२७.९ .२०२३ . अज जरा भावी पूर्वजांना संदेश.

   सुस्वागतम्, वाचकमंडळी, आज मी तुम्हाला फक्त हाक दिली. काही मानाचा मायना लिहिला नाही. खरे तर आजचे शिर्षक पाहून, तुम्ही नाराज झाला असाल. पण त्यात काही अगम्य नाही. आपण विमा उतरवतो. nomination लिहितो. ते मान्य आहे ना? तेव्हा , " हे काय अशुभ असे म्हणतो का? नाही ना? मग तसेच हे. 

          समर्थरामदास स्वामींनी म्हटलेच आहे,

            मरे एक त्याचा दुजा शोक वाहे,

            अकस्मात तो ही पुढे जात आहे।

       हे मनाचे श्लोक आपल्यासाठी ( मी वय ७२) आहेत. ते जेव्हा आपल्या पिढीपासून, शाळकरी मुले बोलतात. तेव्हा कोणाला खटकले नाही . खरे तर "दासबोध" त्यांच्यासाठी आहे. तसेच ही , कुसुमाग्रजांची कविता, आपल्यासाठी आहे. ती १०वीच्या मुलांना शिकवणे, अयोग्यच असो. पण या माझ्या , " क्लास" मधून अात्मसात करा.

        समर्थांनी मनाच्या श्लोकांत, जेष्ठ नागरिकांना उपदेश केला आहे, तोच कुसुमाग्रजांनी' रूपकात्मक व मनोरंजनात्मक रित्या, त्यांच्या,

        "पाचोळा" या कवितेतून आपल्या गळी उतरविण्याचा  प्रयत्न केला आहे. पण आपण दुदैवी. ही कविता हे पौढांसाठी वानप्रस्थाश्रम कसा स्विकारावा, हे सांगत आहे. पण पुन्हा ही शालेय अभ्यास क्रमात टाकून, त्या अजाण बालकांवर अन्याय केलाय. तीच मी आपल्याला आज दाखवणार आहे. आधी कविता वाचा. मग भाष्य. ओके.

पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ

तरू त्यावरती एकला विशाळ

आणि त्याच्या बिलगूनिया पदास

जीर्ण पाचोळा पडे तो उदास


उषा येवो शिंपीत जीवनासी

निशा काळोखी दडवु द्या जगासी

सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा

मूक सारे हे साहतो बिचारा


तरूवरची हसतात त्यास पाने

हसे मुठभर ते गवतही मजेने

वाटसरु वा तुडवीत त्यास जात

परि पाचोळा दिसे नित्य शांत


आणि अंती दिन एक त्या वनांत

येइ धावत चौफेर क्षुब्ध वात

दिसे पाचोळा घेरुनी तयाते

नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे


आणि जागा हो मोकळी तळाशी

पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी.

   कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर

                    आता ह्याचा मतितार्थ पाहू. 

         ही कथा आहे, एका उजाड माळरानावरच्या  एकल्या मोठ्या वृक्षाची. जो येणार्‍या जाणार्‍यांना  छाया सावली देत आहे, या माळरानात  भगभगत्या उन्हात, आपल्या विपुल पर्णराशींच्या मदतीने.   तसेच आपल्या मानवी जनतेच्या हातभाराने, ईश्वर ह्या  दुनियेच्या रंगभूमीवर समाधानाची  छाया देत आहे.

      सदैव तीच पाने काही, वृक्षवल्लींवर राहत नसतात. नवी पालवी येत असते. साहजिक जुन्यांनी, त्यांना, सर्व क्षेत्रात, बाजूस होऊन जागा देणेच योग्य ठरेल, हेच कुसुमाग्रज सांगत आहेत. 

       हा वृक्ष समाज जीवनाचे रूपक आहे. ज्या पानांना, तो दिमाखाने, अापल्या अंगाखांद्यांवर मिरवत अाहे व त्यांच्यामुळेच वाटसरूंना सावली देऊ करतो. ती चिरंतर नसतात. 

          त्या शिवाय नव निर्माणाला जागा कशी मिळणार?

   खाली पडलेल्या व झाडाच्या पायाशी साठलेल्या जीर्ण पर्णराशींना ही तिथून वार्‍याच्या मदतीने दूर जायला पाहिजे. जागा अडवून राहू नये, हेच कवितेत कवीला अभिप्रेत आहे. शब्दशः अर्थ घ्यायचा, तर तरूणांनी खेळ व  टाईमपास सोडून, चरितार्थाच्या मागे लागावे. पौढांनी, तरूणांच्या कर्तृत्वाला वाव द्यावा. पौढांच्या मार्गातून वृध्दानी आपलीच न चालवता, विश्राम घ्यावा.  हा संदेश आहे. पण कोण लक्षात घेते? त्या शालेय मुलांना हा आशय कसा समजावा बरे?  पौढ वृध्दांसाठी पूर्वी किर्तन- प्रवचनातून हे समजावले जाई. पण आजचे बुजुर्ग, ना घरके ना घाट के.😀 . हेच पर्ण राशीप्रमाणे, आहे आपले  विधिलिखित. जाणून घ्या. मालिका व ते जीवन आपल्या कक्षेच्या बाहेरील आहे. असे वर्तन आपल्या स्वतःच्या घरात झेपणार नाही. मुलानातवंडाना मार्गी लावायचे, तर स्वतः track वर रहा.  मुलांनो, परत एकदा सांगते, सांभाळा, आपल्या जेष्ठ पालकांना! नाराज होऊ नका, ह्याचमध्ये आपले भले भविष्य आहे. like ( पटवून घ्या) करा & subscrbe करा. ( या विचार सरणीत स्वतःला सामावून घ्या) मग बघा सुख आले दाराशी म्हणाल. त्याला दारातून आत घेणे, तुमच्या हातात आहे.  तर मग, रोजप्रमाणे सुचित करते व  माझा उद्देश सफल करा. त्यासाठी  दिलसे वाचा, विचार करा. व ही विचारसरणी सर्वदूर spread करा कशी ती तुम्ही जाणताच. share this blog to you nears & dears.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू