विश्वाचे गुरू चाणक्य- विष्णुशर्मा. त्यांचे गुरू कोण माहित करू या.

 २६.८.२०२३. चाणक्य- विश्वाचे गुरू- त्यांचे गुरू कोण ओळखा बरे? तर वाचा.

माझ्या प्रिय व सुज्ञ वाचक हो, काल आपण, इस्त्रोचे संस्थापक माननिय श्री. चिटणीस यांची ओळख करून घेतली. आज इस्त्रोने आपल्या भारताची मान उंचावली आहे. तुम्हाला माहित आहे का, नासा मध्येही आपले भारतिय शास्त्रज्ञच जास्त आहेत. आज आपल्या पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्यामुळे, इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी, अशी उंची गाठली आहे, कि हजारो वर्षापूर्वी, जसे विश्वभरातून, लोक येथे नालंदा व तक्षशिलात शिकण्यासाठी धाव घेत, तीच प्रथा पुन्हा सुरू होईल. म्हणून जरा तक्षशिलातील गुरू, चाणक्य ज्यांना , “गुरू” मानत त्यांची ओळख करून घेऊ.
. ते संपूर्ण विश्वासाठी गुरूस्वरूप आहेत. त्यांनी -नीतिशास्त्र- राज्यशास्त्र- अर्थशास्त्र- समाजशास्त्र- मानसशास्त्र अशा अनेक विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत. पण ? त्यांनी काही मानवी गुरू केले नव्हते. 😀 तर त्यांचे गुरूस्वरूप होते ते,- प्राणी व पक्षी. नवल वाटले नं? हे सत्य आहे.
पहिला गुरू-गर्दभ म्हणजे गाढव. हसू नका. नीट वाचा. मग त्याची महती कळेल.
सुश्रान्तोsपि वहेद् भारं शितोष्ण च न पश्यति ।
सन्तुष्टश्वरते नित्यं त्रीणि शिक्षेव्च गर्दभात् ।।१८।
::::गाढव — हा प्राणी ऊनपाऊस- थंडी कडक उन्हाळा दिवसरात्र श्रम करतो. भारंभार लादलेला बोझा निमूटपणे वाहाणारे हे गाढव. सहनशील प्राणी . विनातक्रार मेहनत करणारा, अल्पसंतुष्ट जीव आणि आपण ” बुध्दीजीवी लोक , कोणाही आळशी – मुर्खाला “गाढव” म्हणतो. का तर तो विरोध करत नाही. ही तुलना करू नका. त्यापेक्षा गर्दभाचा कोठच्याही परिस्थितीत, मेहनत करण्याचा गुण घ्या नं.
बाहेरील राज्यातून लोक येतात, आपल्याला त्रास होतो,
म्हणणार्‍यांनी त्यांच्या सारखे न कंटाळता श्रम करावे नं कोणी नाही म्हटलेय.

दुसरा गुरू- कोंबडा.
प्रत्युत्थानं च युध्दं च संविभागं च बंधुषु ।
स्वयमसक्रम्य भुक्त् च शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात् ।

कोंबडा— ह्या कोंबड्यांबद्दल चाणक्यनीतित जे सांगितले आहे ते नीट समजून घ्या. त्यांनी, त्याचे चार गुण सांगितले आहेत. तो लवकर उठतो. सुर्योदयाला आरवतो. आज कंटाळा आलाय, जाऊ देत, मला काय करायचेय म्हणून कर्तव्य टाळत नाही. परत एकदा पूर्वी जे लिहीले होते, त्याची आठवण आली. सर्वसाधारणपणे आपली मंडळी रविवारी आरामात उठतात. ना वेळेवर अंघोळ, का, कारण आपणच लहानपणी सवय लावली असते. त्या सीमेवर सैनिकांनी असे केले तर, अं! दूर कशाला , ख्रिश्चन एकजात सर्व रविवारी उठून चर्चमध्ये जातात नं? त्यांचा new year आपण आपलासा केला, मग ही सवय का नाही accept करत? माझा राग येईल, पण दर्शनाच्या रांगेत उभे असताना, निदान मनात जप . . असो. मुख्य मुद्दा हा गुण घ्यावा. आणखी तीन गुण त्याच्या कडून शिकण्यासारखे आहेत. ते गुण, आचार्य चाणक्य सांगतात. तो म्हणजे एकदा मनात अाणले की तो जी झुंज देतो. त्याबद्दल उद्या विचार करू. एकदम overdose नको, कसे?😉😊

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू