रक्षाबंधन- एक कर्तव्याचे बंधन.👍
30.8 .2023 रक्षाबंधन.
वाचकहो, हो. आजचा आपला हिंदू धर्मातील महत्वाचा सण. हा काही फक्त आनंदी आनंद चोहोकडे , म्हणत ,” नाचगाणी व फटाके फोडण्याचा सण नाही. किंवा कोणातरी देवाने, राक्षसी वृत्तीच्या असूराला मारल्या बद्दल, लौकिकात, साजरा करण्याचा दिन नव्हे, तर कर्तव्याची जाणिव करून देणारा, संकटात असलेल्या किंवा, जेव्हा केव्हा अडचण येईल, तेव्हा, स्वतःच्या बहीणीला , “रक्षण” करीन, असा दिलासा देण्याचा मुहुर्त आहे. संरक्षणाची, मग कशापासून ही, हमी घेण्याचे वचन देण्याचा शुभदिन आहे. माझ्या सुज्ञ व जागृत वाचक हो, 🙏 हात जोडून एक विनंति आहे, आपल्या कार्यक्षेत्रात, तसेच नातलगात, मैत्रीच्या नात्यातच, नव्हे तर , परिसरातही, तसे कोठल्याही प्रसंगी, गरजेनुसार बंधुभाव जागर करा. मग तुम्ही फक्त पुरूषच नव्हे तर महिला ही अनोळखी, संकटात असलेल्यांसाठी रक्षक बना. बस् आज इतकेच आपल्यातील ,” राम” जागृत ठेवा. त्यासाठी माझी एक short film दाखवते, ती पहा. व ” वाईट स्पर्श- हँडस् अप”
हो, माझ्या सुजाण वाचकहो, मला आठवतेय, मी नुकतीच ही short film तुम्हाला बघण्यास टाकली होती व तुम्ही ती बघितली असणारच .पण माझी कळकळीची विनंती अाहे कि ती पुन्हा पुन्हा बघा व मनात बिंबवा. सतत त्यावर विचार कराल,तर निश्चित तुम्हीह, त्या अनोळखी मुली महिलांसाठी, आदर्श बंधुत्व निभावाल. करालनं, हे छोटेसे काम. फक्त , “काय चाललेय,” ओरडा. बघा ते बंदुकीप्रमाणे धाक जमेल. निदान जमल्यास इतरांना ही गर्दीत ह्या कामासाठी प्रोत्साहित करा. ढिश्यांव!👉
Comments
Post a Comment