सामाजिक कार्य, घरबसल्या, सोप्या रितीने करा हो.
५.९.२०२३ . सामाजिक कार्य, घरबसल्या करा हो.
माझ्या सजग व सक्षम वाचक हो, दोन दिवसापूर्वीचा ३ ता.चा लेख वाचला वाचला असालच, तुम्ही. विचार केलात का, त्याप्रमाणे, now be active.म्हणजेच विचाराप्रमाणे आचार करा हो. तरच माझा ब्लॉग लिहीण्याचा हेतु सफल होईल. हो, घर बसल्या, कसे ते सांगते. सोपे आहे. आधी, मी आपली माफी मागते. २.३ दिवस tech कारणाने, लेख येऊ शकला नाही. असो. एक फायदा झाला असावा. कालचाच लेख परत वाचला असेल. जसे मुले अभ्यास करताना धडा परत परत वाचतात. मग डोक्यात, एकदम फिट बसतो.
तर पुन्हा माझ्या त्या वर्गात जाऊ या. आम्ही नुकतेच मिशन सुरूवात केले होते. रस्त्यावर आरंभ करून, अचानक, रामलिला प्रचार समितीच्या कृपेने, त्यांच्या भव्य जागेत वर्ग सुरू झाला होता. प्रथम ५.७ मुलांनी सुरू होऊन मुले वाढत होती. एकदा अचानक एक मुलगी उठली व म्हणाली, ” मी रबर घेऊन येते. मी काही बोलायच्या आत पळाली. मी दाराकडे पाहिले, ती तेथून जिना चढून गेली. मी इतरांना विचारले, ही वर कोठे गेली? तर एकीने उत्तर दिले, ” तिची ( आईची) शेटाणी वर राहते नं!” अन् ती नवा कोरा मस्त रबर घेऊन आली. बघा, त्या बाईंनी जरा ही न विचार करता, कामवालीच्या मुलीला, इतका महागाचा रबर दिला. अन् माझ्या लक्षात आले, तिला मिळण्याची खात्री होती. सर्वांना विचारले, तर म्हणे, आम्ही असेच करतो, काही लागले तर शेटाणीकडे जातो. हा विश्वास मिळवा हो. तसेच आणखीन् एक उदाहरण, माझ्या एका मैत्रिणीचे. एकदा मी तिच्या घरी गेले होते. तेवढ्यात दारात, एक मुलगी आली. मला पाहून बिचकली. पण माझ्या मैत्रिणीने, तिला आत किचनमध्ये नेले. टेबलाजवळ बसवून, अाम्ही खात असलेले, पोहे दिले. मी कुतुहलाने आत डोकावले. मैत्रिणीने एका मगमध्ये दूध घालून, बोर्नव्हिटा घातला. व तिच्यापुढे ठेवला. पण मी भोचक नं. मी तिला विचारले. ही कामाला येते का? मैत्रिण उत्तरली, ” नाही ग बाई! ” तिला माझा उद्देश कळला. पुढे म्हणाली, “अग, अामच्या घरात, कोणी दुधाची साय खात नाही, म्हणून बाईला दिली, तर ती घरी नेई. मग तिला म्हटले, सकाळी येताना, मुलाला इथेच आण. मग शाळेत जाईल. तिने सुरूवात केली. मग फक्त साय कशी देऊ.म्हणून दूध बिस्किटे द्यावयास सुरूवात केली. मग लक्षात आले, हिला एक मुलगी पण आहे. ती सकाळी शाळेत जाते. म्हणून हिला आता बोलावते. ही एकटी येऊ शकते.” मी येवढेच बोलू शकले,” you are great. कधीपासून ग? अन् मिस्टरांना~~” ती बोलली, तेच तर बिस्किटे आणतात. “
मी ,” हे कधीपासून?”
तेवढ्यात ती मुलगी बाहेर आली व मला ठसक्यात म्हणाली, ” दोन वर्षापासून”, मैत्रिणीची मुले अाता कॉलेजमध्ये आहेत. येथे कर माझे जुळती..
आणखी एक लहानसे पण महान उदाहरण. आमच्या वर्गातील मुलींना नवरात्रीच्या अष्टमीला कुमारिका म्हणून बोलवायचा बेत केला, तर त्या म्हणे, आम्ही सर्व, त्यादिवशी शेटाणीकडे जातो नं? मुले पण! बहुदा सर्व शेटाणी राजस्थानी, म्हणून , ” शेटाणी” असा उल्लेख.
येथे कर माझे जुळती.🙏.
Comments
Post a Comment