विद्यार्थी नव्हे, यर परिक्षार्थी तयार होताहेत. त्यांच्यात संघर्ष निर्मिती.

 १४. ९ .२०२३. विद्यार्थी नव्हे, परिक्षार्थी तयार होताहेत. 

     त्यांच्यात संघर्ष निर्मिती.

           माझ्या सुजाण व जागृत वाचक हो,

        कालचाच विषय आजही वेगळ्या angel मधून लिहिणार आहे.  या दोनच अभ्यासक्रमाबाबतच  विशद करणार आहे. माझे लेखन, " दिलसे"  वाचत आहात, यास्तव कौतुक करून, पुढचा विचार मांडत आहे.  आपल्या स्वतंत्र  भारत झाल्यापासूनच असलेल्या  राजकिय धोरणा मुळेच, आपण या मुलांच्या दरी निर्माण करीत आहोत. मेहनतीने अभ्यास करून admission घेतलेली मुले व  कमी मार्क मिळवून ही admission मिळाली मुले - साहजिक दोन गट पडणारच. तसेच शहरी जीवन जगलेली मुले व गावोगावातून आलेली मुले ह्यात ही दोन गट पडणारच. कारण जीवनशैली भिन्न. आता मी जे स्पष्ट व सत्यच  लिहिणार आहे, ते वाचून कृपया , " छी, बाबा, काहीतरीच लिहीता, असे म्हणू नका.  आजकालच्या  हॉस्टेल व कॉलेजेस  मधून " toilet" आधुनिक पध्दतीचे असतात. यानि की कमोड system. shower.. एकदम गावा-तालुक्यातून आलेली मुले, त्याच्याशी पटकन  adjust  होऊ शकत नाहीत. अन्  तोपर्यंत शहरी मुलांना, जन्मजात स्वच्छतेच्या कल्पनेतून  ते सोसत नाही.  विचित्र वाटते ना? मग मराठी सिनेमा, " दोघात तिसरा  - प्रसाद ओक व मकरंद अनासपुरे व मुंबईचा फौजदार - रंजना व रविंद्र महाजनी-  हे दोन्ही मराठी चित्रपट पहा. हीच फक्त बाब नव्हे तर कित्येक छोट्या मोठ्या बाबतीत दरी पडते. त्यातून झालेले वाद - काही  रँगिंगच्या सदराखाली मोडत नाहीत.  तसेच काल लिहिल्याप्रमाणे, मूळ कारण अभ्यासक्रम न झेपणे, त्यामुळे slow learning झाल्याने ही दुरावा निर्माण होतो. आता मी आजही एक सत्य घटना सांगणार आहे. हे फार भयंकर आहे. पण त्यावर उपाय करण्यासाठी , कोण व का करतेय, याचा शोध घेणे, आवश्यक आहे. " द काश्मीर फाईल्स मध्ये दाखवल्या प्रमाणे , या मुलांचे brain washing केले जाते. त्यांना पत्रे येतात. त्यातून , भटुरडे वगैरे उल्लेख करून सुचक लिखाण केले जात असे. ते बाहेर येणे, आवश्यक आहे. आजकाल तर social media द्वारे अगदी सोपे व भयानक झालेय. आता मला हे कसे कळले, ते सांगते. मी अंध मुलांना शिकवायला rather त्यांची अभ्यासाची पुस्तके वाचून दाखवण्यासाठी, एका संस्थेत जात असे.  एक मुलगा law चा विद्यार्थी होता. हो, तो reserve category तील होता. अर्थात अभ्यासा बरोबर, मी त्यांना आलेली, पत्रे ही वाचून देत असे.  ह्या मुलाला आलेली, तीन पत्रे, वाचताना, मला धक्का बसला. स्पष्टच बोलायचे, तर घाम फुटला. ही घटना १९९९ची आहे. 

       त्यात लिहिले होते, " हे भटुरडे असतात, त्यांची नांगी ठेचायला हवी- त्यांच्या बायांना ~~ वगैरे बरेच काही. संदर्भ देऊन.

        मी हे आजही लिहू शकत नाही. पण  तुम्ही विश्वास नसेल तर,  महात्मा फुले यांचे ग्रंथ खंड ५ किंवा ७ वाचा. हा प्रकार social media वर चालूच आहे. मग मी त्या मुलाला विचारले, " बाबारे, मी कोण आहे, माहीतेय का? अन् मीच हे वाचून दाखवू का? आज तुमच्यातील किती जण येथे reader म्हणून येतात, अं? "वाचकहो, खरेच विचार करा,  पुढे  येऊन बरोबरीने, सुशिक्षित होण्याची अभिलाषा बाळगणार्‍या मुला मुलीत हे विष भिनवले जाते. हे अंध मुलांमुळे, मला कळले, एरवी बाहेर पडणे, शक्य नाही. ही दरी निर्माण केली जाऊ नये, म्हणून काय करता येईल. हा सल्ला मी आपल्यालाच विचारतेय. कृपया शोध घ्या. त्यासाठी हे माझे लिखाण जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा. means share these blogs to every where. and also think over it.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू