचार्य उद् गारतात," पण ह्या दोन्ही वृक्षांची रोपे वा बीज  यांचे रोपण करता येत नाही. ते आपोआपच उगवतात. ते असे की फक्त कावळेच त्यांची पाने वा बीजे खाऊन पचवतात, तेव्हा प्रक्रिया होऊन त्यांच्या विष्टेद्वारे , जेथे ते बीज पडते, तिथेच हे रूजतात व वृक्ष उगवतात. जे आपल्याला पोषक आहेत. म्हणून स्त्रियांना या दोन्ही वृक्षांच्या प्रदक्षिणा, घालण्यास, हिंदू धर्मात सांगितले आहे". तसेच हा काळ ह्या कावळ्याच्या विणीचा- अंडी घालण्याचा असतो. त्यांची प्रजा उत्कृष्ट व्हावी,  त्यांना , चांगले अन्न मिळावे,  म्हणून ही सोय. हे शिष्योत्तमा,  ह्या पक्ष्यालाच फक्त आत्माची चाहूल कळते. हे आहे, काक महात्म्य।  हे  समजून, या प्रथेचे पालन करण्याचा प्रसार व  प्रचार तु करावास."ते जीव संपुष्टात आले, तर वड व पिंपळ हे उपयुक्त वृक्ष ही नामशेष होतील. 

             तेव्हा माझ्या सुज्ञ व जिज्ञासू वाचक वर्गाने ही  आचार्य शंकराचार्यांचा उपदेश आत्मसात करावा व त्याचा प्रसार करावा ही विनंती means subscribe and   share to increase out subscribers and  to reach this precious thought to maximum people.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू