मनःपूर्वक भक्ती हीच खरी शक्ति
16.8. 2023 मनःपूर्वक भक्ती हीच शक्ति.
वाचकहो, काल आपण सर्वांनी, आपल्या देशाचा , स्वतंत्रतादिन साजरा केला. आज कित्येक ठिकाणी, या दिनाचा उल्लेख, स्वातंत्र दिन असा केला जातो. पण या दोन्ही शब्दांच्या अर्थात, मोठा फरक आहे. मागच्या आठवड्यात, तो मी स्पष्ट केला होता.या विषयीची, माझी, short film आहे, तिची लिंक देते. ती बघा. असो. आज ही आपण कालच्या विषयावर विचार करणार आहोत. भक्तीभाव कसा असावा. मनात असणे महत्वाचे की जनात दाखवणे योग्य, ह्याचा प्रत्येक माझ्या सुजाण वाचकाने करावा, असे मला वाटते. कालचा लेख , हवे तर परत मनापासून वाचा. सर्वसाधारण बरेचसे लोक, retirement नंतर चारधाम यात्रा वगैरे, एखाद्या travelling agency द्वारे करतात. स्पष्ट बोलायचे झाले, तर ते commercial उरका पाडतात. त्यावेळी संपूर्ण प्रवासाचा एकूण काळ पाहता, त्या त्या देवासमोर किती % वेळ आपण असतो. खरे सांगू, आजकाल बाहेर पडल्यावर, आपले लक्ष, जास्ती करून, मोबाईल घेऊन फोटू I mean selfyकाढण्यात असते. त्या स्थळाची महती. मंदिरांची पुरातन स्थापत्य कला नजरेने बघून, मन तृप्त होण्याएवजी, मोबाईलमध्ये साठवण्यात असते. मग दाक्षिणात्य मंदिराची शिखरे व इतर ठिकाणची भव्यता बघण्याचे राहून जाते.
मंदिरे बघताना, दिल्लीला गेल्यास, आग्राला ताजमहाल बघणे, ओघात येते. अख्खा ताजमहाल, लेन्समध्ये सामावून ( लांबवरून) आपले फोटो, काढताना, ताजमहालाच्या भिंतिवरील वेलबुट्टी पाहण्याचे राहून जाते. मी १९७३ मध्ये तो पाहिला. मूळ मकबर्यावर, वरून, पाण्याचे थेंब ठपकतात. ते दृश्य कसली आठवण करून देते बरे. तेथील भिंतिवर, बेलपानांची वेलबुट्टी कशी बरे? असो. मजेत जायचे व यावयाचे झाले? हे उत्तर मला सदैव मिळते. विचार करणे😷 हं.असेच आणखी एक उदाहरण देते. आमच्या लहानपणी( दादरला राहत होतो) त्यावेळी शिस्त अशी होती कि, ” ७च्या आत घरात” अगदी गॅलरीत ही नाही. ” घराघरातून , शुभम् करोती व परवचा( पाढे) कविता सुरू होई. हं, तर झाले असे की, मी व मैत्रिण- नंदू- एक दिवस पोर्तुगीज चर्च पुढील सिध्दी विनायकाला गेलो. घर प्लाझा समोर. अर्थात् परत येण्यास ७.१५ वाजले. ओरडा बसू नये,म्हणून आम्ही, आमच्या देवदर्शनाची कथा सांगितली. प्रसाद पुढे केला. वाटले की, “वाहवा ” होईल. पण काय – माझी देव धर्माची महती, ध्यानी मनी, असणारी आजी (तिला सर्व काकी म्हणत) म्हणाली, काय ग, देव तिथेच आहे का? आपल्या जवळच्या देवळात नाहीये का? एक लक्षात ठेवा. मनी भाव असला, तर देव सर्व ठिकाणी दिसतो- भेटतो. भक्ती स्वतःच्या मनःशांतीसाठी करायची. इतरांना वा देवाला दाखवण्यासाठी नसावी. हात जोडावे व मनासमोर, देवत्व यावे. फुले, तेल घंटा मोठ्याने वाजवणे, ही खर्या भक्तिची रीत नव्हे”. त्यावेळी १९६७ मध्ये, तिचे हे बोल मनावर कोरले गेले. तेच काल व आज तुम्हापुढे ठेवले आहेत. ते स्विकारा व अंगी बाणवा.🙏. बस, and subscribe and share my blog and help me to spread this great thinking in public hugely.
Comments
Post a Comment