आपले हित जपणे,म्हणजेच, आपली फसवणूक होऊ न देणे.
२९. ८.२०२३ आपके हित जपणे, म्हणजेच, आपली फसवणू होऊ न देणे.
माझ्या सजग वाचकहो, हे पटतेय ना, आपली कधी ही फसगत होऊ नये, हीच प्रत्येकाची इच्छा असते. मग आपण जागृत राहणे, आवश्यक आहे. तेच आचार्य चाणक्य
आपल्याला पटवत आहेत. आठवतेय, लहानपणी, सर्वांनी आवडीने वाचलेल्या, ” पंचतंत्रातील कथा”. त्या लिहिल्यात, विष्णुशर्मांनी. म्हणजेच मुळचे आचार्य चाणक्य. प्रथमतः ते खूप गरीब होते. तेव्हा तेथील राजा अमरशक्ति यांचे
तीन पुत्र खूप आळशी मूर्ख व स्वार्थी होते. त्यांनी जाहिर केले, जो कोणी माझ्या ऐयाशी राजपुत्रांना, लवकरात लवकर सुधारील व राज्यकारभारांत योग्य करील, त्याला मी अर्धे राज्य देईन. तेव्हा एक गरीब ब्राह्मण पुढे आला व म्हणाला, ” हे राजा, मला तुझे राज्य नको.फक्त तुझ्या पुत्रांना, मी योग्य शिक्षण देईन, ज्यायोगे आपल्या राज्याला, योग्य बलशाली व बुध्दीवान राजकर्ते लाभतील. तेच विष्णुशर्मा. म्हणजेच चाणक्य. अन् त्यांनी पंचतंत्र लिहिले. त्यातील एक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. या कथा लहानपणी वाचून विसरण्याच्या नाहीत हो. तर ही आपल्या सर्वांसाठी जन्मभराची पुंजी आहे. वाचाल तर वाचाल व आपल्या भारत वर्षाला लाभलेल्या महान नेतृत्वाचा सन्मान कराल व भारत देशाला वाचवाल. तर विष्णुशर्मा – चाणक्यांची कथा.
पक्षी वर्ग नवीन राजाच्या शोधात.
सर्व पक्षी आपापला आवाज काढतात . तेथून घार उडत येते.
घार:- काय रे, काय कलकल चाललेय? कोकिळा:- आम्ही मोठ्या गंभीरपणे बोलत आहोत.
कलकल काय म्हणतेस ग?
पोपट :- खरे आहे. आम्ही आपल्या पक्षी समाजाच्या
संरक्षणाच्या बाबतीत . .चर्चा. .
घार :- ए बाबांनो, सरऴ सांगा की काय ते . .
खंड्या :- आमचे म्हणणे आहे कि, आपले राजे गरूड
महाराज नेहमी स्वर्गात, भगवान विष्णूच्या
बरोबर असतात, तेव्हा . .
सारस:– आपल्याला इथे जंगलात मार्गदर्शन
करण्यासाठी, आपले संरक्षण करण्यासाठी
कोण आहे का?
बगळा :- हे एका अर्थी बरोबर आहे. आपल्याला राजा
गरजेला मदत करणारा हवा. अर्थात गरूड
महाराज दूर असले तरी सर्व समर्थ. . .
पोपट:- जवळ नाहीत, आपल्यातले नाहीत, म्हणून तर
आम्ही ठरवले आहे, आपण इथलाच नवा राजा
ठरवू.
चिमणा:- जो एका जागी बसेल अन् केव्हाही आपल्याला
ठरल्याजागी सापडेल, असा राजा हवाय् आम्हाला.
घार:- मग मी गोल गोल फिरून शोधून काढीन, असा
कोणीतरी. . कोकिळा :- हो, तू बरोबर शोधून काढशील. .
चिमणा:- पण बघ हं घारूताई, ह्या कोकिळेसारखी
लपून बसणारा नको बाई, नाहीतर पानापानात
शोधण्यातच वेळ जायचा. . .
कोकिळा:- अन् ह्या चिमणीसारखा नाचरा ही नको . .
सुतार :- बास आता. त्यापेक्षा मी सांगतो. वरच्या फांदीवर
बसलेले घुबड कसे वाटते?
पोपट :- आहे खरा मुनींसारखा.
( सगळे हो हो म्हणून ओरडतात.)
बगळा:- बरोबर आहे, तुझे म्हणणे. या घुबडांचा कोणाला
धाक ही वाटणार नाही. शिवाय हसून बघत ही
नाही.
सुतार:- नशीब! मी बोलवायला गेलो नाही.
कावळा:- पटले ना, आणि बोलवून येणार व काम करणार
कसा तो, त्याला दिवसा दिसते का? अं.
बगळा:- त्यामुळे त्याची काही संकटात मदत होणारच
नाही. समर्थ गरूड महाराजांची सर कशी
येणार?य
कावळा:- पटले ना? नुसते समोर असून व
आपल्यातला असून काय फायदा?
योग्य तर्हेने शिकवू न शकणारा शिक्षक व
कुंटुंबाचे पालन न करणारा कुंटुंबप्रमुख काय
उपयोगाचा?
सर्वजण मान डोलावतात व म्हणतात,
” श्री विष्णू वाहन सर्व शक्तीमान आदरणीय
गरूड महाराजांचा विजय असो.
तर अश्या प्रकारे राजा कसा असावा, आपल्या
त्याच्या कडून अपेक्षा पूर्ण होत आहेत का? तसेच
जनतेच्या मागण्या वाजवी आहेत का ? हा धडा
नागरिकांसाठी आहेत की छोट्या मुलांच्या बाबतचा हा
विषय आहे. त्यांच्या कुवतीच्या बाहेरील हा आशय आहे? खरेच विचार करा. जागे व्हा. आजच्या परिस्थितीला सजगपणे सामोरे व्हा. एकदा हे “पंचतत्र” वाचून काढा. बिघडलेल्या राजकुमारांना वठणीवर आणण्यासाठी,
विष्णु शर्मा म्हणजेच चाणक्यानी लिहिलेय, ते. लहान मुलांच्या आकलना बाहेर आहे. ते आपल्या साठी आहे. जे कावळ्याला कळले , ते Why not we can understand? actually speaking, The truth is that we don’t want to & try to understand.
सर्व साधारण जनतेचे सुत्र आहे “मला काय करायचेय !
Comments
Post a Comment