असेल इच्छा तर दिसेल, मार्ग

 ६.९ .२०२३ हिंमत है मर्दा, तो मर्द/ मर्दानी हो खुदा.

माझ्या जागरूक व सुसंस्कृत वाचक जनहो, सर्व पिडितांसाठी, मनात “बंधुत्व” जागर करा.
मुलांनो व मुलींनो – तरूण तरूणींनो, आपल्या बॉर्डरवरच जवान नाहीत, तर हम भी कुछ कम नही, हे दाखवून द्या. हो, जेष्ठ व श्रेष्ठ नागरिक हो, तुम्ही ही या अशा प्रसंगी सिध्द करून दाखवा कि, still we are young in our heart and in health. एक सांगू हे, पोरींच्या मागे लागणारे , “वीर” मनातून , ” डरपोक” असतात हो. म्हणून तर त्यांना हातात शस्त्र लागते. हे मी , लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, ह्या म्हणीप्रमाणे सांगत नाही. तर आता, माझा एक अनुभवच सांगते. मोठेपणा नाही, पण सत्य घटना आहे. मी एकदा नाशिकहून कळवणला जात होते. बस चुकली म्हणून स्वतंत्र रिक्षा केली मध्यंतरी रस्ता सामसूम, दुपारची रणरणीची वेळ. अचानक माझे लक्ष रस्त्याच्या कडेला गेले, मी हादरले. दोन मुले एका १३.१४ वर्षाच्या मुलीला~ मी रिक्षावाल्याला थांबायला सांगितले. तो तयार नव्हता. पण मी जोर लावला, त्याला म्हटले, तुम्ही पाहिजे, तर जाऊ शकता.मी उतरले व तेथे गेले. एकाची कॉलर पकडली व दुसर्‍याला खडसावले.”काय रे” ती मुलगी भीत बोलली, त्यांच्याकडे चाकू आहे, आजी. मी बोलले, ” चाकू असेल, ह्याच्याकडे पण माझ्याकडे तेज नजर आहे.” त्यांनी काय ऐकले राम जाणे! तो चाकूवाला मागे हटला. अन् ज्यांची कॉलर मी धरली होती, तो ही हिसडा देऊन पळाला. .बोला आता. मग काय, तो रिक्षावाला ही reverse घेऊन मागे आला आम्ही निघालो.
सावधान इंडियाचा लोगोच आहे, “डरके नही- डँट के जिओ”, त्यांच्या, एपि.७४ च्या शेवटी हेच सांगितले आहे. , ” हिंमत दिखाओ. थोडे विचार करून, कल्पना लढवून, संकटाला तोंड द्या. त्यासाठी आत्मविश्वास निर्माण करा. शक्ती नसेल तर युक्तीचा उपयोग करा. मागच्या भागात, बघितले ना, मुलींच्या सुरक्षिततेसाठी, त्या अशिक्षित, महिलांनी कशी युक्ती केली. अहो, कधी कधी संकटे दुरून परक्यांकडूनच, येत नसतात, तर आपल्या जवळच फिरत असतात. पण सर्वसाधारण लोक, उघड्या डोळ्यांनी, बघणे सोडून, बिनधास्त रहातात. त्यांच्या एपिसोड ७४ च्या शेवटी, त्यांचा anchor हेच कळवळून सांगतो. सामान्य जनहो, हिंमत दाखवा, व अनोळखी मुलामुलींवर होणार्‍या, अन्यायाला, डटके, विरोध करा. निदान जर कोणी असे धाडस दाखवत असेल, तर त्यांना साथ द्या. पाठ फिरवू नका. येवढे करा🙏 सामाजिक कार्य होईलच. पण त्याबरोबर पुण्य ही लाभेल. एक गंमत उद्या सांगीन. वरपांगी समाजकार्य करत असताना,उलटच घडते. कारण विचार करून , ” कार्य” केले नसते. तर भेटू उद्या याच जागी- स्थानी, म्हणजे माझ्या ब्लॉगवर बरोबर आपल्या निकटवर्तियांना घेऊन या. means share this blog to your nearest and dearest.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू